Home Search

देगाव - search results

If you're not happy with the results, please do another search

कोकणी घराचा नमुना देगावला (Typical layout of a Konkan house at Degaon)

0
रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील देगाव गावात 1941 रोजी बांधलेली एक आगळी वास्तू आहे. तीन बाजूंना पऱ्ह्याचे जणू नैसर्गिक कुंपण आणि समोरच्या बाजूला लालचुटुक मातीचा रस्ता… ते गावाच्या मधोमध वसलेले कौलारू घर आहे इंदिराबाई विद्याधर गोंधळेकर यांचे. सध्या तेथे त्यांचा मुलगा अशोक गोंधळेकर एकटे राहतात. ते व्यवसायाने इंजिनीयर आहेत. ते त्यांच्या मुंबईतील व्यवसायातून निवृत्त झाल्यावर वास्तू व बाग सांभाळण्यास गावी परतले...

स्वच्छ आल्हाददायक हवेचे देगाव (Degaon village for clean and pleasant weather)

दापोली तालुक्यातील देगाव दापोली आणि खेड या दोन्ही तालुका शहरांपासून सुमारे तीस किलोमीटर दूर आहे; समुद्र सपाटीपासून उंचावर आहे. त्यामुळे थंड हवेचे व निसर्गसौंदर्याने नटलेले असे निरव शांततेचे आहे. तेथील सकाळ व संध्याकाळ विविध पक्षांच्या किलबिलाटाने आगळी असते. दक्षिणेकडील डोंगर-रांगेच्या कुशीत भर दुपारीही उन्हाला मज्जाव करणारे पाचकुडीचे दाट जंगल आहे. गावात भडवळ टेप, रावण टेप अशा टेकड्या आहेत...

देगावच्या विवेकवादी समाजसेविका: स्मिता जोशी

स्मिता जोशी या सर्वसामान्य शिक्षिकेने तळागाळातील वंचित आदिवासी समाजासाठी अठ्ठावीस वर्षे सातत्याने काम केले, ही त्यांची ओळख. त्यांनी 15 ऑगस्ट 1981 रोजी कर्जतजवळील कोंदिवडे या गावी ‘बांधिलकी’ ही सेवाभावी संस्था स्थापन केली. त्यांनी ‘बांधिलकी’चे काम स्त्रीला शिक्षित करणे, तिचे वैचारिक प्रबोधन करणे व तिला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे या त्रिसूत्रीवर उभे केले, स्थिर केले व फुलवले...

देगावच्या वहिनी – इंदिराबाई गोंधळेकर (Indira Gondhlekar – Progressive Lady from Degav)

0
देगाव गावाचा आदर्श; आरोग्याचा, बुद्धिमत्तेचा, सुधारक, पुरोगामी विचारांचा ‘आयकॉन’ म्हणजे इंदिराबाई गोंधळेकर तथा वहिनी. त्यांच्या वयाच्या अवघ्या छत्तिसाव्या वर्षी पतीचे अकस्मात निधन झाले. त्यानंतर सर्व कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. इंदिराबार्इंनी प्रापंचिक जबाबदाऱ्या निभावताना कर्तव्य हीच देवपूजा, माणुसकी हाच धर्म ही मूल्ये आयुष्यभर जपली...

पियूची वही : गोष्टीमागची गोष्ट… (Piyu’s journal: The story behind a story...

आईनस्टाईन यांनी लिहिलेले एक सुपरिचित वाक्य आहे ‘जर तुमची मुले बुद्धिमान व्हावीत, असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांना परीकथा वाचायला द्या… जर तुम्हाला ती आणखी बुद्धिमान व्हावीत असे वाटत असेल, तर त्यांना आणखी परीकथा वाचायला द्या’. त्यामुळे छोट्या मुलांचे अवकाश वाढीला लागते, कल्पनाशक्ती विकसित होते, अनुभव घेण्याची उर्मी वाढते. संगीता बर्वे यांनी लिहिलेल्या ‘पियूच्या वही’ने छोट्यांच्या विश्वात असाच अवचित प्रवेश केला आहे. त्यातल्या छोट्या पियूने जे जे केले ते ते करायला उत्सुक असणारी मुले. गोष्टी छोट्या पण आशयघन बदल घडवू शकणारे छोट्यांचे सगळे अनुभव. त्यातून त्यांच्या स्वतंत्र वह्या निर्माण झाल्या. असे सकस वाचन वाऱ्याच्या वेगाने फैलावले तर मोबाईल आणि इंटरनेटमध्ये अडकून कोसळणारे लहानांचे बाल्य सावरायला नक्की मदत होईल...

थोरोच्या गावात रजनी देवधर (Rajani Deodhar in Thoreau’s Village)

मी लॉकडाऊन काळातील धावत्या नोंदींमध्ये लिहित असलेल्या काही लेखांबाबत विशेष औत्सुक्य येणाऱ्या प्रतिसादावरून जाणवते. ते प्रल्हाद जाधव याच्या 'थोरो-दुर्गा भागवत भेटी'च्या कल्पनेबाबत तसेच घडले. त्यावर प्रतिक्रिया वेगवेगळ्या स्तरांतून वेगवेगळ्या प्रकारच्या आल्या.
_Man_manatil_Gavgatha_1.jpg

मना मनांतील गावगाथा!

0
प्रत्येकाच्या मनात गावाबद्दलच्या आठवणी दाटलेल्या असतात. प्रत्येकाला त्या कोठेतरी मांडाव्यात, कोणीतरी वाचाव्यात आणि मुख्य म्हणजे त्या लिहाव्यात असे वाटत असते. आपल्या गावाविषयी लिहिणे-बोलणे यामागे...

सोलापूर शहरातील वास्‍तू आणि वैशिष्‍ट्ये

सोलापूर कर्नाटकच्या सीमेवर वसले आहे. सोलापुरात बहुभाषिक नागरिक आहेत. त्यास हजार वर्षांचा इतिहास आहे. ते पूर्वी सोन्नलगी या नावाने प्रसिद्ध होते. बाराव्या शतकात श्रीशिवयोगी...

वाळुज गावची मंदिरे

मोहोळ तालुक्यातील वाळुज येथे महादेवाचे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. ते वाळकेश्वर या नावाने ओळखले जाते. मंदिराच्या प्रवेशद्वारात महाकाय दगडी गणपती व नंदी आहे. मंदिराशेजारी...
carasole

वीरगळ – इतिहासाचे अबोल साक्षीदार

ग्रामदेवतांच्या, शिवलिंगांच्या (शिवमंदिरांच्या) ठिकाणी मंदिराच्या मागील बाजूस, दीपमाळेजवळ शतकानुशतकांपासून ऊन-पाऊस-वारा सोसत, झिजत असलेले वीरगळ ही इतिहासाची मोठी साक्ष आहे. पण ते काय घटना सांगतात...