Home Search
देवी - search results
If you're not happy with the results, please do another search
मुखवट्यातून उभ्या केलेल्या चार देवींची यात्रा
मुरूड, आंजर्ले व वेळास ही गावे दुर्गादेवीच्या, तर केळशी महालक्ष्मीच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. ती चारही गावे तीनशे वर्षांपासून या यात्रांनी एकमेकांशी जोडली गेली आहेत. यात्रांच्या शेवटच्या दिवशी रथयात्रा निघते, त्या दरम्यान प्रत्येक जातीजमातीतील एका ज्येष्ठ व्यक्तीला मानाचा विडा देऊन सन्मानित करण्याची रीत आहे. विनायक बाळ यांनी दापोली तालुक्यातील या चार गावांत मुखवट्यातून उभ्या करण्यात येणाऱ्या चार देवींच्या यात्रांचे वेगळेपण या लेखातून मांडले आहे...
दुर्गादेवीचा दुष्काळ ( Ill famous famine of Durgadevi in thirteenth century)
बाराव्या आणि तेराव्या शतकांच्या काठावर तेरा वर्षे महाराष्ट्रात सतत दुष्काळ होता. त्या दुष्काळात लाखा वंजारींमधील दुर्गादेवी या कर्तबगार महिलेने त्या काळच्या बिहार या गंगेच्या काठच्या प्रदेशातून धान्य आणून महाराष्ट्रातील समाज तेरा वर्षे अखंड वाहतूक करून जगवला! ती लाखा बैलांची वाहतूक इकडून तिकडे उत्तरेत नेऊन करत असे. महाराष्ट्रात तिचा सर्वत्र उल्लेख त्या काळापासून ‘दुर्गादेवी’ असा होऊ लागला. त्या काळाच्या इतिहासात तो ‘दुर्गादेवीचा दुष्काळ’ असे म्हटले जाऊ लागले...
केळशी देवीचा उत्सव : समाजजीवनाचे प्रतिबिंब
केळशीच्या महालक्ष्मी मंदिराचा उत्सव खूपच मोठा असतो. मंदिर हा पेशवेकालीन वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. उत्सवास केवळ धार्मिक स्वरूप नाही; तर त्यातून केळशी गावाचे समाजजीवन प्रतिबिंबित होते. उत्सव चैत्रशुद्ध अष्टमी ते पौर्णिमा या कालावधीत होतो.
राजाळेच्या जानाई देवीचा यात्रोत्सव
राजाळे गावात मंदिरे जरी अनेक असली तरी जानाई देवीचे स्थान अनन्य आहे. मंदिरामुळे गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे. भाविक श्री क्षेत्र राजाळे नगरीत कर्नाटक, विजापूर, अहमदनगर, परभणी, बीड, चंद्रपूर या ठिकाणांहून येत असतात...
मसुरेची भराडीदेवी यात्रा (Masure’s Bharadidevi Festival)
मसुरे गावाचे मुख्य आकर्षण म्हणजे आंगणेवाडी येथील भराडीदेवीचे मंदिर आणि तेथे फेब्रुवारी-मार्च दरम्यान भरणारी दरवर्षीची देवीची जत्रा. भराडीदेवीविषयी कथा अनेक प्रचलित आहेत. त्यांपैकी एक कथा पेशवाईशी जोडली गेली आहे. स्वतः चिमाजीअप्पांना एका मोहिमेदरम्यान भराडीदेवीचा कृपाशीर्वाद लाभला होता. म्हणून त्यांनी बावीस हजार एकर जमीन देवळासाठी दान केली...
बिळवसचे सातेरी देवीचे जलमंदिर (Sateri Temple surrounded by water at Bilwas-Konkan)
कोकणात सातेरी देवीची मंदिरे अनेक, परंतु मालवण तालुक्यातील बिळवस सातेरी मंदिर हे अधिक प्रसिद्ध आहे, कारण कोकणात आढळणाऱ्या सातेरी देवींच्या मंदिरांपैकी ते एकमेव असे जलमंदिर आहे - त्या देवीचा आषाढ महिन्यात जत्रोत्सव होतो. ती मसुरे गावातील बारा वाड्यांची ग्रामदेवता आहे. श्री सातेरी देवीचे जलमंदिर सुमारे सातशे वर्षांपूर्वी उभारले आहे !...
जलदेवी अमला रुईया व त्यांचा आकार ट्रस्ट (Amla Ruia’s water conservation work with Aakar...
अमला रुईया हे व्यक्तिमत्त्व भारतात पाण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये परिचित आहे. त्या या कार्याकडे राजस्थानात पडलेल्या दुष्काळांनी (1999-2000 आणि 2003) वळल्या.
शीतलादेवीचा शांतरस! (Goddess Shitaladevi)
ग्रामदेवतांचे शेंदूर फासलेले ओबडधोबड आकारातील तांदळे गावोगावच्या वेशींवर पाहण्यास मिळतात. त्यांची नावे म्हसोबा, विरोबा, वेताळदेव, बापदेव, गावदेवी यांसारखी असतात. ‘शितलादेवी’ अथवा ‘शीतळादेवी’ ही त्या देवतांपैकी वैशिष्टयपूर्ण देवता.
उग्रतारा चामुंडा देवी
चामुंडा हे देवीचे क्रूर रूप होय. ते सर्व भारतभर मान्य आहे. चामुंडेच्या त्या रूपात अमंगल, बीभत्स व भयानक यांचे जणू काही संमेलन आहे. कारण...
वणी येथील सप्तशृंगी देवी (Saptashrungi Devi)
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या ‘वणी’ या गावाजवळील सप्तशृंगगडावरील देवीचे स्थान हे आदिशक्तीचे मूळ स्थान असून ते साडेतीन पीठांतील अर्धपीठ आहे असे म्हटले आहे.
एकपीठ ते तुळजापूर...