Home Search

कुस्ती - search results

If you're not happy with the results, please do another search

कुस्तीवीर सुधीर पुंडेकर याचे क्रीडाकेंद्र (Wrestler Sudhir Pundekar’s Sports Center)

सुधीर पुंडेकर याने बेल्ट रेसलिंग या कुस्तीप्रकारात भारताचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर केले आहे. तो खेळतो उत्तम; त्याचे खेळण्यावर प्रेम आहे आणि तो स्पर्धा खेळतो तेव्हा त्याला ती देशसेवा वाटते ! तशा उदात्त भावनेने तो या एकूण व्यवहाराकडे पाहतो. तो मूळचा फलटण तालुक्यातील मुळीकवाडी या छोट्या गावचा. शेतकरी कुटुंबातील. त्याने कुस्तीबरोबरच इतर क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण देणारे केंद्र गावात सुरू केले आहे...

हिंदकेसरी गणपत आंदळकर – महाराष्ट्राच्या कुस्तीचे भीष्मपितामह

3
महाराष्ट्राच्या कुस्तीचे भीष्म पितामह म्हणून ओळख असलेले हिंदकेसरी गणपत आंधळकर यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या तांबड्या मातीतील कुस्ती पोरकी झाली आहे. लोक त्यांना आबा म्हणून हाक...
_KusticheSamalochan_ShankarPujari_1_1.jpg

कुस्तीचे समालोचक – शंकर पुजारी

1
कुंडलचे कुस्तीमैदान. मैदानावर हजारो लोक आलेले होते. एकास एक कुस्त्या सुरु होत्या. पैलवानांच्या जोडया आखाड्यात येत होत्या. वेधक कुस्ती करणा-या पैलवानाला कुस्तीशौकीन दाद देत...
carasole

अकलुजमधील कुस्ती स्पर्धा

0
सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील अकलुजमध्ये त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले जाते. ती सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, कर्मवीर नानासाहेब पाटील व धर्मवीर सदाशिव...

साखरवाडी – खो खो ची पंढरी

जसा लौकिक कुस्तीसाठी हरियाणाने, टेनिससाठी आंध्र प्रदेशने आणि फुटबॉलसाठी ईशान्य भारताने कमावला आहे, तसाच लौकिक महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील साखरवाडी नावाच्या गावाने खो-खो च्या राष्ट्रीय मैदानावर मिळवला आहे ! साखरवाडीच्या विशेषतः मुलींचा धसका देशभरच्या खो-खो खेळाडूंनी घेतला आहे. साखरवाडीच्या मुलींच्या मैदानावरील चपळाईने प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरते आणि पाहणारे थक्क होऊन जातात ! त्या गावातून शंभराहून जास्त राष्ट्रीय खो खो खेळाडू घडले आहेत...

दर्गा – दुला रहिमानशहा

‘दुला रहिमानशहा’ यांचा दर्गा परतवाड्याहून अचलपूर शहराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर, बिच्छन नदीकाठी आहे. तो गिझनीचा राजपुत्र. मुस्लीम धर्मीय मंडळी दुला रहिमानशहाला मोठा पीर मानतात. त्या ठिकाणी ‘उरूस’ वर्षातून एकदा भरतो. उरूस म्हणजे पवित्र यात्रा. तो उरूस रबीउल अव्वल महिन्याच्या 12 तारखेपासून भरतो आणि सात दिवस चालतो...

पिंपळवाडीची झाली साखरवाडी – सारे गोड गोड ! (Sakharwadi – Village transformed by private...

साखरवाडी हे सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील गाव. महाराष्ट्रातील पहिला आपटे यांच्या मालकीचा खासगी साखर कारखाना म्हणून साखरवाडीच्या कारखान्याची नोंद आहे. गावाची क्रीडाक्षेत्रामधील कामगिरी उल्लेखनीय आहे. हे गाव खो-खो या खेळाची पंढरी म्हणून ओळखले जाते. या गावातील खो खो संघाचा दबदबा व दहशत कित्येक वर्षे महाराष्ट्रात होती. देशपातळीवरील सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या संघात साखरवाडीच्या संघातील कमीत कमी दोन खेळाडू असतातच !

बालंबिका देवीचे बालमटाकळी

0
बालमटाकळी हे अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या पूर्व टोकाला वसलेले जुने गाव. त्या गावाला पूर्वी टाकळी किंवा बोधेगाव-टाकळी असे म्हटले जात असे. त्या शेजारीच बोधेगाव आहे. त्या गावाचे हे जोडगाव गणले जाई. गावाचे ग्रामदैवत बालंबिका देवी. तिच्या नावावरून त्या गावाला बालमटाकळी म्हणू लागले...

हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक – साध्वी बन्नोमाँ जत्रा

0
बोधेगाव येथे भरणारी साध्वी बन्नोमाँ जत्रा हिंदु-मुस्लिम लोक एकत्र येऊन साजरी करतात. दोन्ही समुदायांचे ते श्रद्धास्थान आहे. ती जत्रा १८९८ सालापासून नियमितपणे भरत आहे. अठरापगड जातीच्या लोकांमुळे अनेक प्रकारचे वैविध्य त्या एकाच जत्रेत एकवटलेले आढळते...

गाविलगड – स्थलानुरूप जल नियोजनाचा वारसा (Gavilgad – Bahamani fort is known for its...

गाविलगड किल्ला हे विदर्भाचे भूषण आहे. तो किल्ला अमरावतीतील चिखलदऱ्याजवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधे आहे. तो सातपुडा पर्वतरांगांच्या मध्यावर येतो. मेळघाटातील डोंगरद-यांमध्‍ये विखुरलेली किल्‍ल्‍याची व्यापकता आणि गडावरील वास्तुशिल्पातील कलाकुसर पाहून मन थक्‍क होऊन जाते.