Home Search
कलाकार - search results
If you're not happy with the results, please do another search
जयंत भोपटकर – अष्टगुणांनी समृद्ध बहुरूपी कलाकार (Jayant Bhopatkar Multifaceted Talented Marathi Artist)
जयंत भोपटकर हे अमेरिकेत सिअॅटलला राहतात. ते उत्तम तबलजी आहेत; तितकेच कसदार अभिनेतेही आहेत. ते मराठी, हिंदी व इंग्रजी नाटकांत भूमिका करतात. त्यांनी सिअॅटलच्या मराठी मंडळात सदस्य ते अध्यक्ष अशी विविध पदे अकरा वर्षे भूषवली आहेत व मंडळासाठी आवडीने आणि मन लावून काम केले आहे. त्यांनी अमेरिकेत वाढलेल्या आणि मराठी भाषेचा गंध नसलेल्या मुलांना तीन वर्षे मराठी शिकवले.
अक्षता संजय शेटे – कलाकार व्यायामपटू
‘शेटे’ कुटुंब मूळ साताऱ्याचे. अक्षता ही त्यांची आजच्या पिढीची प्रतिनिधी. ती आहे ‘सातारा भूषण’ अक्षता संजय शेटे. तिने तिच्या कर्तृत्वाने देशाचे क्रीडाक्षेत्र लहानपणात गाजवले...
चंद्रपूरचे अवलिया कलाकार मनोहर सप्रे
विदर्भातील नांदोरा गावात जन्मलेले (४ जानेवारी १९३३) मनोहर सप्रे चंद्रपुरकर झालेले आहेत. ते नांदोरा, अकोला अशा ठिकाणी शिक्षण घेत घेत चंद्रपूरला येऊन पोचले, तेव्हा...
रांगोळी-नृत्यकलाकार – भूषण पाटील
जूचंद्र हे गाव रांगोळी कलाकारांसाठी प्रसिद्ध आहे. ते ठाणे जिल्ह्याच्या वसई तालुक्यात येते. जूचंद्रचे कलाकार प्रसिद्धीच्या झोतात नव्वदच्या दशकापर्यंत फारसे नव्हते. परंतु तेव्हा सुनील...
श्रीधर फडके – नव्या पिढीतील प्रज्ञावंत कलाकार
“मी कोणत्याही कलेची साधना ही देवपूजाच मानतो” असं म्हणणारे श्रीधर फडके हे नव्या पिढीतील प्रज्ञावंत, प्रतिभावंत, अग्रगण्य संगीतकार व गायक आहेत. प्रख्यात गायक व...
नाट्यकलाकार – डॉ. शरद भुथाडिया
डॉ. शरद भुथाडिया गेली पंचवीस वर्षे कोल्हापुरात बालरोग तज्ज्ञ म्हणून खाजगी प्रॅक्टिस व महानगरपालिकेत काम करत आहेत. बलसाड-गुजरातमधील गुजराथी शिंपी कुटुंबात जन्मलेले भुथाडिया इथे...
परंपरा जपणारे शिंदी बुद्रुक
चक्रधर स्वामी यांचे वास्तव्य लाभलेले, ग्रामदेवता मरिआईची मिरवणूक, 'द्वारकाच्या बैला'ची मिरवणूक, श्रावणात घरोघरी केल्या जाणाऱ्या 'माळी पौर्णिमे'ची पूजा अशा अनेक आगळ्यावेगळ्या प्रथा, परंपरा, उत्सव जोपासणारे, एकेकाळी अजरामर संगीत नाट्यकलावंत घडवून ‘नाटकांची शिंदी’ म्हणून ओळख निर्माण केलेले, 'शिक्षकांचे गाव' अशी वैविध्यपूर्ण ओळख असलेले अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील गाव म्हणजे ‘शिंदी बुद्रुक’...
दिलासा – रुग्णांच्या चेहऱ्यावरील हसू (Smiles on the faces of patients at Dilasa)
व्याधिग्रस्त वृद्ध लोकांना सांभाळणे, त्यांचे औषधपाणी करणे, त्यांना त्यांचा शारीरिक त्रास, वेदना कमी होण्यासाठी मदत करणे, विकलांग, मतिमंद मुलांना आयुष्य चांगले जगण्याकरता मदत करणे अशी कामे करणारी ‘दिलासा’ ही नाशिकमधील अठरा वर्षे जुनी संस्था आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले सतीश जगताप आणि राज्यसेवेच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उज्ज्वला जगताप या दाम्पत्याने नेहमीच्या वाटा बदलून स्वतःची स्वतंत्र वाट निर्माण केली...
अप्रकाशित हिऱ्यांना पैलू पाडणारी शाळा (The school that anvils undiscovered diamonds)
ग्रामीण किंवा निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना शहरातील अनेक गोष्टींबद्दल कुतूहल असते. किंबहुना ते अप्राप्य असल्याची जाणीवही मनात असते. उभरत्या मुलांच्या मनात कोणताही गंड राहू नये, या भावनेने त्यांना योग्य संधी, योग्य मार्गदर्शन देण्याची कळकळ शिक्षकांच्या मनात असेल, तर मुलामुलींचे निरोगी फुलासारखे फुलणारे व्यक्तिमत्त्व तयार होते. जितेंद्र पराडकर यांच्यासारखे शिक्षक पैसा-पैसा जमवून विद्यार्थ्यांसाठी ‘पैसा फंड कलादालन’ उभे करतात त्याची ही गोष्ट....
सदाशिव अमरापूरकर यांचे समाजभान (Sadashiv Amrapurkar His Acting Talent And Social Consciousness)
सदाशिव अमरापूरकर यांचे व्यक्तिमत्त्व असण्यापेक्षा ‘दिसण्या’वर भाळणाऱ्या सिनेमासारख्या चंदेरी दुनियेला अजिबात मानवणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या जगात वावरूनही स्वत:च्या प्रतिमेपेक्षा स्वत:च्या प्रतिभेवर विश्वास ठेवला आणि रूढी-चौकटी मोडून स्वत:साठी वेगळी वाट निवडली. त्यांनी सिनेमात करियर केली. पण ते स्वत:च्या विचाराने व स्वत:च्या शैलीने जगले. त्यांनी लोकप्रियता हा सगळ्यात महत्त्वाचा गुण मानल्या गेलेल्या सद्य काळात मूल्ये महत्त्वाची मानली. ते अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील अमरापूर गावातून आले होते...