Home Search

छत्रपती शाहू महाराज - search results

If you're not happy with the results, please do another search

शाहूंचा राज्याभिषेक – काव्यमय वृत्तांत

कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्या राज्यारोहण समारंभाचे एका प्रत्यक्षदर्शीने केलेले काव्यमय वर्णन... त्याची संशोधित आणि संपादित स्वरूपातील देखणी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. तो समारंभ 2 एप्रिल 1894 रोजी झाला. ती ऐतिहासिक महत्त्वाची घटना होय. तो प्रसंग कोल्हापूरसाठी सुवर्णयुग घेऊन आला. त्या क्षणापासून कोल्हापूर संस्थानात सामाजिक क्रांतीचे नवे पर्व सुरू झाले ! त्यातून देशभरातील सामाजिक सुधारणांना वेगळी दिशा मिळाली. तो ठेवा पुन्हा प्रकाशात आणण्याची महत्त्वाची कामगिरी यशोधन जोशी यांनी केली आहे. ती घटना 'मुक्त्यारी समारंभ’ अथवा ‘श्रीमन्ममहाराज शाहू छत्रपती यांचा राज्याधिकार स्वीकारोत्सव’ या नावाने ओळखली जाते. ती मूळ संहिता आहे बाळाजी महादेव करवडे यांची...

कोल्हापूर-मिरज रेल्वेचा आरंभ !

छत्रपती शाहू महाराज यांच्या शंभराव्या पुण्यतिथी निमित्ताने कोल्हापुरात कृतज्ञता पर्व सुरू आहे. त्यानिमित्त अनेकानेक कार्यक्रम होत आहेत. शाहू महाराजांनी कोल्हापूर ते मिरज या रेल्वेमार्गाची पायाभरणी करून तो प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण केला. त्यावरून कोल्हापुरी जिद्द व चिकाटी दिसून आली. एक राजा लोहमार्ग बांधतो, याचेच सगळ्यांना अप्रूप होते !

पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीची जखिणवाडी (Jakhinwadi)

जखिणवाडी या गावाला पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. गाव खुद्द शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे. तसेच, छत्रपती शाहू महाराज जेव्हा औरंगजेबाच्या कैदेतून सुटून महाराष्ट्रात परत आले तेव्हा त्यांचा महाराणी ताराबाई यांच्याशी संघर्ष झाला होता. त्यावेळी तह जखिणवाडी गावी झाला होता. त्यानंतर दोन गाद्या निर्माण झाल्या. एक सातारची गादी आणि दुसरी कोल्हापूरची गादी. तो ‘वारणेचा तह’ म्हणून प्रसिद्ध आहे. तह 13 एप्रिल 1731 रोजी झाला. त्यांपैकी काही अटींचे पालन झाले तर काहींचे नाही. तहाची आठवण म्हणून शाहुराजांनी गावाला दोन तलवारी भेट दिल्या होत्या. त्या गावच्या मळाईदेवी मंदिरात आहेत...
_Sangam_Mahuli_1.png

संगम माहुली

1
संगम माहुली या गावी मराठा इतिहासाच्या खुणा आढळतात. ते ठिकाण साताऱ्यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. ते कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर असल्यामुळे त्या गावाचे दोन भाग पडतात - अलीकडे 'संगम माहुली' आणि पलीकडे 'क्षेत्र माहुली'. छत्रपती शाहू महाराजांची आणि महाराणी ताराबाई यांच्या समाधी संगम माहुली येथे नदीच्या काठी आहेत...

दाभोळचा इतिहास – मक्केचा दरवाजा !

दाभोळ हे दापोली तालुक्यातील महत्त्वाचे बंदर आहे. ते महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम किनाऱ्यावर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येते. कोकणातील बंदरे सातवाहन काळात भरभराटीस आली. तेथून रोम, इजिप्त, अरेबिया, इराण या देशांशी व्यापार चालत असे. दाभोळचा तेराव्या शतकापर्यंतचा इतिहास चालुक्य, शिलाहार, यादव यांसारख्या हिंदू राजवटींचा इतिहास आहे...

मंदिर प्रवेशाचे महाभारत – संजयाच्या भूमिकेत

0
साने गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीतील अखेरचा आणि निर्णायक लढा पंढरपूरमध्ये लढला गेला. देवतांची मंदिरे म्हणजे सनातन्यांचे बालेकिल्ले. त्या चळवळीत ते बालेकिल्ले काबीज करून, त्यांचे दरवाजे अस्पृश्यांना खुले करण्यास महत्त्वाचे स्थान मिळाले. साने गुरुजी यांनी त्यासाठी प्राणांतिक उपोषण केले. त्यातून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर प्रवेशाचे महाभारत घडले व त्याची परिणती हरिजनांना मंदिर प्रवेश मिळण्यात झाली...

संघर्षवाटा – आंबेडकरी राजकारणाचे ताणेबाणे (Dalit politics analyzed in the book)

डॉ. संजय दामू जाधव यांचा एका दशकाचा विविधांगी अनुभव ‘संघर्ष वाटा’ या पुस्तकात शब्दबद्ध झाला आहे. जाधव यांनी अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून जे यश संपादन केले आणि त्यासाठी जो संघर्ष केला त्याचे चित्रण पुस्तकात वाचण्यास मिळते.
_baudh_dharmantarachi_Saha_dashke

बौद्ध धर्मांतराची सहा दशके (Six Decades of Buddhist Conversion)

भारतीय राज्य घटनेत अनुसूचित जाती म्हणून काही जातींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्या जातींचा उल्लेख सर्वसामान्यपणे दलित असा दैनंदिन भाषाव्यवहारात केला जातो. अनुसूचित जातींचे...
_Ahilyabai_Holkar_1.jpg

सच्च्या राज्यकर्त्या : अहिल्याबाई होळकर

अहिल्याबार्इ होळकर यांच्याबद्दल इतिहासात कमी माहिती उपलब्ध आहे. मराठा इतिहासातील कर्तबगार स्त्रियांच्या कामगिरीचा लेखाजोखा घेता लक्षात येते, की जिजाबाई, येसूबाई, महाराणी ताराबाई, उमाबाई दाभाडे,...
_Sathamari_Maindan_1_0.jpg

साठमारी खेळ व त्यासाठी मैदान

0
साठमारी हा जुना खेळ आहे. तो भारतात फारच थोड्या ठिकाणी खेळला जात असावा. त्यातील एक होते कोल्हापूर संस्थान. साठमारी हा खेळ परदेशात खेळल्या जाणाऱ्या ‘बुल...