Home Search
दिल्ली - search results
If you're not happy with the results, please do another search
एकनाथ आव्हाड – दापूर ते दिल्ली…
एकनाथ आव्हाड यांना ‘साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार’ घोषित झाला. त्यांचा समावेश आघाडीच्या बाल साहित्यकारांमध्ये होतोच. पुरस्काराने त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यांनी त्यांचा जीवनप्रवास नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील दापूर या छोट्या खेड्यातून सुरू केला. नरेंद्र पाठक यांनी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यावर त्यांच्याशी गप्पा मारण्याचे ठरवले. कायम शाळेत, पुस्तकात आणि मुलांमध्ये रमणारा हा सरस्वतीपुत्र; त्यांनी त्यांच्या बालपणापासूनची कथा सांगितली आहे...
गुणाकर मुळे- शिंदी ते दिल्ली
अचलपूर तालुक्यातील शिंदी बुद्रुक या गावी जन्मलेले आणि गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले गुणाकर मुळे यांनी विज्ञान लेखन साहित्यात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी मराठी भाषिक असूनही दिल्लीत हिंदी आणि इंग्रजीतून लेखन केले आहे...
जाणता राजा – हिंदीमध्ये, दिल्लीत!
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या ‘जाणता राजा’ या महानाट्याचे हिंदीतून पहिल्यांदाच सादरीकरण झाले, तेही थेट लाल किल्ल्यावर ! नाटकाचे प्रयोग एप्रिल महिन्यात 6 ते...
लिबरल आर्ट्सचा अभ्यास – नवे आव्हान
लिबरल आर्ट्स ही शाखा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात नव्याने उदयास आली आहे आणि फोफावत आहे. प्रतिष्ठाप्राप्त महाविद्यालये, विद्यापीठे आणि नव्याने उदयास आलेली खाजगी विद्यापीठे यांनी लिबरल आर्ट्स हा मुक्त अभ्यासक्रम दशकभरापूर्वी सुरू केला. ज्ञानशाखांची नावे काळाप्रमाणे बदलत राहतात. पूर्वी या शाखेस ढोबळपणाने कला (आर्ट्स) किंवा काही ठिकाणी मानव्यविद्या शाखा असे म्हटले जाई. त्यात फरक होता - त्या शिक्षणक्रमास मर्यादा होती. पण आता, त्यांच्याऐवजी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर लिबरल आर्ट्स शाखेमध्ये प्रवेश घेण्याचा विद्यार्थ्यांचा ओढा दिसू लागला आहे. गेल्या दशकभरात प्रथम वर्ष पदवीला नव्वद टक्के गुणांना प्रवेश बंद होत आहेत. बदलत्या काळात ज्ञानशाखांच्या कक्षा रुंदावल्या. पालकांच्या व मुलांच्या दृष्टिकोनात बदल झाला...
गुणवंत नगरकर यांची वॉश टेक्निक चित्रशैली !
गुणवंत नगरकर हे ‘बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल’ या, 1920 च्या दरम्यान सुरू झालेल्या भारतीय पुनरुज्जीवनवादी कला चळवळीतील एक महत्त्वाचे चित्रकार होत. ते जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये अध्यापक होते. त्यांनी त्यांचे स्वत:चे चित्रकलेतील प्रावीण्य पारदर्शक जलरंगांचे थर एकावर एक देऊन निर्माण होणाऱ्या ‘वॉश टेक्निक’ पद्धतीमध्ये मिळवले. त्यांनी ‘वॉश टेक्निक’ पद्धतीतील दर्जेदार चित्रनिर्मिती केली; त्या कलाशैलीचा विकास आणि प्रचार व प्रसारही केला...
रियाझुद्दीन अब्दुल गनी शेख यांचे वारीनृत्य
वारकरी संप्रदायातील हरीभक्त परायण राजुबाबा शेख यांनी वारीनृत्य महाराष्ट्रात लोकप्रिय केले. वारीनृत्याची कल्पनाच त्यांची. राजुबाबा कीर्तन, अभंगगायन लहानपणापासून करत, पण त्यांना वारीनृत्याची कल्पना गुजरातचे कलावंत शेखावत यांच्याकडून मिळाली. शेखावत त्यांच्या भवनीभवई प्रयोगात पितळी परातीत नृत्य करत गात; कधी तलवारीच्या पात्यावर त्यांचे नृत्य असे. राजुबाबा यांनी ताटलीत नाचत अभंग गाण्याचा प्रयोग सुरू केला. नंतर ते डोक्यावर कळशा/हंडे यांचे तीनचार थर घेऊन नृत्यगायन करत आणि भक्तिरसात डुंबून जात. त्यांचा तो खेळ लोकप्रिय झाला...
