Home Search

पंढरी - search results

If you're not happy with the results, please do another search

घंटीबाबांची दिग्रस नगरी कापसाची पंढरी

3
दिग्रस हा यवतमाळ जिल्ह्याच्या सोळा तालुक्यांपैकी एक. दिग्रस हे शहर पूर्वी ‘डिग्रस’ म्हणून ओळखले जात असे. त्याचे दिग्रस हे नाव कसे पडले, याबाबत काही दंतकथा आहेत. त्यांपैकी एक म्हणजे तेथील झाडापासून डिंकाचा रस जास्त मिळत असल्याने त्याचा अपभ्रंश डिग्रस असा झाला. कोणी ‘ग्रेसफुल’ अर्थाने, तर कोणी ‘दि ग्रेट’ अर्थाने दिग्रस या शब्दाचा अर्थ सांगतात. दिग्रस हे शहर यवतमाळपासून बहात्तर, अमरावतीपासून एकशेचौदा, तर नांदेडपासून एकशेअडतीस किलोमीटर अंतरावर आहे. दिग्रसने स्वत:चा वेगळा ठसा कृषी, राजकारण, कला, क्रीडा, अध्यात्म, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत उमटवला आहे...

पाजपंढरीची समस्या अपंगांची (Dapoli village faces a problem of handicapped generation)

0
एका छोट्याशा, चार हजार लोकवस्तीच्या गावात दोनशेहून अधिक अपंग आहेत हे वाचून नवल वाटेल ! पण तसे गाव रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यात आहे. त्याचे नाव आहे पाजपंढरी. त्या गावात अपंगांची संख्या एवढी का? तर गरोदरपणातील स्त्रियांच्या प्रकृतीची हेळसांड ! अनिल रामचंद्र रघुवीर या अपंग कार्यकर्त्याने त्याच्या प्रयत्नाने गावाच्या या व्यथेवर मात केली. त्याने हताश अपंग दुर्बलांना संघटित करून त्यांचे गाऱ्हाणे सरकार दरबारी मांडले. त्यांना ही प्रेरणा संतोष शिर्के नावाच्या दापोलीच्या सामाजिक कार्यकर्त्याकडून मिळाली...

साखरवाडी – खो खो ची पंढरी

जसा लौकिक कुस्तीसाठी हरियाणाने, टेनिससाठी आंध्र प्रदेशने आणि फुटबॉलसाठी ईशान्य भारताने कमावला आहे, तसाच लौकिक महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील साखरवाडी नावाच्या गावाने खो-खो च्या राष्ट्रीय मैदानावर मिळवला आहे ! साखरवाडीच्या विशेषतः मुलींचा धसका देशभरच्या खो-खो खेळाडूंनी घेतला आहे. साखरवाडीच्या मुलींच्या मैदानावरील चपळाईने प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरते आणि पाहणारे थक्क होऊन जातात ! त्या गावातून शंभराहून जास्त राष्ट्रीय खो खो खेळाडू घडले आहेत...

अचलपूर – आधुनिक नाट्यपंढरी (Achalpur – The origin of Marathi stage)

अचलपूरला समृद्ध नाट्यपरंपरा लाभली आहे. विदर्भातील कालिदास आणि भवभूतींसारख्या नाट्य विभूतींनी नाट्यक्षेत्रात अजरामर कार्य केल्यानंतर तेथे आधुनिक रंगभूमी रुजली. अचलपुरातील बहुतेक नाट्यगृहे ही नाटके सादर करणाऱ्या मंडळांची स्वतःची आहेत. विशेष म्हणजे अचलपूरच्या जुन्या संस्था रंगमंचाची पूजा करताना नाटकांतील स्त्रीपात्रांचीही पूजा करत. कालौघात ती नाट्यगृहे नाहीशी झाली, पण नाट्यगृहांच्या समोरील मंदिरे जोरात चालू आहेत…

गीताबाईंचा (पंढरी) मळा (Indapur’s Pandhari Family & Women’s Position)

पुणे जिल्ह्यातील इंदापूर गाव इतर भागांच्या मानाने दोनशे वर्षांपूर्वी खूपच सुधारलेले होते. तेव्हा पंढरी कुटुंबीयांचे अनेक वाडे गावात होते.स्त्रियांनासुद्धा कुटुंबात कसे महत्त्वपूर्ण स्थान होते याचे उदाहरण म्हणजे गीताबाईचा मळा!...

पंढरीची वारी- मराठी संस्कृतीची आत्मखूण! (Pandharpur Wari – Marathi Cultural Symbol)

माऊलींच्या पालखीचा आळंदी ते पंढरपूर हा पायवारीचा सोहळा होणार नाही हे ऐकून एकीकडे गलबलून येत आहे, तर दुसरीकडे माऊलींच्या पादुका हेलिकॉप्टरने पंढरपुरास जाणार याचा आनंदही वाटत आहे. वारकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तो निर्णय योग्यच आहे.
-heading-pandharidada

मेकपची जादू- पंढरीदादा जुकर

सिनेनट दिलीप कुमार एकदा म्हणाले होते, की “पात्राच्या वठण्यामागे अभिनय वीस टक्के असतो तर रंगभूषा ऐंशी टक्के असते!” पंढरीदादा जुकर यांच्या दीर्घ यशस्वी कारर्कीर्दीमुळे...

पंढरीचे बदलते स्वरूप (Pandharpur)

माझा जन्म पंढरपूरचा. आम्ही पेशव्यांचे पुराणिक. त्यांनीच आम्हाला पंढरपूर गावात नदीकाठी घोंगडे गल्लीत पन्नास खणी वाडा व नदीपलीकडे शंभर एकर जमीन दिली. माझी आई...
carasole

भटक्यांची पंढरी हरिश्चंद्रगड

सह्याद्रीच्या कुशीत अनेक ट्रेकिंग पॉईण्टस आहेत. त्यातील हरिश्चंद्रगड म्हणजे हौशी ट्रेकर्सचा, दुर्गवेड्यांचा ‘विक पॉईण्ट’. ‘भटक्यांची पंढरी’ म्हणून ओळख असलेल्या त्या गडाच्या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण भूरूपे,...

पंढरीची वारी

0
पंढरीची वारी निश्चित कधी सुरू झाली ते सांगणे कठीण आहे. ही वारी ज्ञानदेवांच्या पूर्वीही होती. विविध संतांच्या पालख्या व दिंड्या पंढरपुरास जातात. त्यात प्रामुख्याने...