Home Search

ज्ञानेश्वर - search results

If you're not happy with the results, please do another search

ज्ञानेश्वरांचा मराठी भाषेचा जाहीरनामा! (What Dnyaneshwar wants to say about Marathi language and it’s...

ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतील सौंदर्यभाव जसा खुलवून सांगितला, तितक्याच महात्म्याने साहित्यातील विवेकमूल्याची निकड प्रतिपादन केली. त्यांच्यानंतरच्या संतपरंपरेने मराठी साहित्याला व विचारविश्वाला विवेकाचा पाया घालून दिला. म्हणूनच सदानंद मोरे त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून ज्ञानेश्वरीमधील बाराव्या अध्यायातील नमनाच्या काव्यपंक्तींना ‘मराठी भाषेचा जाहीरनामा’ म्हणत आहेत…
dnyaneshwari

ज्ञानेश्वरी (Dnyaneshwari)

1
‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार लेणे’ असे संबोधतात. ‘ज्ञानेश्वरी’ ही भगवदगीतेवर लिहिलेली टीका होय. त्या टीकाग्रंथात सुमारे नऊ हजार ओव्या आहेत. भगवदगीतेतील तत्त्वज्ञान त्यात उपमादृष्टांताच्या आधारे सुलभतेने सांगितले आहे. आध्यात्मिक विषयाचे काव्यमय विवेचन या दृष्टीने तो ग्रंथ लोकोत्तर मानावा लागेल...

छायाचित्रकारांचा कोल्हापुरी गुरू- ज्ञानेश्वर वैद्य

2
एएस(as) ज्ञानेश्वर वैद्य हे छायाचित्रणाची पदवी मिळवणारे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती आहेत. त्यांनी छायाचित्रणात AFIP ही राष्ट्रीय तर AFIAP ही आंतरराष्ट्रीय पदवी प्राप्त...
carasole

ज्ञानेश्वर बोडके – अभिनव प्रयोगशील शेतकरी

भारतीय समाज शेतीकडे ‘डबघाईला आलेला व्यवसाय’ म्हणून पाहत असताना ज्ञानेश्वर बोडके यांनी शेतकऱ्यांना शेतीतून प्रत्येकी लक्षावधींचे उत्पन्न मिळवण्याची ‘सिस्टिम’ शोधून काढली आहे! ती यशस्वीपणे...
carasole

ज्ञानेश्वरीचे उपासक धुंडा महाराज देगलूरकर

वारकरी संप्रदायातील संत एकनाथांनंतरचे ज्ञानेश्वरीचे थोर भाष्यकार म्हणून धुंडा महाराज देगलूरकर यांचा गौरव केला जातो. धुंडा महाराजांनी संत साहित्यावर मौलिक स्वरूपाचे लेखन करून त्यांच्या कीर्तन-प्रवचनातून पंचाहत्तर वर्षे संपूर्ण भारतात वारकरी संप्रदायाचे विचार रुजवले. त्यांच्या मौलिक योगदानाबद्दल शिक्षण क्षेत्राकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे विद्यापीठातर्फे धुंडा महाराजांचा सत्कार आयोजित करण्यात आला...

ज्ञानेश्वर भोसले – पारधी समाजातील मुलांसाठी कार्यरत

ज्ञानेश्वर भोसले या पंढपरपूरच्या तरुणाने केवळ स्वतःचे नव्हे तर अवघ्या पारधी समाजाचे भविष्य उज्ज्वल करण्याचा वसा घेतला आहे. ज्ञानेश्वरचा जन्म पंढरपूरमधील ताडगावजवळच्या जंगलातील. ज्ञानेश्वरने...