गोपीनाथ पाटील : ठाणे-कळव्याचे ध्यासपर्व (Gopinath Patil’s dedicated work for Kalawa area)
ठाण्याजवळच्या कळवा गावचे गोपीनाथ पाटील हे ध्येय व ध्यास घेऊन सार्वजनिक जीवनात वावरले. त्यांच्या कार्यासाठी त्यांचे परवलीचे सूत्र होते, सहकार ! तेच कार्यसूत्र, खरे तर, स्वातंत्र्योत्तर काळातील संस्था, उपक्रम यांच्या स्थापनेत होते. गोपीनाथ यांच्यामुळे अनेक उपक्रम स्वतःच्या पायावर कळवा परिसरात भक्कमपणे उभे आहेत. ती त्यांच्या कार्याची पावती होय.
ते ज्या कळवा गावात राहत होते ते गाव ठाणे या शहराला लागून असूनसुद्धा अनेक सुविधांपासून दूर होते. कळवावासीयांना दैनंदिन व्यवहारिक गरजा भागवण्यासाठी ठाण्याची वाट तुडवण्याला पर्याय नव्हता. कळव्यातील ते अंधारयुग नष्ट करण्यासाठी आंतरिक तळमळीने उभे राहिले ते गोपीनाथ पाटील. त्यांच्या सार्वजनिक कार्यातून उभ्या राहिल्या अनेकानेक संस्था...
बहिष्कृत भारत : दलितत्वाची नवी जाणीव (Bahishkrut Bharat- Babasaheb Ambedkar’s thought breaking...
बाबासाहेब आंबेडकर त्यांचा अभ्यास पुन्हा सुरू करण्यासाठी लंडनला 1920 साली जुलै महिन्यात गेले. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेतला. बाबासाहेब स्वत: शिक्षण घेत असतानाही भारतात काम करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करत राहिले. त्यांनी जर्मनीलाही प्रवास केला. तेथे त्यांनी बॉन विद्यापीठात संस्कृतचा अभ्यास केला. लंडनमध्ये, त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या मेळाव्यात ‘भारतातील जबाबदार सरकारच्या जबाबदाऱ्या’ नावाचा विचारप्रवर्तक शोधनिबंध सादर केला. त्यांची मुख्य चिंता भारतातील एक तृतीयांश लोकसंख्येतील अस्पृश्य आणि बहिष्कृत लोकांचे भवितव्य ही होती...
अकोल्याच्या आसदगडाचा बनला पार्क !
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, किल्ला भारतीय पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली आला. आसदगड किल्ला 1955 अखेर मोडकळीस आला होता. तेथील वातावरण भयाण झाले होते. संध्याकाळी त्या ठिकाणी जाण्याची भीती वाटत असे. अशा ओबडधोबड व कोणत्याही प्रकारची देखरेख नसलेल्या बागेचा प्रारंभिक विकास अकोल्यातील नेहरू पार्कप्रमाणे ‘भारत सेवक समाजा’च्या स्थानिक शाखेच्या संयोजक वीणा गोयंका यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला . त्यात स्त्री कार्यकर्त्यांचा वाटा मोठा होता...
उदयन वाजपेयींची संवादयात्रा- शम्सुर्रहमान फारूकी (Udayan Vajpayee Interviews: Shamsur Rahman Faruqi)
उदयन वाजपेयी हे हिंदीमधील आघाडीचे लेखक. त्यांनी त्यांच्या दीर्घ लेखन कारकिर्दीत कथा, कविता, कादंबरी, प्रवासवृत्तांत-समीक्षात्मक निबंध, अनुवाद असे अनेकविध साहित्यप्रकारांमध्ये लेखन केले आहे. त्यांनी स्वत:च्या लेखनाबरोबरच समकालीन प्रतिभावंतांचे विचारविश्व जाणून घेण्याच्या उद्देशाने काही दीर्घ मुलाखती घेतल्या आहेत. त्या मुलाखतींपैकी शम्सुर्रहमान फारूकी यांच्या मुलाखतीविषयी परिचयात्मक लेख निरंतर वाचक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नितीन वैद्य यांनी लिहिला आहे...