Home Search

उद्योगधंदे - search results

If you're not happy with the results, please do another search

परंपरा जपणारे शिंदी बुद्रुक

चक्रधर स्वामी यांचे वास्तव्य लाभलेले, ग्रामदेवता मरिआईची मिरवणूक, 'द्वारकाच्या बैला'ची मिरवणूक, श्रावणात घरोघरी केल्या जाणाऱ्या 'माळी पौर्णिमे'ची पूजा अशा अनेक आगळ्यावेगळ्या प्रथा, परंपरा, उत्सव जोपासणारे, एकेकाळी अजरामर संगीत नाट्यकलावंत घडवून ‘नाटकांची शिंदी’ म्हणून ओळख निर्माण केलेले, 'शिक्षकांचे गाव' अशी वैविध्यपूर्ण ओळख असलेले अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील गाव म्हणजे ‘शिंदी बुद्रुक’...

विसापूर – दापोलीच्या छायेत

विसापूर म्हणजे गुणवत्तेची खाण ! निसर्ग आणि मनुष्यसंपत्ती- दोन्हींची श्रीमंती. गाव दापोली तालुक्याहून मंडणगडकडे जाताना लागते. एकीकडे दापोली व दुसरीकडे खेड, हे दोन्ही तालुके प्रत्येकी बावीस किलोमीटरवर येतात. मंडणगड तालुका अठरा किलोमीटरवर तर महाड तालुका बत्तीस किलोमीटरवर आहे. म्हणून ते गाव मध्यवर्ती ठिकाण. गावाची रचना म्हणजे मध्यवर्ती विसापूर व सभोवताली नऊ वाड्या. गावाभोवती चहुबाजूंनी हिरवेगच्च डोंगर आहेत, गावातून कालवा काढलेला असावा अशी नदी वाहते...

राजा-रेणू दांडेकर – चिखलगावचे ध्येयप्रेरित जोडपे

राजा दांडेकर हे दापोली तालुक्यातील चिखलगावचे. त्यांनी शिकून- डॉक्टर होऊन परत स्वत:च्या गावी यायचे ठरवले होते. ते ध्येयवादाने झपाटलेले व्यक्तिमत्त्व. भारताचा इतिहास व भारतीय संस्कृती यांच्यावरील प्रेम त्यांच्यात ठासून भरलेले आहे. त्यांनी लोकसाधना संस्थेच्या माध्यमातून शाळा काढली. तेथे शासनाचा अभ्यासक्रम सांभाळून प्रत्येक मुलाला प्रयोगशील उत्पादक शिक्षण कसे देता येईल असा प्रयत्न असतो...

साम्यवाद कधीच मेला आहे

साम्यवाद कधीच मेला आहे ! त्याची मुख्य सूत्रे दोन होती- 1.राजकीय सत्ता फक्त कामगारवर्गाच्या हातात असावी, 2. उत्पादनाची सर्व साधने समाजाच्या मालकीची असावीत...

राज्यघटनेची पूर्वतयारी अशी झाली! (Steps to India’s Constitution During British Rule)

भारताची राज्यघटना ही अनेक स्थित्यंतरांतून विकास पावत गेली आहे. ती उदय पावली, ब्रिटिशांशी झालेल्या संघर्षातून. तिचे स्वरूप आकार घेऊ लागले एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून आणि तेव्हाच, ती संसदीय लोकशाहीच्या दिशेने वाटचाल करू लागली.

कॅनडात कोरोनाविरुद्ध सरकार तत्पर (Canada’s Govt. Controls Corona)

कोरोनाची साथ काही देशांत आटोक्यात येऊ लागली आहे. त्यांतील एक देश आहे कॅनडा. कॅनडा हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे. तो भारताच्या तिप्पट मोठा आहे. पण तेथील लोकसंख्या आहे अवघी साडेतीन कोटी. त्यांना उरलेली अर्धी जमीनसुद्धा पुरेशी आहे.

कोरोना: रवांडा देश लहान कृती महान (Corona: Rwanda Govt. Acted Fast)

69
रवांडा हा मध्य आफ्रिकेतील हृदयात वसलेला छोटासा देश. जगाच्या नकाशात पाहिले तर छोटा बिंदू; पण, खरे तर, मूर्ती लहान कीर्ती महान! हे मी स्वतः अनुभवत आहे. मी मुंबईहून येथे वास्तव्यास 2015 साली आले. ‘लँड ऑफ थाउजंड हिल्स’ अशी त्या देशाची स्तुती मी ऐकून होते. तशीच प्रचिती येत आहे या देशाची.
_anant_bhalerav_loneta_sanpadak

अनंत भालेराव – लोकनेता संपादक

‘मराठवाडा’ वृत्तपत्र आणि संपादक अनंतराव यांची भाषा या दोन्हींचे ‘मराठवाडा’ या भूप्रदेशाच्या संस्कृतीशी अजोड नाते आहे. मराठवाड्यात सर्वसामान्य माणसे जी भाषा बोलत, जे वाक्प्रचार...
-pradip-mohite

महाराष्ट्र : भविष्यातील अंधार भेडसावतो!

महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्राच्या स्थापनेला 2019 मध्ये साठ वर्षें पूर्ण झाली. त्या निमित्ताने सामाजिक, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रांतील अभ्यासकांशी चर्चा...
-akola

माझा अभिमान! – माझे गाव उमरी अकोला (Umari Akola)

अकोला हे आजचे महानगर शेजारील फार थोड्या अंतरावर असलेल्या सहा-सात गाव-वस्त्या मिळून तयार झाले आहे. अकोला हे पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे शहर मानले जाते. ब्रिटिश...