Home Search

गीतकार - search results

If you're not happy with the results, please do another search

नाटककार-संपादक विद्याधर गोखले

1
विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीचे 2024 हे वर्ष आहे. 1960 ते 1980 ही दोन दशके मराठी संगीत नाटक म्हणजे विद्याधर गोखले असे जणू समीकरणच होते. मराठी संगीत नाटक ही मराठी संस्कृतीलाच नव्हे तर जागतिक रंगभूमीला असलेली देणगी आहे. गोखले यांनी पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर अध्यापन काही वर्षे केले. त्यानंतर त्यांनी ‘दैनिक लोकसत्ता’मध्ये नोकरी पत्करली. अनेक वर्षे ‘लोकसत्ता’मध्ये काम करून पत्रकारितेमधील कारकीर्द गाजवली. त्यांनी ‘लोकसत्ता’मध्ये संपादक म्हणूनही जवळजवळ पाच वर्षे काम केले...

बहनो और भाइयो… (Ameen Sayani)

अमीन सायानी यांचे 21 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. पन्नास वर्षांहून अधिक काळ ज्या आवाजाची जादू या देशातल्याच नाही तर जगभरातल्या भारतीय चित्रपट संगीतप्रेमींच्या हृदयावर चालली ज्या आवाजाने चार पिढ्यांच्या कानांचीच नाही तर मनांचीही मशागत केली आहे. भारतीय चित्रपट संगीत हे मनामनांना जोडणारा अद्भुत धागा आहे.एक्याण्णव वर्षांचे समृद्ध आयुष्य जगून अमीन सायानी गेले. रफी-लता-किशोर या जादुई आवाजांइतकाच त्यांचा जादूई आवाज श्रोत्यांच्या कानात गुंजत राहील...

राग संगीत हेच भावसंगीत

सर्वसामान्य माणसांच्या मनात गणिताविषयी जशी एक भीती किंवा हवेतर अढी म्हणू तशीच शास्त्रीय संगीताविषयीही असते. हे आपल्याला समजणार नाही अशी एक समजूत असते. अनेकांना ते ऐकायला आवडते पण ‘समजत’ नाही. शास्त्रीय संगीतातले बारकावे समजले तर ते ऐकताना त्याचा आस्वाद अधिक समृद्ध करणारा असेल अशा विचाराने या क्षेत्रातल्या विविध संकल्पना, राग, त्यांचे स्वरूप याविषयी लिहित आहेत तरूण गायक डॉ. सौमित्र कुलकर्णी...

वंदे मातरम् – हैदराबाद मुक्ती संग्रामातील पहिली ठिणगी

1
‘वंदे मातरम’ या गीताला भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 1876 मध्ये लिहिलेल्या ‘आनंद मठ’ या कादंबरीतील आहे. ते रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम देशापुढे आणले. त्या गीताला प्रसिद्ध संगीतकार पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांनी स्वरबद्ध केले आणि ते गीत अजरामर ठरले ! ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत म्हणून राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात वाराणसी येथे 1905 साली स्वीकारले गेले...

कहीं ये वो तो नहीं ?… भाग दोन (Musings)

ज्या प्रेक्षकाकडे पूर्वानुभव असतो त्याच्यापर्यंत दृश्यात सूचित होणाऱ्या या संवेदना दृश्य आणि ध्वनीतून पोचतात. चंद्रमल्लिकेचा, चंदनाचा गंध, चाफ्याच्या रंगाच्या साडीचा रंग, जवळिकीतून होणारा अस्पष्ट स्पर्श, येणारा अंगगंध या संवेदना दृश्यातल्या संवादातून आणि दृश्याच्या रचनेतून प्रेक्षकापर्यंत पोचतात. त्यातून संयत शृंगार रसाची निष्पत्ती होते. विविध कलांचा अनुभव देणाऱ्या संवेदनांचा अनुभव देणारा सिनेमा. आज विश्वाच्या संवेदनांना व्यापून राहिलेल्या ‘सिनेमा’तले हे काही सुंदर क्षण. किती वेचावेत, किती मोजावेत...