संत एकनाथ यांच्या गवळणी

0
संत एकनाथ यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे आणि ज्ञानदेवांच्या समाधीचे संशोधन प्रथम केले !. नाथांनी त्यांच्या वाङ्मयातून भागवत धर्माच्या परपंरेचे सातत्य आणि विकास साधला. त्यांचे नाथ भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण हे तात्त्विक चिंतनपर ग्रंथ. नाथांच्या आत्माविष्काराला वाट मिळते ती प्रामुख्याने त्यांच्या स्फूट रचनेतून. तशा स्फूट रचनांत अभंग, भारुडे, गवळणी, विरहिणी, कृष्णकथा, पदरचना अशा साऱ्यांचा समावेश होतो. संत एकनाथ यांच्या गवळणी विशेष प्रसिद्ध आहेत...

विनोबा, बाळकोबा, शिवबा – भावेबंधूंची अद्भुत त्रयी !

महाराष्ट्राच्या परंपरेत निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर आणि सोपानदेव या भावंडांची एक अद्भुत त्रयी आहे. तसे नवल महाराष्ट्र देशी पुन्हा, सातशे वर्षांनंतर घडले ! कोकणात पेणजवळील गागोदे गावी (रायगड जिल्हा) विनायक, बाळकृष्ण आणि शिवाजी हे तीन भाऊ नरहर भावे यांच्या घरी जन्माला आले. विनोबा मोठे आहेत, बाळकोबा मधले आणि शिवाजीराव धाकटे. निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान यांच्या मुक्ताबाईसारखी भावे बंधूंची एक भगिनी- शांता ही होती. शांताला तिच्या जीवनाची वाट स्वतंत्रपणे चालावी लागली. तिन्ही भावेबंधूंनी लौकिकाला अभिवादन करून अध्यात्मवाटेवर वाटचाल केली. मोक्ष हे त्यांचे लक्ष्य होते. ब्रह्मजिज्ञासा हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता...

रियाझुद्दीन अब्दुल गनी शेख यांचे वारीनृत्य

वारकरी संप्रदायातील हरीभक्त परायण राजुबाबा शेख यांनी वारीनृत्य महाराष्ट्रात लोकप्रिय केले. वारीनृत्याची कल्पनाच त्यांची. राजुबाबा कीर्तन, अभंगगायन लहानपणापासून करत, पण त्यांना वारीनृत्याची कल्पना गुजरातचे कलावंत शेखावत यांच्याकडून मिळाली. शेखावत त्यांच्या भवनीभवई प्रयोगात पितळी परातीत नृत्य करत गात; कधी तलवारीच्या पात्यावर त्यांचे नृत्य असे. राजुबाबा यांनी ताटलीत नाचत अभंग गाण्याचा प्रयोग सुरू केला. नंतर ते डोक्यावर कळशा/हंडे यांचे तीनचार थर घेऊन नृत्यगायन करत आणि भक्तिरसात डुंबून जात. त्यांचा तो खेळ लोकप्रिय झाला...

अभिजात दर्जा मिळाला… आता पुढे काय?

अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. त्यासाठी केंद्र सरकारने काही निकष ठरवलेले होते. 2004 मधील निकष 2005 मध्ये सुधारित करण्यात आले. ते चार निकष जी भाषा पूर्ण करेल, त्या भाषेला हा अभिजाततेचा दर्जा मिळतो. त्यानुसार आतापर्यंत प्रारंभी तमिळ (2004) आणि संस्कृत (2005) भाषेला असा दर्जा मिळाला. त्यानंतर तेलुगु (2008), कन्नड (2008), मल्याळम (2013) आणि उडिया (2014) याही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. हे निकष 2024 मध्ये सुधारित करण्यात आले. त्यानुसार मराठीसोबत पाली, प्राकृत, बांगला आणि आसामी या भाषांनाही हा अभिजात दर्जा देण्यात आला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावर दोनशे-तीनशे कोटी रुपये वगैरे मिळणार नाहीत. दूरदृष्टी ठेवून प्रकल्प आखावे लागतील तेव्हाच काही कोटी रूपये मिळू शकतील. त्यासाठी अभ्यासकांनी विचार करण्यास हवा...