Home Search

नाणी - search results

If you're not happy with the results, please do another search

महेश लाडणे : नाणीसंग्रह; अभ्यास अभी बाकी है !

शेवगाव तालुक्यातील अमरापूर गावच्या महेश लाडणे याच्या नाणीसंग्रहाची सुरुवात कुतूहलातून झाली. तो इयत्ता नववीत शिकत असताना घरात जुनी पितळी तांब्याची भांडी, वजनमापे अशा काही वस्तू असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यात वजनमापे वाटतील अशा गोलाकार आणि जाडजूड तांबे धातूच्या काही गोष्टी होत्या. तो ते साहित्य जमवत गेला. त्यातून त्याचा नाणेसंग्रह आकारास आला. त्याच्या संग्रहात आठशे नाणी आहेत. ती विविध धातूंची, विविध आकारांची, विविध किंमतीची, विविध लिपींतील आहेत...

मराठा घराण्यांची ऐतिहासिक नाणी

1
इतिहासात अनेक मराठा पराक्रमी घराणी होऊन गेली. मध्ययुगातील इतिहासप्रसिद्ध म्हणजे यादव राजघराणे. ते देवगिरी येथून राज्य करत होते. यादव राजवंशाची नाणी मुख्यतः सोने या धातूमध्ये आढळून येतात. यादवकालीन नाण्यांचे धातूची शुद्धता हे वैशिष्ट्य दिसून येते. त्यांनी चांदी व काही प्रमाणात तांबे या धातूंमध्येही नाणी पाडली...
_PashhimiKshatrapanchiNani_PustakParikshan_1.jpg

पश्चिमी क्षत्रपांची नाणी! – पुस्तकाची कहाणी

‘पश्चिमी क्षत्रपांची नाणी’ या पुस्तकाच्या निर्मितीतील मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठापर्यंतचा प्रवास हा एखाद्या फिरस्तीपेक्षा कमी नव्हता! तीनशेपन्नास वर्षांतील क्षत्रपांच्या राज्याचा तो प्रवास करणे फार रंजक...
_Aashutosh_Patil_1.jpg

आशुतोष पाटील – प्राचीन नाणी संग्राहक

भारताच्या वैभवशाली राजवटींतील नाण्यांचा अभ्यास करून ती संशोधनात्मक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न औरंगाबादच्या ‘देवगिरी महाविद्यालया’तील विद्यार्थी आशुतोष पाटील करत आहे. आशुतोष सध्या बारावीला असून विज्ञान...

त्सुनामी केळशीची (Tsunami of Kelshi)

कोकण किनाऱ्यावरील केळशीला पाचशे वर्षांपूर्वी, 1524 साली त्सुनामीने तडाखा दिला होता. त्यात सारे गाव उद्ध्वस्त झालेच, परंतु त्यातून केळशीच्या सागर किनाऱ्यावर वाळूचा बंधारा उभा ठाकला तो आजतागायत. वादळातील समुद्र लाटांचे तांडव शांत झाले. गावात आलेले समुद्राचे पाणी खाडीत वाहत जाऊन परत समुद्राला मिळाले. वाळूचा तो ढिगारा मात्र जमिनीवर राहिला – एक हजार मीटर लांब, अठरा मीटर उंच ! मात्र कालपरत्वे वारा, पावसामुळे त्याची झीज होऊन तो अठरा मीटर उंचीचा आठ मीटर झाला आहे. त्या आपत्तीची नोंद अधिकृत शाही वा नंतरच्या ब्रिटिश दफ्तरांत आढळत नाही. मात्र वास्को द गामा या खलाशाच्या नोंदीत त्या वादळाचे वर्णन व संदर्भ मिळाले आहेत...

नागपूरचे जुने मध्यवर्ती संग्रहालय

नागपूरचा ‘अजब बंगला’ म्हणजे नागपूरचे मध्यवर्ती संग्रहालय. त्या म्युझियमची स्थापना इंग्रज सरकारने 1863 मध्ये केली. ते भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात जुन्या संग्रहालयांमध्ये गणले जाते. नागपूर शहर हे त्यावेळी मध्यप्रांत आणि वऱ्हाड यांची (Central Province And Berar) राजधानी होती. संग्रहालयात दहा दालने आहेत. त्यांत विविध प्रकारचे पुरावशेष, झाडांचे जीवाश्म, शिल्पे, चित्रे, भुसा भरलेले प्राणी, शिलालेख अशा अनेकविध वस्तू आहेत. त्याकरता संग्रहालयात वेगवेगळी दालने आहेत- निसर्गविज्ञान, पाषाणशिल्पे, शस्त्र, पुरातत्त्व, आदिवासी कला व संस्कृती, प्राणी, पक्षी व सरीसृप, शस्त्र, हस्तशिल्प कला, चित्रकला व नागपूर हेरिटेज अशा विषयांचा त्यांत समावेश आहे...

