Home Search
तृतीयपंथी - search results
If you're not happy with the results, please do another search
पंढरपूरची पालवी… स्पर्श मायेचा… (Palawi from Pandharpur)
एचआयव्ही एडसग्रस्त अनाथ बालकांच्या संगोपनाकरता मंगलताई शहा यांनी 2001 मध्ये पंढरपूरमध्ये ‘पालवी’ नावाची संस्था स्थापन केली. दोन मुलांच्या प्रवेशापासून सुरू झालेली ही संस्था आता बहू अंगांनी विस्तारली आहे. संस्थेने या मुलांकरता स्वत:ची शाळा, गोशाळा सुरू केली आहे. एडसग्रस्त अनाथ बालकांबरोबरच अत्याचार पीडित कुमारी माता, मनोरुग्ण माता, विवंचनेने पीडित स्त्रिया यांचा तात्पुरता किंवा कायमस्वरूपी सांभाळ केला जातो. परित्यक्ता, विधवा, वृद्ध, मनोरूग्ण यांना आधार दिला जातो. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई काम, शेती काम, प्लंबिंग इत्यादी कामे त्यांना शिकवली जातात. याखेरीजही संस्थेतर्फे वंचितांकरता अनेक प्रकल्प राबवले जातात...
नवा मानुष वाद
एकविसाव्या शतकाने लैंगिकतेच्या उधाणाचे, नातेसंबंधांच्या बाजारीकरणाचे आणि क्षणभंगुरतेचे वादळ आणले आहे, हे खरे आहे. परंतु ते पचवले जाईल आणि स्त्री-पुरुष व अन्य ह्यांनी परस्परांसोबत प्रेम, आदर व जिव्हाळा या भावनेने राहवे, शोषण व नियंत्रण ह्यांपासून मुक्त, निरामय जीवन जगावे ही आस कोणत्याही शतकात कायमच राहील. ‘नवा पुरुष’ समाज आणि साहित्य ह्यांच्या दृष्टिक्षेपात यावा व तो इतका व्यापक व्हावा की त्याचे ‘नवे’पण सार्वजनिक होऊन जावे...
एकविसाव्या शतकातील स्त्री-पुरुष संबंध
जागतिकीकरणाच्या तीन दशकांत झालेल्या अनेक बदलांपैकी सर्वात महत्त्वाचा व मूलभूत बदल भारतीय समाजाच्या लैंगिकताविषयक धारणा व प्रत्यक्ष व्यवहार ह्यांत घडून आला आहे. ह्या परिवर्तनामुळे लैंगिकता व लैंगिक संबंध ह्यांचा पोतच नव्हे, तर आशयदेखील बदलला आहे. जागतिकीकरणानंतर भारतात अनेक पातळ्यांवर परिवर्तन झाले. त्यांपैकी काही बदल उत्पाती व प्रपाती स्वरूपाचे आहेत. त्यांतील मूलभूत स्वरूपाचा, पण सर्वात दुर्लक्षित बदल हा भारतीयांच्या लैंगिकताविषयक जाणिवा, धारणा व व्यवहार ह्यांत झाला आहे. त्या प्रक्रियेची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली व त्याचे लक्षणीय परिणाम एकविसाव्या शतकात जाणवू लागले. ती प्रक्रिया अजून संपलेली नाही...
ठाणे कट्ट्याचे इवलेसे रोप… (Thane Park Discussion Group grows bigger along with the time)
संपदा वागळे आणि त्यांच्या मैत्रिणी यांनी एकत्र येऊन ठाण्यात ‘आचार्य अत्रे कट्टा’ सुरू केला. त्यांनाही त्यांच्यातील अनभिज्ञ असलेल्या विचारांची, क्षमतेची ओळख त्या कट्ट्याने करून दिली. त्या कट्ट्याने त्यांना नवे विचार दिले, माणसे दिली, मैत्र दिले, अनुभव दिले आणि प्रसिद्धीही दिली. अशा त्या सुसंस्कृत कट्ट्याची ओळख लेखाद्वारे करून घेणार आहोत...
वऱ्हाडातील वास्तूंची बुरूजसाद
वऱ्हाड प्रांतातील पुरातत्त्वीय स्थानांचा परिचय विवेक चांदूरकर या युवा संशोधकाने ‘उद्ध्वस्त वास्तू - समृद्ध इतिहास’ या पुस्तकात करून दिला आहे. या पुस्तकातील प्रत्येक नोंद ही ऐतिहासिक दस्तावेज ठरावा इतके मूल्य असलेली आहे. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभला आहे...
नदीष्ट – नदीकाठच्या निसर्गाची निरागसता (Nadishta – Marathi novel that depicts life along the...
कवी मनोज बोरगावकर यांनी त्यांच्या नदीकाठच्या वेगवेगळ्या जीवनानुभवांची गाथा ‘नदीष्ट’ या कादंबरीतून साकार केली आहे. नदीकाठचे जनजीवन तेथील अनेकस्तरीय तळकोपऱ्यांसह कादंबरीत अधोरेखित झाले आहे. माणसाने त्याचे निसर्गाशी असणारे नाते जवळपास संपुष्टात आणले आहे. त्याने नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळे आणले, भरमसाठ वाळू तिच्या उदरातून उपसली, पाणी दूषित केले. जंगले तोडून टाकली...
हिजड्यांच्या टाळीला समाजाची हाळी! (Transgender Community and Social Reaction)
मुलं पहिली-दुसरीच्या वर्गात अक्षरओळख शिकत असताना ‘छ’ अक्षर आलं की दोन शब्द हमखास सांगतात ‘छत्री’ आणि ‘छक्का’. छक्का म्हणत असताना मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या चोरट्या हसण्यात त्यांचा ‘छक्का’ या शब्दाबद्दलचा, तो शब्द धारण करणाऱ्या व्यक्तींबद्दलचा भाव लपलेला असतो.
लिंगभावाची समानता आणि संवेदनशीलता (Gender Equality and Sensitivity)
मुल जन्माला आले, की त्याची ओळख स्त्री, पुरूष अशी होत असते. मात्र मानवी सजीवाला त्याची/तिची लिंग ओळख अकरा ते चौदा या वयात होते. त्यांच्यात त्या वयात शारीरिक आणि मानसिक बदल होत जातात. त्याच वेळी एकाद्या मुलग्याला त्यांच्यात ‘तो’ नाही याची जाणीव होते.
माळेगावची जत्रा
भारतीय व्यापार, संस्कृती, परंपरा व त्यासाठी असलेले धार्मिक अधिष्ठान यांचा भव्य भारतीय उत्सवात अनुभव पहिल्यांदाच घेतला! खंडोबा हे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही प्रदेशांतील बहुसंख्य...
विवाहसंस्थेचा इतिहास’ तपासताना…
एक इतिहासाचार्य आणि उथळ असण्याचा परमोच्चबिंदू यांची एकत्र आठवण का होईल? पण आली. राजवाड्यांचं ‘विवाहसंस्थेचा इतिहास’ परत एकदा वाचताना! राजवाड्यांनी जे काही लिहिलंय ते वाचून...