Home Search

ठाणे - search results

If you're not happy with the results, please do another search

गोपीनाथ पाटील : ठाणे-कळव्याचे ध्यासपर्व (Gopinath Patil’s dedicated work for Kalawa area)

ठाण्याजवळच्या कळवा गावचे गोपीनाथ पाटील हे ध्येय व ध्यास घेऊन सार्वजनिक जीवनात वावरले. त्यांच्या कार्यासाठी त्यांचे परवलीचे सूत्र होते, सहकार ! तेच कार्यसूत्र, खरे तर, स्वातंत्र्योत्तर काळातील संस्था, उपक्रम यांच्या स्थापनेत होते. गोपीनाथ यांच्यामुळे अनेक उपक्रम स्वतःच्या पायावर कळवा परिसरात भक्कमपणे उभे आहेत. ती त्यांच्या कार्याची पावती होय. ते ज्या कळवा गावात राहत होते ते गाव ठाणे या शहराला लागून असूनसुद्धा अनेक सुविधांपासून दूर होते. कळवावासीयांना दैनंदिन व्यवहारिक गरजा भागवण्यासाठी ठाण्याची वाट तुडवण्याला पर्याय नव्हता. कळव्यातील ते अंधारयुग नष्ट करण्यासाठी आंतरिक तळमळीने उभे राहिले ते गोपीनाथ पाटील. त्यांच्या सार्वजनिक कार्यातून उभ्या राहिल्या अनेकानेक संस्था...

ठाणे कट्ट्याचे इवलेसे रोप… (Thane Park Discussion Group grows bigger along with the time)

संपदा वागळे आणि त्यांच्या मैत्रिणी यांनी एकत्र येऊन ठाण्यात ‘आचार्य अत्रे कट्टा’ सुरू केला. त्यांनाही त्यांच्यातील अनभिज्ञ असलेल्या विचारांची, क्षमतेची ओळख त्या कट्ट्याने करून दिली. त्या कट्ट्याने त्यांना नवे विचार दिले, माणसे दिली, मैत्र दिले, अनुभव दिले आणि प्रसिद्धीही दिली. अशा त्या सुसंस्कृत कट्ट्याची ओळख लेखाद्वारे करून घेणार आहोत...
carasole

कंधारचे बुधाईचे ठाणे

बुधाई देवीचे ठाणे बोड्डावार या विणकर समाजाच्या घराण्यात बहाद्दरपुरा, तालुका कंधार येथे आहे. रामजी बोड्डावार हे बुधाई देवीचे मानकरी पन्नासच्या दशकात होते. बुधाईची समाधी...

सर्व जातीय सामुदायिक व्रतबंध उपक्रम

0
काही ज्ञाती संस्था मुंजीसारखे धार्मिक समजले जाणारे विधी ज्ञातिबांधवांसाठी सामूहिक रीत्या साजरे करत असते. त्यामुळे समाजाची सोय होतेच; त्याबरोबर पैशांचा अवास्तव खर्चही टाळला जातो. ठाण्याच्या ‘चांद्रसेनीय कायस्थ प्रभू सभा’ या संस्थेचे कार्याध्यक्ष दीपक फणसे यांनी तशा उपक्रमाची माहिती आणि तो कसा साजरा केला जातो ते सर्व जातीय सामुदायिक व्रतबंध उपक्रम या लेखात सांगितले आहे. तो लेख नमुनादाखल आहे, कारण अनेक संस्था असे संस्कारविधी सामूहिक रीत्या करत असतात...

अवनि – उपेक्षित बाल-स्त्रियाचा आधार !

संघर्षाशिवाय तरणोपाय नाही हे अनुराधा भोसले यांच्या लक्षात लहानपणीच आले ! कष्ट हे जणू त्यांच्या पाचवीला पुजले होते. त्यांनी अकरावी-बारावीचे शिक्षण घेत असताना शौचालयाच्या साफसफाईचे कामदेखील केले आहे ! पण त्यांची पुढील आयुष्यातील कामगिरी फार मोठी आहे. अनुराधा भोसले यांनी ‘अवनि’ संस्थेमार्फत कोल्हापूर वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी सत्तावन ‘वीटभट्टी’ शाळा सुरू केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वंचित, निराधार मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. अनुराधा यांनी एकल स्त्रियांसाठी ‘एकटी’ ही संस्था सुरू करून त्या स्त्रियांना आत्मसन्मान मिळवून दिला आहे. अनुराधा भोसले यांच्या नावावर कोल्हापूरात अनेक कामांच्या नोंदी आहेत...

पहिली सिग्नल शाळा ठाण्यात ! (Innovative Signal School in Thane)

ठाणे शहरातील तीन हात नाक्यासह विविध सिग्नलवर भटक्या-विमुक्त जमातींतील शंभराहून अधिक मुले पुलाखाली आश्रय घेऊन राहत होती. पैकी तीन हात नाक्यावरील मुलांचे तेथील वास्तव्य संपुष्टात आले. मुलांचे वडील तेथेच वाढले. मुलांचे जन्म आणि बालपण पुलाखालीच गेले. खरे तर, असे दृश्य एकट्या ठाणे शहरात नसून अशी शेकडो मुले भारतातील प्रत्येक महानगरामध्ये जगत असतात. सरकार शिक्षणप्रसारासाठी अनेक मोहिमा करत असते. तथापी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागास राहिलेली ही मुले मुख्य धारेच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यास अपात्र ठरतात. अशा वेळी, ठाण्याच्या काही कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून ‘समर्थ भारत व्यासपीठ’ या सामाजिक संस्थेची ‘सिग्नल शाळा’ सुरू झाली...

