Home Search
कलावंत - search results
If you're not happy with the results, please do another search
अचलपूरचा समाजसुधारक कलावंत – राजा धर्माधिकारी
अचलपूरच्या सांस्कृतिक विश्वातील हरहुन्नरी हास्य कवी, कलाकार राजा धर्माधिकारी म्हणजे दिलखुलास गप्पांचा धबधबाच ! नर्म विनोदी कोट्या करून वातावरण हलकेफुलके करण्याची त्यांची लकब मनाला भावते. ते हातचे काही न राखता भरभरून बोलत असतात, तो वऱ्हाडी संभाषणाचा नमुनाच ठरून जातो...
अवलिया कलावंत- वसीमबारी मणेर
फलटणचा वसीमबार्री मणेर हा अवलिया कलावंत आहे ! कला हा त्याच्या जगण्याचा ध्यास आहे. तो चित्रपट दिग्दर्शक-निर्माता, लेखक, चित्रकार, चलचित्रकार, शिक्षक, प्रकाशक, बालसाहित्यिक, स्थापत्य विशारद अशा विविध क्षेत्रांत, जेथे जेथे संधी मिळेल तेथे तेथे मुशाफिरी करतो; सिनेनिर्मिती आणि लेखन कार्यशाळा घेतो...
सांगली जिल्ह्यातील कलावंतीणीचे कोडे ! (The mystery design in Sangli district)
कोड्याबद्दल वेगवेगळ्या आख्यायिका ऐकण्यास मिळतात. मणेराजुरीत कलावंतीण राहण्यास आली. तिने तिची कला सादर करताना, तिच्या बुद्धीच्या जोरावर अनेक मातब्बरांना, राजे-रजवाड्यांना पराभूत केले. तिने तिच्या बुद्धिसामर्थ्याने माळरानावर लहानमोठ्या दगडगोट्यांचे कोडे मांडले.
श्रीराम जोग – बहुरंगी नाट्यकलावंत
श्रीराम जोग हे इंदूर येथील नाट्यकलावंत. वय वर्षे छप्पन. त्यांना अभिनयाची उत्तम जाण आहे. त्यांच्या कलात्मक व्यक्तिमत्त्वाला नाट्यदिग्दर्शन आणि कलादिग्दर्शन असे इतरही पैलू आहेत....
श्रीधर फडके – सद्गुणी कलावंत
“मी कोणत्याही कलेची साधना ही देवपूजाच मानतो” असं म्हणणारे श्रीधर फडके हे नव्या पिढीतील प्रज्ञावंत, प्रतिभावंत, अग्रगण्य संगीतकार व गायक आहेत. प्रख्यात गायक व...
स्मृती.. मनस्वी कलावंताच्या.. (Memory .. of a Sensible artist ..)
माणसाच्या आयुष्यात तीन 'P' अत्यंत महत्त्वाचे ठरतात. Period, Place & Persons. माझ्या भाग्याने, मी अनेक चांगल्या व्यक्तींच्या संपर्कात आलो. माझ्या व्यक्तिमत्त्वावर आणि माझ्या घडणीवर...
रमेश बाळापुरे – ना हरली जिद्द ! (Ramesh Balapure – stage actor with determination)
रमेश बाळापुरे यांचा जन्म झाला तो मुळी बाविशी नाट्यमंदिरात. रमेशला त्याच्या तरुणपणीही बाविशीचे स्टेज अनायासे प्राप्त झाले ! रमेशचे मामा लगदेमास्तर हे नाटकात कामे करत. रमेशमध्ये नाटक असे अनुवंशिकतेने उतरले होते. रमेशला निसर्गानेसुद्धा मदतच केली. त्याला प्रमाणबद्ध उंची, मोठे आकर्षक डोळे, हसरा चेहरा अशी शारीरिक संपत्ती लाभली. रमेश आणि मी नाटकातील जोडगोळी बनलो. रमेशने नाटक निवडावे- दिग्दर्शित करावे आणि मी त्यात विनोदी भूमिका करावी असा परिपाठ झाला...
मराठी भाषा-साहित्य : अचलपूरचे योगदान
अचलपूर तालुक्याने मध्यप्रदेश या हिंदीभाषिक राज्याच्या सीमेवर असतानासुद्धा मराठी भाषा केवळ जगवली नव्हे तर वाढवलीसुद्धा आहे. अचलपूर परिसरातील बोलीचे सौंदर्य, तिचे उच्चारविशेष, रूपविशेष, तिचे आगळेपण भाषातज्ज्ञसुद्धा मान्य करतात. मूळात अचलपूरला मोठी वाङ्मयीन परंपरा लाभलेली आहे. ती मराठी भाषेच्या वृद्धीकरता पूरक ठरलेली आहे...
विदर्भ मिल्सचे सांस्कृतिक वैभव हरवले ! (Rich Family of Vidarbh Mills Staff & Workers)
अचलपूरची विदर्भ मिल केव्हाच बंद पडली. तेथे आणलेली ‘फिनले मिल्स’ही टिकू शकली नाही. परंतु ‘विदर्भ मिल्स’चे कामगार व कर्मचारी यांच्यासाठी बाबासाहेब देशमुख यांच्या पुढाकाराने बांधलेल्या वसाहतीतील सांस्कृतिक जीवन हा कित्येक दशकांसाठी तेथील रहिवाशांकरता ठेवा होऊन राहिला आहे. त्या कामगार-कर्मचाऱ्यांचे गणेशोत्सवापासून क्रिडास्पर्धेपर्यंत अनेकानेक ‘इव्हेण्टस’ होत. त्या प्रत्येक घटनेमधून मुलामाणसांसाठी नवा संस्कार प्रस्थापित होई. तेच तर त्या रहिवाशांचे ‘धन’ होते. त्यामुळे मिल चालू असणे वा बंद असणे याचा परिणाम त्यांच्या जीवनावर क्वचितच जाणवला असेल...
ना.ग. गोरे – राजकारणी व साहित्यप्रेमी
समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांच्या जीवनात कर्मयोग, बुद्धिप्रामाण्यवाद आणि कलात्मकता यांचा विलोभनीय संगम दिसतो. त्यांनी तो संगम सार्वजनिक जीवनात वावरताना साधला होता. त्यांच्या भाषणात, लेखनात, संवादात विचारांचे धागे बांधेसूदपणे अन् कलात्मकतेने विणलेले आढळतात. त्यात बुद्धिप्रामाण्य, तर्कशुद्धता आणि विवेकाचे भान यांचा अनुभव येतो...