Home Search
गायकी - search results
If you're not happy with the results, please do another search
निलेश उजाळ यांना ओढ कविता-गीतांची
निलेश उजाळ यांनी ते चौथीत असताना काटकर वाडीच्या जाखडी नृत्यामधून गायकी सुरू केली. छोटा कलाकार गात आहे म्हणून पंचक्रोशीतील लोक त्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी करत. गुरूंनी लिहिलेली गाणी गाणारा निलेश, पुढे स्वतः गाणी लिहू लागला. तेच निलेश उजाळ कवी, गीतकार म्हणून टीव्ही माध्यमातून प्रसिद्ध झाले आहेत...
दापोली तालुक्यातील शाहीर उदय काटकर
शाहीर उदय काटकर यांनी जाखडी नृत्याची छाप पहाडी आवाजाच्या जोरावर महाराष्ट्रभर उमटवली. त्यांचे प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालणारे वक्तृत्त्व आणि बहारदार गायकी लोकांच्या मनावर गारुड करते. उदय काटकर यांनी हजारांहून अधिक कार्यक्रम महाराष्ट्रभर केले आहेत...
हार्मोनियम बनवण्याची चाळीस वर्षांची परंपरा
पांचाळ कुटुंबीयांचा पिढीजात व्यवसाय हा सुतारकामाचा. दत्ताराम पांचाळ यांनी त्यांचे भाऊ विश्वनाथ यांच्याकडून हार्मोनियम तयार करण्याचे कौशल्य संपादन केले. त्यांनी हरिभाऊ विश्वनाथ ह्या वाद्य निर्मिती कंपनीत नोकरीदरम्यान तंतुवाद्याच्या दुरुस्तीतील आठ वर्षांच्या अनुभवानंतर स्वत:चा हार्मोनियम बनवण्याचा व्यवसाय सुरू केला...
संयुक्त ‘मानापमान’ची शताब्दी (Manapaman : Khadilkar’s play Celebrates Centenary)
'संयुक्त मानापमान' या संगीत नाटकाचा प्रयोग हे मराठी रंगभूमीवरील एक विलक्षण 'घटित' होते. तो प्रयोग 8 जुलै 1921 रोजी मुंबईच्या बालीवाला थिएटरमध्ये रंगला होता. त्या प्रयोगाला अनेक व्यक्ती, घटना, प्रेक्षकांच्या क्रियाप्रतिक्रिया, निर्माण झालेला माहोल यांचे संदर्भ आहेत.
फडावरचा गुढीपाडवा (Sugarcane Cutters celebrate Gudhipadwa in their Style)
फड म्हणजे साखर कारखान्याच्या शेजारी वसलेली गाडीवाल्या ऊसतोडणी कामगारांची हंगामी वस्ती. ती काही महिन्यांसाठी असते आणि तेथे येणारे कामगार स्थलांतरित असतात.
भीमसेन जोशी – बुलंद आवाजातील करुणासागर (Tribute to Bhimsen Joshi)
ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर अशा घराण्यांतील किराणा घराण्याचे पांथस्थ म्हणजे भारतरत्न संगीताचार्य स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी हे होत. त्यांचा जन्म कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील रोण या त्यांच्या मावशीच्या गावी 4 फेब्रुवारी 1922 रोजी झाला.
ते ‘पुल’कित दिवस (P.L.Deshpande With Aachre Villagers)
आचरे गावातील रामनवमी उत्सवात, पु.ल.देशपांडे आणि त्यांच्या महाराष्ट्रातील ख्यातकीर्त सत्तर कलावंतांचा चाळीस वर्षांपूर्वी, 1975ला आचरेवासीयांना जो सुखद सहवास लाभला तो आम्ही समस्त आचरेवासीय आजन्म विसरू शकत नाही. ‘कलासक्त हे गुणीजन मंडित पुण्यग्राम आचरे’ ही
विविधगुणी प्रभाकर साठे आणि त्यांची गीतगीता
प्रभाकर साठे हा माणूस विविधगुणी आहे आणि त्यांचे गुण, वय पंच्याऐंशी उलटले तरी अजून प्रकट होत आहेत. त्यांचे कायम वास्तव्य अमेरिकेत कॅलिफोर्नियात असते, परंतु...
रफीवेडे डॉ. प्रभू आहुजा
ठाण्याजवळ उल्हासनगर येथे ‘शिवनेरी’ नावाचे हॉस्पिटल आहे. ते हॉस्पिटल आहुजा डॉक्टर दांपत्य चालवतात. कोणी म्हणेल, त्यात काय नवीन आहे? आजकाल खेड्यापाड्यातही पतिपत्नी, दोघेही डॉक्टर...
गंधर्व परंपरा
‘भूगंधर्व’ रहिमतखाँ
इसवी सन 1900 च्या सुमारास नेपाळ नरेशांनी नेपाळमध्ये खास संगीत महोत्सव आयोजित केला होता. बनारसहून आलेल्या एका अवलिया गायकाने तिथे सर्वांचे लक्ष वेधून...