Home Search

गांधीजी - search results

If you're not happy with the results, please do another search

पापक्षालनासाठी गांधीजींना करावे लागले गोदास्नान! (Gandhiji had bath in Nasik river Godavari as mark...

0
महात्मा गांधी अन् नाशिक यांच्यातील नातं अनोखं आहे. बॅरिस्टर झाल्यानंतर त्या महात्म्याला जातीत घ्यायचं की नाही, यावर त्यांच्या गावी पोरबंदरला जातपंचायतीत झगडा सुरू होता. कुटुंबाचा आग्रह जातीत पुन्हा प्रवेश मिळावा असा होता. म्हणून त्या महात्म्याला 1891 मध्ये गोदावरीत स्नान करावं लागलं होतं. मोहनदास हे महात्मा होण्याच्या प्रवासातील बंडाची ती पहिली ठिणगी नाशिकच्या गोदाकाठावर त्यांच्या मनात भडकली होती...

महात्मा गांधीजी आणि व्यंगचित्रे (Gandhi in World Cartoons)

भारतीय गूढ तत्त्वज्ञानाने पाश्चिमात्य जगाला नेहमीच भारून टाकले आहे; तसेच, कुतूहल भारतीय जादूटोणा, तांत्रिक-मांत्रिक, साधू-फकीर यांनी तेथे निर्माण केले आहे. अखिल आधुनिक पाश्चिमात्य जगावर मोहिनी घालणारा खराखुरा ‘नंगा फकीर’ म्हणजे मोहनदास करमचंद गांधी! महात्माजींना ‘नंगा फकीर’ ही पदवी दिली, ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नसे अशा इंग्लंडच्या अत्यंत प्रभावी पंतप्रधानांनी, म्हणजे चर्चिल यांनी...
_GandhijiChar_AnguleVar_1.png

गांधीजी चार अंगुळे वर!

1
अशगर वजाहत या लेखकाकडून अनोख्या नाटकाची अपेक्षा होतीच; ती 'गोडसे @ गांधी डॉट कॉम’कडून पुरी झाली! अशगरने यापूर्वी 'जिस लाहोर नही देखा’ सारखी वेगळी...
_Harihar_Kumbhojkar_1

भ्रष्टाचार निर्मुलन, सेक्युल्यॅरिझम आणि गांधीजी

महात्मा गांधी यांच्यासारख्या युगपुरुषाविषयी सर्वसामान्य माणसाला वाटणाऱ्या आदराचे आणि प्रेमाचे रूपांतर श्रद्धा आणि भक्ती यांत होणे हे नैसर्गिक आहे. पण अशी श्रद्धा-भक्ती बऱ्याचदा चिकित्सक...

ना.ग. गोरे – राजकारणी व साहित्यप्रेमी

0
समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांच्या जीवनात कर्मयोग, बुद्धिप्रामाण्यवाद आणि कलात्मकता यांचा विलोभनीय संगम दिसतो. त्यांनी तो संगम सार्वजनिक जीवनात वावरताना साधला होता. त्यांच्या भाषणात, लेखनात, संवादात विचारांचे धागे बांधेसूदपणे अन् कलात्मकतेने विणलेले आढळतात. त्यात बुद्धिप्रामाण्य, तर्कशुद्धता आणि विवेकाचे भान यांचा अनुभव येतो...

कोळथरे येथील आगोमचे मामा महाजन

दापोली तालुक्याच्या कोळथरे गावचे मामा महाजन यांनी राजकारण, समाजकारण आणि उद्योग या तिन्ही क्षेत्रांत स्वतःचा असाधारण असा ठसा स्थानिक पातळीवर उमटवला आहे. मात्र त्यांची ओळख ‘आगोमचे जनक मामा महाजन’ हीच आहे...

कृषिसंशोधक शेळीतज्ज्ञ बनबिहारी निंबकर

0
बनबिहारी विष्णू निंबकर यांनी शेळ्या व मेंढ्या यांचा सूक्ष्म स्तरावर जातीनिहाय शास्त्रीय अभ्यास केला. त्यांच्या त्या अभ्यास व संशोधन कार्यामुळे शेळी-मेंढीपालन करणारे लोक यांची उन्नती साधली गेली व त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेल्या योजना, उत्पादने आणि ती तयार करण्यातील त्यांची कल्पकता पाहून तत्कालीन महाराष्ट्र सरकारने त्यांना सहा वर्षांसाठी ‘मॅफ्को’चे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. त्या वेळी मॅफ्को तोट्यात होती. निंबकर यांच्या अभिनव कल्पनांमुळे ते मॅफ्कोतून निवृत्त झाले तेव्हा ती नफादायक सरकारी कंपनी झाली होती...

नरकतीर्थ बाबा फाटक

खादीची गोल गांधी टोपी, खादीची अर्धी विजार व खादीचा अर्ध्या बाह्यांचा शर्ट असा पेहराव,कामात सतत गर्क असणारे तरी हसरा चेहरा,वापरायला जुनी सायकल असे व्यक्तिमत्व म्हणजे बाबा फाटक.अशा नरकतीर्थ बाबांना १९७२ साली भारत सरकारने ताम्रपट व सन्मानपत्र देऊन गौरविले ...

बी.जे. खताळ : सच्चा गांधीवादी… सच्चा माणूस (B. J. Khatal)

महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास लिहिला आणि त्यात पराकोटीचा प्रामाणिकपणा, कठोर शिस्त आणि तत्त्वनिष्ठा हे निकष लावून काही लोकांची नावे नोंद करावी असे म्हटले तर ती यादी बी.जे. खताळ या नावापासून सुरू होण्यास हवी. त्यांनी राज्याच्या विविध मंत्रिपदांवर बहुतांश काळ काम केले. त्यांनी निवृत्तीनंतर स्वतःला योगासने, विपश्यना, वाचन-चिंतन यांत गुंतवून घेऊन वयाच्या एकशेएकाव्या वर्षापर्यंत विविध विषयांवर लिखाण केले...

सविनय कायदेभंग आणि पंढरपूरातील अनुष्ठान

महात्माजींनी चालू केलेली कायदेभंगाची चळवळ, त्यांचा सत्याग्रह यशस्वी व्हावा म्हणून पंढरपूरातील ब्रह्मवृंदाने जाहीर अनुष्ठानास सुरुवात केली! ते अनुष्ठान साम्राज्यशाहीच्या रोषाची पर्वा न करता पंढरपूरमधील दत्तघाटावर पार पडले. गांधीजींची ती चळवळ सर्वसामान्य माणसाला किती त्याची स्वत:ची वाटत होती, याचे हे उत्तम उदाहरण! हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अशी घटना तो पावेतो घडली नसावी...