Home Search
उत्सव - search results
If you're not happy with the results, please do another search
केळशी देवीचा उत्सव : समाजजीवनाचे प्रतिबिंब
केळशीच्या महालक्ष्मी मंदिराचा उत्सव खूपच मोठा असतो. मंदिर हा पेशवेकालीन वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. उत्सवास केवळ धार्मिक स्वरूप नाही; तर त्यातून केळशी गावाचे समाजजीवन प्रतिबिंबित होते. उत्सव चैत्रशुद्ध अष्टमी ते पौर्णिमा या कालावधीत होतो.
वर्षावास : एक बौद्धधम्म उत्सव Warshawas (Rest period in rainy season)- A Bauddha Dhamma...
वर्षावास असा एक संस्कार बौद्ध धम्मात, भगवान बुद्धाच्या धम्मशासनात आहे. तो करण्यामागे प्रयोजन आहे ते समानतेचे जीवन जगण्याचे. बुद्धांचे जीवन चारिकाप्रधान होते. गौतम बुद्ध एका गावाहून दुसऱ्या गावास प्रवास करत.
‘उत्सव कलाम’ – निबंधस्पर्धा
माजी राष्ट्रपती ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती 15 ऑक्टोबर या दिवशी असते. त्या दिवशी शाळांमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा केला जातो. आम्ही सात...
माणकेश्वराची शिव-सटवाई – उत्सव, स्वरूप आणि आख्यायिका
मराठवाड्यातील माणकेश्वर गावठाणामध्ये विविध ग्रामदैवतांची मंदिरे आहेत. ती उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम आणि परांडा या दोन तालुक्यांतील भौगोलिक प्रदेशात आढळतात. माणकेश्वरची निजामाच्या राजवटीचे शेवटचे टोक...
भुलाबाईचा उत्सव – वैदर्भीय लोकसंस्कृती
विदर्भात साजरा होणारा भुलाबाईचा उत्सव हा नवीन आलेल्या धान्याच्या पूजनासाठी, स्वागतासाठी असतो. भुलाबाईचा सण विदर्भासह मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत व खानदेशातील जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर...
आमटी, भाकरी आणि अणे येथील भक्तीचा उत्सव
यात्राउत्सवांतील विविधता गावागणिक बदलते. तशीच परंपरा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील अणे या गावाने जपली आहे. रंगदास स्वामींची तपोभूमी ही त्या गावाची ओळख. स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त...
गोव्यातील नाताळ : ख्रिस्तजन्माचा उत्सव
मला सगळ्या भारतीय सणांत नाताळचा सण आवडतो. मी गोव्यात नाताळच्या सणापासून नव्या वर्षापर्यंत छोटीशी सुट्टी घेतो. स्थलांतरित पक्षी थव्याथव्याने यावेत तसे परदेशस्थ सगेसोयरे आणि...
मुखवट्यातून उभ्या केलेल्या चार देवींची यात्रा
मुरूड, आंजर्ले व वेळास ही गावे दुर्गादेवीच्या, तर केळशी महालक्ष्मीच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. ती चारही गावे तीनशे वर्षांपासून या यात्रांनी एकमेकांशी जोडली गेली आहेत. यात्रांच्या शेवटच्या दिवशी रथयात्रा निघते, त्या दरम्यान प्रत्येक जातीजमातीतील एका ज्येष्ठ व्यक्तीला मानाचा विडा देऊन सन्मानित करण्याची रीत आहे. विनायक बाळ यांनी दापोली तालुक्यातील या चार गावांत मुखवट्यातून उभ्या करण्यात येणाऱ्या चार देवींच्या यात्रांचे वेगळेपण या लेखातून मांडले आहे...
जवाहरलाल नेहरू आणि सोलापूरचा मि. वेडी
जवाहरलाल नेहरू यांनी ‘भारताला संपूर्ण स्वातंत्र्य हवे’ अशी मागणी करणारा ठराव मांडला, तो लाहोर काँग्रेसमध्ये एकमताने मंजूर झाला. तेव्हा एकीकडे सविनय कायदेभंगाच्या चळवळीने उग्ररूप धारण केले, तर दुसरीकडे जवाहरलाल यांना अटक झाली. जवाहरलाल कैदेत सापडल्याने देशभरातील तरुण वर्ग प्रक्षुब्ध झाला. त्यातूनच सोलापूरच्या हाजूभाई चौकात कलेक्टरला खुनाची धमकी देणारे पत्र चिकटवलेले सापडले. त्या पत्राखाली पत्रलेखक म्हणून ‘मि. वेडी’ अशी सही होती…