सातवाहन – महाराष्ट्रातील पहिले राजघराणे

1
सातवाहन हे महाराष्ट्रावर राज्य करणारे पहिले राजघराणे. त्यांचा कार्यकाळ इसवी सनपूर्व 235 ते इसवी सन 225 पर्यंतचा आहे. साधारणतः साडेचारशे वर्षे. सिमुक या सातवाहन राजाने त्या राज्याची मुहूर्तमेढ रोवली तर त्याचा पुत्र सिरी सातकर्णी या कर्तृत्ववान राजपुरुषाने घराण्याला सम्राटपद मिळवून दिले. सातवाहन घराण्याच्या सिमुक सातवाहनानंतर राजगादीवर आलेला हा दुसराच राजा होता. असे असताना त्याने त्याच्या कर्तृत्वाने घराण्याला सम्राटपद मिळवून दिले. राजाचे कर्तृत्व नागनिका राणीने कोरवून घेतलेल्या नाणेघाट लेण्यातून कळते. सातकर्णी राजाची राणी ‘नागनिका’ ही त्या काळातील पहिली कर्तबगार ज्ञात स्त्री...

अभिजात दर्जा मिळाला… आता पुढे काय?

अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. त्यासाठी केंद्र सरकारने काही निकष ठरवलेले होते. 2004 मधील निकष 2005 मध्ये सुधारित करण्यात आले. ते चार निकष जी भाषा पूर्ण करेल, त्या भाषेला हा अभिजाततेचा दर्जा मिळतो. त्यानुसार आतापर्यंत प्रारंभी तमिळ (2004) आणि संस्कृत (2005) भाषेला असा दर्जा मिळाला. त्यानंतर तेलुगु (2008), कन्नड (2008), मल्याळम (2013) आणि उडिया (2014) याही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. हे निकष 2024 मध्ये सुधारित करण्यात आले. त्यानुसार मराठीसोबत पाली, प्राकृत, बांगला आणि आसामी या भाषांनाही हा अभिजात दर्जा देण्यात आला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावर दोनशे-तीनशे कोटी रुपये वगैरे मिळणार नाहीत. दूरदृष्टी ठेवून प्रकल्प आखावे लागतील तेव्हाच काही कोटी रूपये मिळू शकतील. त्यासाठी अभ्यासकांनी विचार करण्यास हवा...

अहमदनगरचा भुईकोट (Ahmednagar Fort)

किल्ल्यांचे तीन मुख्य प्रकार गिरीदुर्ग, भुईदुर्ग आणि जलदुर्ग असे असतात. भुईदुर्ग म्हणजे अर्थातच जमिनीवरचा किल्ला किंवा भुईकोट. महाराष्ट्रात भुईदुर्गांचे प्रमाण कमी आहे. अशा भुईदुर्गांपैकी अहमदनगरचा भुईकोट हा गेल्या पाचशे वर्षांपेक्षा अधिक काळ अस्तित्वात आहे. इतकेच नाही तर वेगळ्या कारणांसाठी वापरात आहे. त्याने महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तो किल्ला मुघल, पेशवाई आणि ब्रिटिश काळात तुरुंग म्हणून वापरात होता. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद यांच्यासारखे ‘हाय प्रोफाईल्ड’ राजकीय कैदी त्या तुरुंगात बंदी होते. त्याच तुरुंगात नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’सारखा महत्त्वाचा बृहद्ग्रंथ लिहिला...

भगवानलाल इंद्रजी (Bhagwanlal Indraji)

पंडित भगवानलाल इंद्रजी (1839 - 1888) हे नाव सर्वसामान्य वाचकांना माहीत नसते. तसे ते माहीत असण्याचे कारणही नाही. भगवानलाल इंद्रजी हे मुळचे जुनागढचे. ते पुरातत्त्वशास्त्रज्ञ, शिलालेखांचे संशोधक आणि पुराणवस्तूंचे संग्राहक होते. ते मुळचे गुजरातचे असले तरी त्यांनी बरेचसे काम डॉ. भाऊ दाजी लाड यांच्याबरोबर केले. त्यांनी भारतभरच्या ब्राह्मी लिपीतल्या इतर असंख्य शिलालेखांचे वाचन केले आहे. पण त्यांचे नाव कायमचे जोडले गेले आहे ते रुद्रदमनच्या गिरनार येथील अडीच हजार वर्षांपूर्वीच्या शिलालेखाशी ! भगवानलाल इंद्रजींनी डॉ. भाऊ दाजी लाड यांचे साहायक म्हणून अनेक वर्षे काम केले. भाऊ दाजी यांनी त्यांच्या संशोधनासाठी, प्रवासासाठी, उत्खननासाठी निधी उपलब्ध करून दिला...