Home Search

पंढरपुर - search results

If you're not happy with the results, please do another search
_ManishaRaundale_YanchiPandharpuriCyclevari_1.jpg

डॉ. मनीषा रौंदळ यांची पंढरपुरी सायकलवारी

1
पंढरपूरच्या दिंडीत आठ वर्षांपूर्वी सायकलस्वार दिसू लागले! सायकलस्वारांची ती संख्या शेकड्यांत मोजावी लागत आहे. म्हणजे सायकली पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत नसतात, त्यांचा मार्ग स्वतंत्र...
_protest

पंढरपुरी म्हैस दुधाला खास! म्हशीची दुग्ध व्यवसायातील विशेषता!

पंढरपूर हे देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. त्या नगरीमध्ये स्वत:चा चरितार्थ छोटे-मोठे व्यवसाय करून चालवणारी अनेक कुटुंबे गेल्या अनेक पिढ्यांपासून राहत आहेत. त्यांपैकी एक आहेत कृष्णाजी...

फलटणचे हरिबुवा समाधी मंदिर (Haribuva Samadhi Mandir at Phaltan)

फलटणच्या भूमीतील अनेक सत्पुरूषांपैकी सद्गुरू हरिबुवा यांचे स्थान वेगळे आहे. ते फलटणमधील लोकांच्या उद्धारासाठी प्रकट झाले अशी लोकभावना आहे. लोक त्यांना ईश्वरी अवतारच मानतात. हरिबुवा यांची मूळ समाधी जेथे बांधण्यात आली आहे तेथील समाधीचा आतील गाभारा स्वच्छ आहे. महाराजांची समाधी त्या मधोमध आहे. त्यांच्या दोन पादुका त्यावर कोरलेल्या आहेत...

अचलपूरचे कृषिधन – कपाशी ते केळी-संत्री

अचलपूर तालुक्याच्या शेतीतील गेल्या साठ वर्षांतील बदल शेतीशास्त्राप्रमाणेच समाजशास्त्रीय दृष्ट्यादेखील अभ्यासण्यासारखे आहेत. अचलपूरला कपास हे तसे पारंपरिक रोकड उत्पादन होतेच. अचलपूरचा कापूस उत्तम प्रतीच्या वस्त्रप्रावरणांसाठी जगभर प्रसिद्ध होता. साठ वर्षांतील ठळक बदल म्हणजे त्या कपाशीबरोबर केळी, मिरची व संत्री या पिकांनीही अचलपूरला नवी ओळख दिली आहे. त्यातून तालुका समृद्ध होत आहे व तरुण पिढी शेतीकडे पुन्हा वळत आहे...

संभव फाऊंडेशन : मनोयात्रींना मानवी प्रवाहात आणणारा अवलिया

1
वाढलेले केस, अंगावर जखमा आणि नग्नावस्थेत; रस्त्याच्या कडेला फुटपाथवर, एखाद्या उकिरड्याच्या बाजूला; एस टी स्थानक किंवा रेल्वे-स्टेशनवर असलेल्या मनोरुग्णांकडे नुसते पाहणेही त्रासदायक होते. मात्र, सोलापूरचे अतिश आणि त्यांची पत्नी राणी या दांपत्याने अशा लोकांना दिलासा देत मुख्य प्रवाहात आणण्याचे काम 2016 साली सुरू केले...

गणेशोत्सव – रामदासांचा साक्षात्कार !

0
गणेशोत्सवाला 2022 साली तीनशेसेहेचाळीस वर्षे पूर्ण झाली. गणपती हा सर्व कार्यांत प्रथम पूजला जातो. ‘सुखकर्ता दुःखहर्ता...’ ही गणपतीची आरती रामदास स्वामी यांनी रचली आहे. त्यांनीच गणेशोत्सवाची कल्पनाही राबवली. याबाबतची पार्श्वभूमी महत्त्वाची आहे...

भारतरत्न पां.वा. काणे (BharatRatna P.V. Kane)

भारतरत्न पांडुरंग वामन अर्थात पां.वा. काणे हे अलौकिक व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी एका मानवी आयुष्यात विविध तऱ्हांचे ज्ञानसंशोधनात्मक व संघटनात्मक अफाट कार्य केले. त्यांचे सर्वात मोठे काम म्हणजे त्यांनी ‘भारतीय धर्मशास्त्राचा कोश’ आधुनिक काळात संकलित केला. तो पाच खंडांत व काही हजार पृष्ठांत आहे...

आधुनिक विज्ञानयुगात वारीचे औचित्य

0
पंढरीची वारी ही भागवत धर्माची जगातील एकमेवाद्वितीय परंपरा. ती आठशे वर्षांपासून नुसती टिकूनच राहिलेली नाही तर वृद्धिंगत होत आहे. वारी सर्वसमावेशक असल्याने तिचे औचित्य आधुनिक विज्ञानयुगातही आहे. कर्म, ज्ञान, भक्ती यांचा यथायोग्य मेळ आणि व्यवस्थापन कौशल्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे पंढरीची वारी. परम संगणककार विजय भटकर यांनी विज्ञान व आध्यात्म यांचा पायाच मुळात श्रद्धा आहे, ती अंध असू शकत नाही असे सांगून, त्यांची परस्पर पूरकता लेखाद्वारे उलगडून दाखवली आहे...

मंदिर प्रवेशाचे महाभारत – संजयाच्या भूमिकेत

0
साने गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीतील अखेरचा आणि निर्णायक लढा पंढरपूरमध्ये लढला गेला. देवतांची मंदिरे म्हणजे सनातन्यांचे बालेकिल्ले. त्या चळवळीत ते बालेकिल्ले काबीज करून, त्यांचे दरवाजे अस्पृश्यांना खुले करण्यास महत्त्वाचे स्थान मिळाले. साने गुरुजी यांनी त्यासाठी प्राणांतिक उपोषण केले. त्यातून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर प्रवेशाचे महाभारत घडले व त्याची परिणती हरिजनांना मंदिर प्रवेश मिळण्यात झाली...

गाडगेबाबा – जिणे गंगौघाचे पाणी ! (Saint Gadgebaba’s Life of Service and Sacrifice)

गाडगेबाबा जिथं जिथं न्यून जाणवलं, तिथं तिथं ते भरून काढण्यासाठी नेटानं प्रयत्न करत राहिले. अनेकांची आयुष्यं त्यांच्या सहवासाच्या लेपानं सुगंधित झाली. गाडगेबाबा सभोवती माणसांचा समुद्र पसरलेला असतानाही आतून नि:संग राहिले...