Home Search

कादंबरी - search results

If you're not happy with the results, please do another search

तोरू दत्त – पहिली हिंदुस्थानी इंग्रजी कादंबरीकार (Toru Dutt – First Indian Novelist in...

0
तोरू दत्त ही पहिली हिंदुस्थानी इंग्रजी कादंबरीकार. तिचे काव्यही युरोपात अठराव्या शतकात गाजले. तिने फ्रेंच भाषेतही लेखन केले. तिचे एकूण दत्त कुटुंब हेच लोकविलक्षण होते. त्यांनी विल्यम कॅरे या इंग्रजी धर्मप्रसारकास आश्रय दिला; स्वत: ख्रिश्चन धर्म स्वीकारला, इंग्लंडला स्वत:ची मातृभूमी मानले आणि प्रेम मात्र हिंदुस्थानवर केले व हिंदुस्थानी जनतेची काळजी वाहिली...

यात्रेकऱ्याचा वृत्तांत – पहिली मराठी कादंबरी (The first Marathi novel -Traveler’s Diary)

मिसेस फेरार नावाच्या बार्इंनी 1838 साली तेव्हाच्या ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स’च्या सभासदांच्या प्रोत्साहनाने आणि सूचनांनी ‘यात्रेकऱ्याचा वृत्तांत’ नावाचे पाठ्यपुस्तक लिहिले. ते बराच काळ भारतातील शाळांमधून शिकवले गेले...
_Vihir_1.jpg

प्रत्ययकारी ग्रामीण कादंबरी – विहीर

राजेंद्र जगन्नाथ ठोंबरे यांनी ‘विहीर’ ही कादंबरी लिहिली आहे. ते येलूरसारख्या ग्रामीण भागात राहतात. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. आर्थिक परिस्थिती बेताची आहे. ते...
_Tarkarli_1_1.jpg

तारकर्ली – कर्णिकांच्या कादंबरीत कोकणचे हृदयस्पर्शी दर्शन

मधू मंगेश कर्णिक यांनी वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी ‘तारकर्ली’ ही कादंबरी लिहिली आहे. ती कोकण विभागासाठी महत्त्वपूर्ण आणि भविष्यकाळाच्या दृष्टीने धोक्याचा इशारा देणारी ठरते. कोकण...
_KaidKeleleKalap_1.jpg

मी कैद केलेले कळप ही कादंबरी का लिहिली?

0
आज जेव्हा या प्रश्नाचा विचार जेव्हा मी करतोय की ही 'कैद केलेले कळप’ ही कादंबरी मी का लिहिली तेव्हा मुळात मी लिहितोच का या...

रावसाहेब (A Book on History of Hyderabad Freedom Struggle)

4
एकोणिसावे शतक संपत आले होते. हैदराबाद राज्यातील हिंदू जनतेचे आत्मतेज जागृत करून विविध क्षेत्रात त्यांना कार्य प्रवृत्त करण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या पहिल्या फळीतील एक नेते होते न्यायमूर्ती केशवराव कोरटकर. त्यांच्या सहकार्याने येथे मराठी शाळा सुरू झाली. 'निजाम विजय'सारखे वर्तमानपत्र निघाले. मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना झाली. त्यांनी विधवा पद्धतीला विरोध करत स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला. हिंदू समाजाला स्वातंत्र्याचे स्वतःचे भान देणाऱ्या केशवराव कोरटकर यांचा परिचय मात्र हैदराबादमधील मराठी लोकांनाही नाही आणि महाराष्ट्रासाठी तर त्यांचे कार्य अपरिचितच आहे...

कथा, सामा वेलादीच्या पराक्रमाची ! (The story of Adiwasi youth who got British Albert...

6
राज्यातील अतिमागास, दुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात ‘जॉर्जपेठा’ व ‘ग्लासफर्डपेठा’ नावाची दोन गावे आहेत. ‘जॉर्जपेठा’ हे नाव ब्रिटिश वन अधिकारी ह्यू शॉ जॉर्ज यांच्या नावावरून पडले आहे. ‘जॉर्ज’ यांच्या जीवनातील ही सत्यकथा रोमहर्षक आणि तितकीच चित्तथरारक आहे. ती 1924 च्या सुमारास, म्हणजे शंभर वर्षांपूर्वी घडली. ती सत्यकथा गडचिरोली (विभाजनपूर्व चांदा) जिल्ह्यातील अतिदुर्गम, घनदाट जंगलातील गर्द, निबिड अरण्यात अशा प्रकारे गुडूप झाली की तिचा पुढे मागमूसही उरला नाही ...

अठ्ठेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-Eighth Marathi Literary Meet 1969)

वर्धा येथे 1969 साली झालेल्या अठ्ठेचाळिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते कवी प्रा. पुरुषोत्तम शिवराम रेगे. ते नवकवितेत स्वतःचा वेगळा प्रवाह जपणारे तरल कवी, अल्पाक्षराच्या वाटेने जाणारे कादंबरीकार आणि समीक्षक-संपादक म्हणून प्रसिद्ध आहेत. रेगे यांनी ‘सुहृद चम्पा’ आणि ‘रूपकथ्थक’ या टोपणनावांनीही लिखाण केले आहे. रेगे हे मूलतः सर्जनशील कलावंत होते. त्यांनी त्यांच्या लेखनाला ‘बालमित्र’ नावाच्या हस्तलिखित मासिकातून सुरुवात केली...

आगोम : निरामय सूक्ष्म औषधांचा वसा (Story of ‘Agom’ medicines)

0
ही गोष्ट आहे 1994 सालची. ‘गुटिका केशरंजना’ची धून आकाशवाणीवरून सकाळी सहा वाजता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गुंजू लागली आणि ‘आगोम’ हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोचले ! ‘आगोम’चे गूढ त्याच्या नावापासून सुरू होते, पण लोक आकृष्ट झाले ते त्या गुटिकेमुळे, ‘डोक्याचे केस शाबूत राहतात’ या प्रभावाने. ‘आगोम’ हे औषधालय रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रकिनारी एका छोट्याशा खेड्यात वसले आहे. दापोली तालुक्यातील कोळथरे हे ते गाव. ते सध्या कासव महोत्सवामुळेही गाजत आहे...

अनंत काणेकर – अस्सल मराठी बाणा

0
अनंत काणेकर नेहमी म्हणत, ‘माणसाने नुसते जगू नये, जगण्याला काही अर्थ आहे का हे सतत शोधत राहवे’. काणेकर स्वत: त्यांचे पंच्याहत्तर वर्षांचे आयुष्य अर्थपूर्ण, आनंदी वृत्तीने जगले आणि त्यांनी त्यांच्या सहवासात येणाऱ्या सर्वांना प्रसन्न वृत्तीने कसे जगावे हे शिकवले. त्यांचे मूळ गाव मालवणचे मेढे. त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून काम मुंबईच्या खालसा कॉलेजात पाच वर्षे आणि सिद्धार्थ महाविद्यालयात चोवीस वर्षे केले...