Home Search
नागपूर - search results
If you're not happy with the results, please do another search
अखिल भारतीय दलित परिषदेचे तिसरे अधिवेशन – नागपूर
अखिल भारतीय दलित महिला परिषदेचे तिसरे अधिवेशन नागपूर येथील मोहन पार्क येथे 18,19 जुलै 1942 रोजी भरले होते. परिषदेच्या अध्यक्ष सुलोचना डोंगरे (अमरावती) या...
नागपूरची नीरी – पाण्यासाठी प्यारी
देशात पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने कामे करणा-या ज्या संस्था आहेत, त्यातील आघाडीची आहे नागपूरची ‘नीरी’ (NEERI) म्हणजे ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था’. ‘नीरी’ ही पर्यावरण...
नागपूरची ‘माग्रस’ चळवळ
समाजातील वाचनवृत्ती कमी झाल्याची झळ नागपूरच्या ‘माग्रस’ चळवळीलादेखील लागली. ‘माग्रस’ (माझा ग्रंथ संग्रह) चळवळीने गेल्या त्रेचाळीस वर्षांपासून अनेकांची खासगी ग्रंथालये वाङ्मयीन दृष्ट्या सशक्त केली. नागपूरच्या त्या उपक्रमासोबत जुळलेल्या कुटुंबांची आयुष्याची सायंकाळ सुरू झाली आहे. त्यामुळे नव्या पिढीने तो वसा पुढे चालवावा, यासाठी ती चळवळ ‘नेटिझन फ्रेंडली’ होऊ पाहत आहे. इंटरनेटवरून आवडीच्या विषयावर वाचन करणा-या युवक-युवतींना ‘माग्रस’ने त्या विषयांवर बोलण्यास साद घातली आहे. परंतु देव यांच्याशी त्याबाबत विचारणा केली असता, त्यांच्या आवाहनास कोमट प्रतिसाद मिळत असावा असे जाणवले...
गुणवंत नगरकर यांची वॉश टेक्निक चित्रशैली !
गुणवंत नगरकर हे ‘बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल’ या, 1920 च्या दरम्यान सुरू झालेल्या भारतीय पुनरुज्जीवनवादी कला चळवळीतील एक महत्त्वाचे चित्रकार होत. ते जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये अध्यापक होते. त्यांनी त्यांचे स्वत:चे चित्रकलेतील प्रावीण्य पारदर्शक जलरंगांचे थर एकावर एक देऊन निर्माण होणाऱ्या ‘वॉश टेक्निक’ पद्धतीमध्ये मिळवले. त्यांनी ‘वॉश टेक्निक’ पद्धतीतील दर्जेदार चित्रनिर्मिती केली; त्या कलाशैलीचा विकास आणि प्रचार व प्रसारही केला...
सांगली कला/वस्तू संग्रहालयात उत्तम चित्रकृती (Sangli Art Museum)
महाराष्ट्रात तेरा शासकीय कला/वस्तू संग्रहालये आहेत. ती शासनाच्या पुरातत्त्व व वस्तू संग्रहालये विभागाच्या अधिपत्याखाली येतात. त्यामध्ये एकट्या कोल्हापुरात दोन संग्रहालये आहेत. बाकी गावे अशी - नागपूर, औरंगाबाद, सिंदखेडराजा, तेर, पैठण, नाशिक, माहूरगड, सातारा, औंध, सांगली, रत्नागिरी. त्याशिवाय खासगी संग्रहालये व संग्राहक यांची संख्या ही वेगळीच आहे. वस्तू संग्रहालयांतील कलावस्तू या महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा, सांस्कृतिक बहुविधतेचा आणि कलासंपन्न जीवनशैलीचा वारसा सांगत असतात. त्यामुळे संग्रहालये जपली जाणे- त्यांचे संवर्धन होणे हे महत्त्वाचे होय. त्यासाठी त्यांना लोकाश्रय मिळाला पाहिजे...
घंटीबाबांची दिग्रस नगरी कापसाची पंढरी
दिग्रस हा यवतमाळ जिल्ह्याच्या सोळा तालुक्यांपैकी एक. दिग्रस हे शहर पूर्वी ‘डिग्रस’ म्हणून ओळखले जात असे. त्याचे दिग्रस हे नाव कसे पडले, याबाबत काही दंतकथा आहेत. त्यांपैकी एक म्हणजे तेथील झाडापासून डिंकाचा रस जास्त मिळत असल्याने त्याचा अपभ्रंश डिग्रस असा झाला. कोणी ‘ग्रेसफुल’ अर्थाने, तर कोणी ‘दि ग्रेट’ अर्थाने दिग्रस या शब्दाचा अर्थ सांगतात. दिग्रस हे शहर यवतमाळपासून बहात्तर, अमरावतीपासून एकशेचौदा, तर नांदेडपासून एकशेअडतीस किलोमीटर अंतरावर आहे. दिग्रसने स्वत:चा वेगळा ठसा कृषी, राजकारण, कला, क्रीडा, अध्यात्म, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत उमटवला आहे...
