Home Search
नरेंद्र दाभोलकर - search results
If you're not happy with the results, please do another search
एक आयुष्य, चळवळीतील -नरेंद्र दाभोळकर
एखाद्या व्यक्तीचं आयुष्य हाच एखाद्या चळवळीचा, संस्थेचा इतिहास बनण्याची परंपरा महाराष्ट्राला नवीन नाही.
डॉ. नरेंद्र दाभोळकर हे असेच एक नाव. अंधश्रध्दा निर्मूलन आणि दाभोळकर हे...
जी.व्ही. – आप्पा मंडलीक – गरिबांचे डॉक्टर (G V Mandalik- Dapoli’s doctor with heart)
डॉ.जी.व्ही. ऊर्फ आप्पासाहेब मंडलीक यांचे शिक्षण मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून झाले. त्यांनी त्यांचा वैद्यकीय व्यवसाय एम बी बी एस झाल्याबरोबर, 1939 साली सुरू केला. डॉ. जी.व्ही. हे दापोलीतील पहिले एम बी बी एस डॉक्टर होत. डॉ. जी.व्ही. यांचा विवाह पुण्याच्या शकुंतला गोखले यांच्याशी 1939 सालच्या डिंसेबर महिन्यात झाला. तो प्रेमविवाह होता. दोघेही एकमेकांना ओळखत होते. लग्नानंतर त्या शैलजा ऊर्फ शैला मंडलीक झाल्या. कोकणासारख्या ठिकाणी त्या काळी वैद्यकीय व्यवसाय करणे खूप कठीण होते. दापोली हे जरी तालुक्याचे ठिकाण असले तरी खेडेगावासारखे होते. डॉक्टर आप्पांना सायकलने वा पायी जाऊन त्यांचे रुग्ण तपासावे लागत होते...
सदाशिव अमरापूरकर यांचे समाजभान (Sadashiv Amrapurkar His Acting Talent And Social Consciousness)
सदाशिव अमरापूरकर यांचे व्यक्तिमत्त्व असण्यापेक्षा ‘दिसण्या’वर भाळणाऱ्या सिनेमासारख्या चंदेरी दुनियेला अजिबात मानवणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या जगात वावरूनही स्वत:च्या प्रतिमेपेक्षा स्वत:च्या प्रतिभेवर विश्वास ठेवला आणि रूढी-चौकटी मोडून स्वत:साठी वेगळी वाट निवडली. त्यांनी सिनेमात करियर केली. पण ते स्वत:च्या विचाराने व स्वत:च्या शैलीने जगले. त्यांनी लोकप्रियता हा सगळ्यात महत्त्वाचा गुण मानल्या गेलेल्या सद्य काळात मूल्ये महत्त्वाची मानली. ते अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील अमरापूर गावातून आले होते...
नास्तिक आहे… म्हणूनच मस्त जगतो !
ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल स्पष्ट भूमिका घेणारे लोक जगात फार थोडे असतात; परंतु देव आहे की नाही याबाबत विचार करणारे लोक भरपूर असतात. किंबहुना, अगदीच भाविकभाबडे लोक वगळले तर प्रत्येक व्यक्तीच्या मनात कोणत्या ना कोणत्या प्रसंगी ‘देव मदतीला येईल का ? पण देव असेल तरच ना !’ असा प्रश्न उद्भवत असतो. त्याचे प्रमुख कारण माणसाची दुर्बलता व म्हणून हतबलता हेच असते. तथापि काही कणखर माणसे कोणत्याही संकटप्रसंगी मनाचा निर्धार कायम ठेवून केवळ बुद्धीने विचार करून निर्णय घेतात. अशाच बुद्धिनिष्ठ, तार्किक विचार करण्याची शक्ती कमावलेल्या लेखकाने तो नास्तिक कसा बनत गेला याची कहाणी येथे सांगितली आहे...
मनोज पवार यांचा स्मशानातील वाढदिवस !
दापोलीचे पत्रकार मनोज पवार यांनी त्यांचा वाढदिवस स्मशानात करण्याचा उपक्रम सलग पंचवीस वर्षे राबवला ! ते मध्यरात्रीच्या सुमारास तथाकथित भुताखेतांना न घाबरता स्मशानात जात व तेथे केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करत. कधी त्यांचे मित्र त्यांच्याबरोबर असत. पण तो मुख्यत: सणकीत केलेला एकांडा पराक्रम होता...
नास्तिकांची दापोली
कोकणी माणूस त्याचे कुळाचार, त्या त्या समाजाने ठरवलेल्या रूढी-प्रथा-परंपरा कटाक्षाने पाळणारा आहे. कोकणवासी मंडळी धार्मिक सण-उत्सव यांत वर्षभर मग्न व दंग असतात. तरीही दापोली तालुक्यातील नास्तिक नमुने त्यांच्या वेगळेपणाने उठून दिसतात याचा मला अचंबा वाटत आला आहे. दापोलीतील निरीश्वरवादी मंडळींवर उपजत चिकित्सक वृत्ती, वाचन, नास्तिक मंडळींचा सहवास आणि समाजवादी धोरण या घटकांचा प्रभाव दिसून येतो...
…आणि भैरवनाथाच्या धडका बंद झाल्या!
दलितांकरवी फलटण तालुक्याच्या गुणवरे आणि जावली या गावांत धडका घेण्याची अघोरी प्रथा दीडशे वर्षांपासून सुरू होती. ती अमानुष प्रथा नष्ट करण्यासाठी महादू गेणू आढाव या लढाऊ कार्यकर्त्याने दलित बांधवांची मोट बांधून, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने कसोशीचे प्रयत्न केले. अखेरीस प्रशासकीय यंत्रणेच्या साहाय्याने धडका प्रथा बंद करण्यात यश 2006 साली मिळाले...
जाणता राजा अशोक (King Ashoka The Emperor)
भारतातील मौर्य साम्राज्यातील काही कर्तबगार राजांपैकी अशोकाची राजवट प्रदीर्घ व अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. पण अशोक इतिहासात खूप काळ दुर्लक्षित राहून विस्मृतीत फेकला गेला होता. आधुनिक इतिहासकारांचेत्याच्याकडे लक्ष गेले.
मधुकर गीते – व्यसनमुक्तीसाठी तीळ तीळ आयुष्य
मधुकर गीते! ते नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील मेंडीचे. त्यांनी ‘सहारा व्यसनमुक्ती केंद्रा’च्या माध्यमातून त्या कामाचा शिस्तबद्ध आराखडा मांडलेला आहे. व्यसनाधीन व्यक्तींचे दु:ख त्यांच्या थेट...
शबनम
सांगलीहून मिरजेला जाताना उजव्या आणि डाव्या बाजूंना कुष्ठरोगातून मुक्त झालेल्यांसाठी काही पुनर्वसन केंद्रे आहेत. त्या केंद्रांमध्ये अनेक वर्षांपासून शबनम बॅगा तयार केल्या जातात. त्या...