सह्याजीराव सतीश चाफेकर (Satish Chaphekar – Man with Thousands of Autographs)

स्वाक्षऱ्यांसाठी डोंबिवलीला एक घर आहे ! घराचे नाव आहे ‘हे माझे घर, शब्दाचे’; अन् या अवलिया घरमालकाचे नाव आहे सतीश चाफेकर. ते घर म्हणजे आहे एका छोट्या फ्लॅटची टुमदार खोली, पण तिच्या भिंती भरल्या आहेत सह्यांनी मान्यवरांच्या, ‘स्टार्स’च्या, खेळाडूंच्या. अगदी सचिनची आई रजनी तेंडुलकर आणि कवी ग्रेस यांनी त्या खोलीत येऊन त्यांची त्यांची सही केली आहे. त्या खेरीज, चाफेकर यांनी पस्तीस-छत्तीस डायऱ्या, क्रिकेटच्या कितीतरी बॅटा, टी शर्ट, छत्र्या, मास्क अशा संबंधित अनेकविध साहित्यावर सह्या घेतलेल्या आहेत आणि त्या तेथे जपून-राखून ठेवल्या आहेत. त्यांचे मोल कोट्यवधी रुपयांचे, खरे तर अनमोल आहे. सतीश चाफेकर यांचे नाव ‘लिम्का बुक’च्या विक्रमवीरांच्या यादीत सहा वेळा नोंदले गेले आहे...

गोरक्ष ट्रेकिंग: प्रस्तरारोहकांचे आकर्षण

गोरक्ष किल्ला हा दोन हजार एकशेसदतीस फूट उंचीचा असून तो गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. तो ठाणे जिल्ह्याच्या कर्जत डोंगररांगेत मोडतो. तो किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. गोरक्ष किल्ला हा मुंबईकरांना आणि पुणेकरांना एका दिवसात करता येण्याजोगा आहे. गोरक्ष आणि मच्छिंद्रगड यांना ऐतिहासिक वारसा नाही तरी त्यांच्या सुळक्यांचे प्रस्तरारोहकांना मात्र आकर्षण वाटते. त्या गडाला महत्त्व शहाजी राजांच्या काळात होते; मात्र तेथे लढाई झाल्याचा उल्लेख नाही. गडाचा उपयोग शिवकालात आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे...

अहमदनगरचा भुईकोट (Ahmednagar Fort)

किल्ल्यांचे तीन मुख्य प्रकार गिरीदुर्ग, भुईदुर्ग आणि जलदुर्ग असे असतात. भुईदुर्ग म्हणजे अर्थातच जमिनीवरचा किल्ला किंवा भुईकोट. महाराष्ट्रात भुईदुर्गांचे प्रमाण कमी आहे. अशा भुईदुर्गांपैकी अहमदनगरचा भुईकोट हा गेल्या पाचशे वर्षांपेक्षा अधिक काळ अस्तित्वात आहे. इतकेच नाही तर वेगळ्या कारणांसाठी वापरात आहे. त्याने महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तो किल्ला मुघल, पेशवाई आणि ब्रिटिश काळात तुरुंग म्हणून वापरात होता. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद यांच्यासारखे ‘हाय प्रोफाईल्ड’ राजकीय कैदी त्या तुरुंगात बंदी होते. त्याच तुरुंगात नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’सारखा महत्त्वाचा बृहद्ग्रंथ लिहिला...

भगवानलाल इंद्रजी (Bhagwanlal Indraji)

पंडित भगवानलाल इंद्रजी (1839 - 1888) हे नाव सर्वसामान्य वाचकांना माहीत नसते. तसे ते माहीत असण्याचे कारणही नाही. भगवानलाल इंद्रजी हे मुळचे जुनागढचे. ते पुरातत्त्वशास्त्रज्ञ, शिलालेखांचे संशोधक आणि पुराणवस्तूंचे संग्राहक होते. ते मुळचे गुजरातचे असले तरी त्यांनी बरेचसे काम डॉ. भाऊ दाजी लाड यांच्याबरोबर केले. त्यांनी भारतभरच्या ब्राह्मी लिपीतल्या इतर असंख्य शिलालेखांचे वाचन केले आहे. पण त्यांचे नाव कायमचे जोडले गेले आहे ते रुद्रदमनच्या गिरनार येथील अडीच हजार वर्षांपूर्वीच्या शिलालेखाशी ! भगवानलाल इंद्रजींनी डॉ. भाऊ दाजी लाड यांचे साहायक म्हणून अनेक वर्षे काम केले. भाऊ दाजी यांनी त्यांच्या संशोधनासाठी, प्रवासासाठी, उत्खननासाठी निधी उपलब्ध करून दिला...