दिवाळीच्या फराळाची खुमारी
दिवाळीतील आनंदाचा एक भाग म्हणजे एकाच वेळी खाण्यासाठी उपलब्ध होत असलेले आठ-नऊ प्रकारचे खमंग, तिखट व गोड पदार्थ बनवले किंवा विकत आणले जातात. त्या पदार्थ समूहाला दिवाळीचा ‘फराळ’ असे थाटाने आणि मानाने म्हटले जाते. मला फराळ प्रत्यक्ष खाण्यापेक्षा फराळाच्या पदार्थांनी ओसंडून वाहणारी दुकाने आणि दिवाळीपूर्वी घराघरांतून येणारे भाजणीचे आणि तळणीचे तिखटमधुर वास अधिक आवडतात. पहिला पदार्थ म्हणजे आमच्या घरच्या विदर्भातील चकल्या. आमच्या घरी दिवाळीसाठी म्हणून चिवडा, दोनतीन प्रकारचे लाडू, शंकरपाळी, करंज्या वगैरे अगोदर करून ठेवतात, पण चकल्या मात्र नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ताज्या करतात...
ताराबेन मश्रुवाला – माधानच्या दीपशिखा (Taraben Mashruwala changed the face of Madhan village)
ताराबेन मश्रुवाला या नाजुक-किरकोळ प्रकृतीच्या, व्रतस्थ ब्रह्मचारी स्त्रीने त्यांचे पूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी खर्ची घातले. त्यांनी विदर्भातील अमरावती जिल्ह्यात आडमार्गावर असलेल्या माधान या लहानशा खेड्याचा कायापालट केला. तेथे त्या आधी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा नव्हत्या. ताराबेन यांनी महात्मा गांधी यांचे ग्रामसुधारणेचे स्वप्न तेथे प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. माधान हे सातपुडा डोंगर पायथ्याशी वसलेले ओसाड असे खेडेगाव आहे. ते महाराष्ट्रात ‘आदर्श ग्राम’ रूपात आणि सामाजिक कार्याच्या रूपात नावाजले गेले...
कोळगाव – जोड पाच तालुके, चार जिल्हे यांची
कोळगाव हे जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील मध्यवर्ती असे महत्त्वाचे गाव आहे. ते गाव एकटे, सुटे असे नाही; त्याला लागून पूर्वेला पिंप्रीहाट नावाचे गाव एक किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे गाव कोळगाव-पिंप्री या नावाने ओळखले जाते. एस टी स्टँडवर उतरल्यावर तेथील गजबजलेला परिसर पाहून गाव खूप मोठे आहे असा प्रथमदर्शनी भास होतो. स्टँड परिसर आणि त्याच्या आसपासची दुकाने, हॉटेले हे सारे दोन्ही गावांना सामायिक उपयोगी येते. पिंपरी या गावाचे नाव कागदोपत्री पिंप्रीहाट असे आहे. कोळगाव पिंप्री हे गाव शिंदी कोळगाव या नावानेही प्रसिद्ध आहे...
संतनगरी आकोट (Akot- City of Saints from Vidarbha)
आकोट हे गाव विदर्भाच्या अकोला जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. ते संतनगरी म्हणूनच ओळखले जाते. तेथे श्री नरसिंग महाराज यांचे वास्तव्य होते. ते शेगावचे गजानन महाराज यांचे समकालीन संत व गुरुबंधू होते. त्या दोघांमध्ये स्नेहबंध घट्ट होता. गजानन महाराज नरसिंग महाराजांना भेटण्यास आकोट येथील त्यांच्या ‘झोपडी’त येत असत; त्या दोघांच्या आध्यात्मिक चर्चा चालत असत. त्या संबंधात विविध दंतकथा आहेत. गजानन महाराजांनी मनकर्णिका व दुसरी अकोलखेडची विहीर, या दोन विहिरींना पाणी आणून आकोट परिसरात सुबत्ता निर्माण केली अशीही कहाणी आहे...