Home Search

कला - search results

If you're not happy with the results, please do another search

लोककलांचा वारसा: भारूड आणि कीर्तन (Folk Arts – A Cultural Heritage)

2
महाराष्ट्राला लोककलांची समृद्ध परंपरा आहे. लोकनाट्य, वगनाट्य, दशावतार, तमाशा, कीर्तन, भारूड, पोवाडा अशा लोककलांशी सर्वसाधारण मराठी माणसाचा परिचय असतो. या सर्व कला ही मनोरंजनाची साधने आहेत. सहजता, उस्फूर्तता ही लोककलांची वैशिष्ट्ये. अशा अनेक लोककलांनी महाराष्ट्र समृद्ध आहे. त्यांपैकीच दोन लोककला म्हणजे 'भारूड' आणि 'कीर्तन'. मनोरंजनातून प्रबोधन हे ह्या दोन्ही लोककला प्रकारांचे वैशिष्ट्य आहे. लेखात भारूड आणि कीर्तन या लोककलांच्या विविध प्रकारांचा परिचय करून दिला आहे...

धनगरी लोककलांच्या संवर्धनाचा अनोखा अविष्कार

धनगरी लोककला संवर्धनासाठी एक दिवसाचे शिबिर कोल्हापूरजवळ कसबा बावडा येथे झाले. धनगरी लोककलांमधील पंचवीसाहून अधिक प्रकार सुमारे अडीचशे कलाकारांनी सादर केले. तो अनोखा व अफाट आविष्कार ठरला. तीन संस्थांनी एकत्र येऊन एवढा मोठा घाट घातला होता. हालमत सांप्रदाय मंडळ (कुपवाड), शिवाजी विद्यापीठाचे राजर्षी शाहू लोक संस्कृती केंद्र आणि कसबा बावडा येथील बिरदेव धनगर समाज मंडळ या त्या तीन संस्था...

अचलपूरचा समाजसुधारक कलावंत – राजा धर्माधिकारी

अचलपूरच्या सांस्कृतिक विश्वातील हरहुन्नरी हास्य कवी, कलाकार राजा धर्माधिकारी म्हणजे दिलखुलास गप्पांचा धबधबाच ! नर्म विनोदी कोट्या करून वातावरण हलकेफुलके करण्याची त्यांची लकब मनाला भावते. ते हातचे काही न राखता भरभरून बोलत असतात, तो वऱ्हाडी संभाषणाचा नमुनाच ठरून जातो...

अवलिया कलावंत- वसीमबारी मणेर

0
फलटणचा वसीमबार्री मणेर हा अवलिया कलावंत आहे ! कला हा त्याच्या जगण्याचा ध्यास आहे. तो चित्रपट दिग्दर्शक-निर्माता, लेखक, चित्रकार, चलचित्रकार, शिक्षक, प्रकाशक, बालसाहित्यिक, स्थापत्य विशारद अशा विविध क्षेत्रांत, जेथे जेथे संधी मिळेल तेथे तेथे मुशाफिरी करतो; सिनेनिर्मिती आणि लेखन कार्यशाळा घेतो...

सखा कलाल – एका कथाकाराची अखेर

सखा कलाल गेले आणि पंचेचाळीस वर्षांचा स्नेह सरला. सखा कलाल स्वत:विषयी फार कमी बोलायचे, त्यामुळे त्यांची जीवनकथा त्यांच्यासमवेत गेली. त्यांचे ‘ढग’ आणि ‘सांज’ हे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले...

सांगली जिल्ह्यातील कलावंतीणीचे कोडे ! (The mystery design in Sangli district)

कोड्याबद्दल वेगवेगळ्या आख्यायिका ऐकण्यास मिळतात. मणेराजुरीत कलावंतीण राहण्यास आली. तिने तिची कला सादर करताना, तिच्या बुद्धीच्या जोरावर अनेक मातब्बरांना, राजे-रजवाड्यांना पराभूत केले. तिने तिच्या बुद्धिसामर्थ्याने माळरानावर लहानमोठ्या दगडगोट्यांचे कोडे मांडले.