Home Search
गाडगेबाबा - search results
If you're not happy with the results, please do another search
गाडगेबाबा – जिणे गंगौघाचे पाणी !Saint Gadgebaba’s Life of Service and Sacrifice
गाडगेबाबा जिथं जिथं न्यून जाणवलं, तिथं तिथं ते भरून काढण्यासाठी नेटानं प्रयत्न करत राहिले. अनेकांची आयुष्यं त्यांच्या सहवासाच्या लेपानं सुगंधित झाली. गाडगेबाबा सभोवती माणसांचा समुद्र पसरलेला असतानाही आतून नि:संग राहिले...
डेबूचा गाडगेबाबा होताना (gadgebaba-his-journey-from-childhood-to-sainthood)
डेबूच्या मनात व्यसनांच्या विरुद्ध चीड, संताप दगडावरील रेघेसारखा कोरला गेला आहे. त्यामुळेच डेबू गाडगेबाबा होऊन लोकांपुढे उभा राहतो. दुर्व्यसनांवर, अनिष्ट चालीरीती, रूढी-परंपरांवर टीका आणि कडाडून प्रहार करतो. म्हणून तो संतांसारखा केवळ टाळकुट्या न ठरता मोठा समाजसुधारक, मूर्तिभंजक, विज्ञाननिष्ठ विचारवंत म्हणून नावाजला जातो...
गाडगेबाबांच्या विचारांचे शिलेदार !
गाडगेबाबा पुस्तकात सामावू शकत नाही. तो या मातीत रुजतो आणि मातीतून उगवतो, माणसाच्या मनात वसतो. सर्वसामान्य माणसाच्या बुद्धीचा आवाका लक्षात घेऊन साधीसोपी उदाहरणे देऊन विचार करण्यास लावणारे गाडगेबाबा विलक्षण आहेत...
शोध गाडगेबाबांचा
गाडगेबाबांचा उल्लेख संत, समाजसुधारक, प्रबोधनकार, कर्मयोगी अशा अनेक प्रकारे केला जातो. मात्र तो माणूस अध्यात्माच्या नावाखाली पोपटपंची करणारा हभप नव्हता. त्यांचे कीर्तन माणसांच्या मन आणि मेंदू यांना प्रथा, परंपरा, कर्मकांड यांचे जे झापड लागले आहे, ते दूर करणारे होते...
गाडगेबाबांच्या… बालपणीच्या पाऊलखुणा शोधताना
अमरावती जिल्ह्यातील ‘शेंडगाव’ हे गाडगेबाबांचे जन्मगाव. गाडगेबाबांनी बालवयातील 1876 ते 1884 पर्यंतचा काळ तेथे व्यतीत केला. अमरावती ते शेंडगाव हे अंतर सत्तर किलोमीटरचे. त्या...
गाडगेबाबांची कीर्तनभाषा
गाडगेबाबांची कीर्तनभाषा ही जनभाषा आहे. संवाद हा त्या भाषेचा गाभा. ते एकेका शब्दाचा प्रश्न लोकांना विचारत आणि लोकांचा होकार मिळवत. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे विषय...
रमेश बाळापुरे – ना हरली जिद्द ! (Ramesh Balapure – stage actor with determination)
रमेश बाळापुरे यांचा जन्म झाला तो मुळी बाविशी नाट्यमंदिरात. रमेशला त्याच्या तरुणपणीही बाविशीचे स्टेज अनायासे प्राप्त झाले ! रमेशचे मामा लगदेमास्तर हे नाटकात कामे करत. रमेशमध्ये नाटक असे अनुवंशिकतेने उतरले होते. रमेशला निसर्गानेसुद्धा मदतच केली. त्याला प्रमाणबद्ध उंची, मोठे आकर्षक डोळे, हसरा चेहरा अशी शारीरिक संपत्ती लाभली. रमेश आणि मी नाटकातील जोडगोळी बनलो. रमेशने नाटक निवडावे- दिग्दर्शित करावे आणि मी त्यात विनोदी भूमिका करावी असा परिपाठ झाला...
सातपुड्यातील लोकउत्सव – बहिरम यात्रा
बहिरमची यात्रा म्हणजे दोन राज्यांतील हिंदी व मराठी भाषिक लोकांमधील सांस्कृतिक संगम आहे ! यात्रा मध्य प्रदेश व महाराष्ट्र यांच्या सीमेवर भरते. सलग दीड महिन्यापेक्षा जास्त काळ चालणारी यात्रा म्हणून बहिरमच्या यात्रेचा लौकिक सर्वदूर आहे. यात्रेला पौराणिक महात्म्य आहे. बहिरम (भैरवनाथ) हे बऱ्याच कुटुंबांचे कुलदैवत आहे. यात्रेत देवदर्शनासोबत अध्यात्म, चित्रपट, मनोरंजन, महाप्रसाद, खाद्य संस्कृती, महिला मेळावा, कीर्तन, प्रदर्शन, पशुविक्री, कृषी साहित्य अशी सर्व गोष्टींची रेलचेल राहते...
दावलवाडी : जालना-बदनापूर जवळची संपन्नता
दावलवाडी हे गाव जालना जिल्ह्याच्या बदनापूर या तालुक्यात आहे. ते जालन्यापासून आठ किलोमीटर तर बदनापूर या तालुक्याच्या केंद्रापासून दहा किलोमीटर अंतरावर वसले आहे. या गावाने आर.आर. पाटील ग्रामविकास मंत्री असताना, ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना’त जिल्ह्यात 2002 मध्ये दुसरा क्रमांक तर पुढच्याच वर्षी 2003 मध्ये पहिला क्रमांक मिळवला होता. गावाला राष्ट्रपती पुरस्कार 2000 ते 2005 या काळातील उल्लेखनीय कामाबद्दल मिळालेला आहे...
मराठी भाषा-साहित्य : अचलपूरचे योगदान
अचलपूर तालुक्याने मध्यप्रदेश या हिंदीभाषिक राज्याच्या सीमेवर असतानासुद्धा मराठी भाषा केवळ जगवली नव्हे तर वाढवलीसुद्धा आहे. अचलपूर परिसरातील बोलीचे सौंदर्य, तिचे उच्चारविशेष, रूपविशेष, तिचे आगळेपण भाषातज्ज्ञसुद्धा मान्य करतात. मूळात अचलपूरला मोठी वाङ्मयीन परंपरा लाभलेली आहे. ती मराठी भाषेच्या वृद्धीकरता पूरक ठरलेली आहे...