एकोणपन्नासावे साहित्य संमेलन (Forty-Nine Marathi Literary Meet 1973)

यवतमाळ येथे 1973 साली झालेल्या एकोणपन्नासाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ‘गीतरामायण’कार ग.दि. (गजानन दिगंबर) माडगूळकर ऊर्फ गदिमा. ‘गदिमा’ हे केवळ ‘गीतरामायण’ एवढे अप्रतिम काव्य लिहून साहित्यविश्वात अजरामर झाले असते. ते प्रासादिक, प्रतिभाशाली आणि प्रसन्न असे गीतकार होते. त्यांच्या गीतरचनेला कवितांचा दर्जा लाभला. त्यांच्या पटकथा-संवादांनीदेखील मराठी चित्रपटसृष्टीत अक्षरशः चमत्कार केला !माडगूळकर हे कोठल्याही मैफिलीचा ताबा घेत असत...

तीन पिढ्यांचे शिल्पकार (The teacher who shaped three generations)

चांगले शिक्षक आणि त्यांनी दिलेली शिकवण यांना मनातून कधी हद्दपार करता येत नाही. ते व्यक्तीच्या असण्याबरोबर, विचारांबरोबर असतातच. तीन पिढ्यांना शिकवणाऱ्या इनामदार सरांचे विद्यार्थी- आज तरुण ते वृद्ध वयातील त्यांच्या शिष्यांच्या मनात, घर करून आहेत. मंजूषा इनामदार-जाधव या त्यांच्या कन्या. त्यांच्या वडिलांना, वडील आणि गुरू या दोन भूमिकांमधून वावरताना त्यांच्या मनामध्ये उभे राहिलेले चित्र या लेखात आहे...

नाना साठे प्रतिष्ठान : पुढे नेण्यासाठी वारसा (Passing on the legacy)

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःचे घर, स्वतःची नोकरी आणि व्यवसाय या परिघाबाहेर सहसा कोणी जात नाही, कारण ते सारे एकत्रितपणे सांभाळणे हीच तारेवरची कसरत असते ! परंतु या विधानाला काही अपवाद असतात. ठाण्यातील कौस्तुभ साठे हे त्यांपैकी एक. ‘जॉन्सन अॅन्ड जॉन्सन’ या कंपनीमध्ये ‘पोर्टफोलिओ मॅनेजर’ या पदावर कार्यरत असणाऱ्या कौस्तुभ साठे यांचे त्यांच्या समाजकार्याबद्दलचे हे मनोगत...

दापोलीतील साहित्यजीवन

‘श्यामची आई’, ‘गारंबीचा बापू’ या साहित्यकृतींमुळे दापोलीचा ठसा साहित्य क्षेत्रात उमटला. दापोली हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होत आहे. तेथील तरुण वर्ग मुंबई-पुण्याकडे ‘करिअर’साठी जात आहे. असे असतानाही दापोलीचा निसर्ग, तेथील जीवन बाहेरगावी गेलेल्या तरुणांच्या मनातून जात नाही. ती ते त्यांच्या साहित्यातून प्रकट करतात. खुद्द दापोलीत राहणारे साहित्यिकही त्यांच्या परीने त्या करता धडपडत असतात. त्यांचा आढावा...

मराठी भाषा-साहित्य : अचलपूरचे योगदान

अचलपूर तालुक्याने मध्यप्रदेश या हिंदीभाषिक राज्याच्या सीमेवर असतानासुद्धा मराठी भाषा केवळ जगवली नव्हे तर वाढवलीसुद्धा आहे. अचलपूर परिसरातील बोलीचे सौंदर्य, तिचे उच्चारविशेष, रूपविशेष, तिचे आगळेपण भाषातज्ज्ञसुद्धा मान्य करतात. मूळात अचलपूरला मोठी वाङ्मयीन परंपरा लाभलेली आहे. ती मराठी भाषेच्या वृद्धीकरता पूरक ठरलेली आहे...