Home Search
ग्रंथालय - search results
If you're not happy with the results, please do another search
ग्रंथालये नव्हे, सांस्कृतिक केंद्रे ! (Book Libraries will be cultural Centers)
पुस्तकांचा संग्रह आणि त्यांची देवघेव करण्याचे ठिकाण म्हणजे ग्रंथालय, एवढाच विचार लोकमानसात असतो. परंतु बदलत्या काळ-परिस्थितीत ग्रंथालयांना तेवढेच कार्य करून पुरेसे ठरणार नाही. त्यांना सांस्कृतिक केंद्राचे नवे, विस्तारित रूप घ्यावे लागेल. तेथे केवळ वाङ्मय नव्हे तर विविध विद्याशाखांचा पाठपुरावा करावा लागेल- वेगवेगळी माध्यमे वापरावी लागतील- ज्ञान संकलन व ज्ञान प्रसारण हे त्यांचे मुख्य कार्य राहील असा अभिप्राय चिपळूण येथे ‘लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर’ आणि ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ यांनी आयोजित केलेल्या ‘ग्रंथालय मित्र मंडळ’ मेळाव्यात व्यक्त झाला...
गोष्ट फलटणमधील दीडशे गाव-ग्रंथालयांची (Rural School Libraries to Promote Reading)
गाव-ग्रंथालयांचा प्रयोग हे सिद्ध करू पाहत आहे, की लेखी मजकूर वाचणे आणि त्याचा अर्थ लावणे ही जादू मुलांना येऊ लागली, की मुले वाचनाला, पर्यायाने पुस्तकाला चिकटून राहतात. त्यांच्या हातात येणारी पुस्तके सुंदर चित्रांची, त्यांच्या भावविश्वातील विषयांची असतील तर पुस्तकांशी जोडली जातात. अन त्यांना मोकळ्या अभिव्यक्तीची संधी मिळाली, की ती कल्पनेत रमतात, व्यक्त होऊ लागतात आणि हीच किमया आहे, पुस्तकांच्या दीडशे गाव-ग्रंथालयांची…
साहित्य सम्राट न.चिं. केळकर ग्रंथालय – सोमवार ग्रंथप्रेमाचा!
ग्रंथालयांचे, वाचनालयांचे अस्तित्व हे शहरात सांस्कृतिकपणा जिवंत असल्याचे लक्षण असते. त्यात ते ग्रंथालय दुर्मीळ संदर्भग्रंथांनी समृद्ध असेल तर मौल्यवान पाचू, माणके, हिरेच त्या शहराने...
शहाबाजचे शंभर वर्षांचे ग्रंथालय
रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील शहाबाज गावातील ‘सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय’ या संस्थेस ३ एप्रिल २०१६ रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली. शंभर वर्षांची यशस्वी वाटचाल...
आदर्श ग्रंथालयासाठी झटणारे सुधाकर क्षीरसागर
सर ज.जी. उपयोजित कला संस्थेचे (जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट) ग्रंथपाल म्हणून काम केलेले सुधाकर शांताराम क्षीरसागर हे पुस्तकवेडे आहेत. उपयोजित कलेची लायब्ररी सुरू...
सांगोला तालुका ग्रंथालय
'सांगोला तालुका ग्रंथालय संघा'चे लहान रोपटे ग्रंथमित्र गुलाबराव पाटील यांनी 19 ऑक्टोबर 2003 रोजी लावले. तालुका ग्रंथालय संघाची चळवळ गेले पूर्ण तप सरस ठरली...
फक्त कवितांचे ग्रंथालय!
अंबाजोगाई ही आद्यकवी मुकुंदराज यांची कर्मभूमी. येथेच त्यांनी रचला मराठी कवितेचा पहिला ग्रंथ- विवेकसिंधू. त्यानंतर मराठी कविता-ग्रंथांचा अखंड प्रवाह सुरू झाला. गेल्या साडेनऊशे...
माहिती अधिकाराचे ग्रंथालय!
महापालिकेच्या तळमजल्यावर ग्रंथालयासाठी जागा निश्चित करण्यात आली असून तेथे माहिती अधिकारासंदर्भात असलेली सर्व पुस्तके उपलब्ध होणार...
ठाणे महापालिकेत माहिती अधिकाराचे ग्रंथालय! माहिती अधिकार काय...
ग्रंथालये ज्ञानकेंद्रे बनू शकतील !
बैठक थिंक महाराष्ट्र डॉट कॉम, डोंबिवली ग्रंथसंग्रहालय यांनी ठाणे नगर वाचन मंदिराच्या सहकार्याने भरवली होती. ग्रंथालये ही माहिती व मनोरंजन यांचे अड्डे बनले पाहिजेत....
नागपूरचे जुने मध्यवर्ती संग्रहालय
नागपूरचा ‘अजब बंगला’ म्हणजे नागपूरचे मध्यवर्ती संग्रहालय. त्या म्युझियमची स्थापना इंग्रज सरकारने 1863 मध्ये केली. ते भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात जुन्या संग्रहालयांमध्ये गणले जाते. नागपूर शहर हे त्यावेळी मध्यप्रांत आणि वऱ्हाड यांची (Central Province And Berar) राजधानी होती. संग्रहालयात दहा दालने आहेत. त्यांत विविध प्रकारचे पुरावशेष, झाडांचे जीवाश्म, शिल्पे, चित्रे, भुसा भरलेले प्राणी, शिलालेख अशा अनेकविध वस्तू आहेत. त्याकरता संग्रहालयात वेगवेगळी दालने आहेत- निसर्गविज्ञान, पाषाणशिल्पे, शस्त्र, पुरातत्त्व, आदिवासी कला व संस्कृती, प्राणी, पक्षी व सरीसृप, शस्त्र, हस्तशिल्प कला, चित्रकला व नागपूर हेरिटेज अशा विषयांचा त्यांत समावेश आहे...