Home Search

%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%AD%E0%A4%B5 - search results

If you're not happy with the results, please do another search

पाखाडी, पदपथ… कोकणचे फूटपाथ

4
पाखाडी हे पदपथ वा फूटपाथ यांचे एक रूप होय. सखल भागातून उंचावरच्या टेपाडावर जाण्या-येण्यासाठी दगडांनी बांधलेला रस्ता म्हणजे पाखाडी. त्या रस्त्याला फरसबंदी करण्यासाठी कोकणात मिळणाऱ्या जांभा दगडांचे चिरे वापरत. चार हजार वर्षांपूर्वी ग्रीकमधील नगररचनेत ते बांधण्याची पद्धत अवतरलेली दिसते. लंडनमध्ये सतराव्या शतकात रहदारीसाठी असलेल्या मुख्य रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी रस्त्यापासून किंचित उंच पदपथ बांधण्याची पद्धत रूढ झाली...

शेवगावच्या साहित्य चळवळीचा मानबिंदू – महात्मा सार्वजनिक वाचनालय

न्या. महादेव गोविंद रानडे यांनी 1885 साली स्थापन केलेले महात्मा सार्वजनिक वाचनालय हे शेवगावच्या साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू ठरले आहे. बाळासाहेब भारदे यांनी वाचनालयाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना त्यास वैभव प्राप्त करून दिले. वाचनालयात पन्नास हजारांहून अधिक ग्रंथ तर तीस दैनिके, सोळा साप्ताहिके, सहा पाक्षिके आणि वीस मासिके अशी संपदा आहे...

विराट विरार

विरार या एकेकाळी लहानशा असलेल्या गावाचे विराट नगरीत रूपांतर झाले आहे. हा लेख साधारणत: पाऊणशे वर्षांपूर्वीच्या विरारच्या गतस्मृतींमध्ये वाचकाला रमवतो. त्यावेळचे गावपण, परस्परांविषयीचा आपलेपणा व माणुसकीचा गहिवर, संस्कृतीच्या पाऊलखुणा झरझर डोळ्यांसमोरून तरळून जातात. भेदभावरहित अशी ती गावे शिक्षणाच्या विस्फोटाने, शहराच्या बंदिस्त जीवनशैलीने, आधुनिक सुविधा आणि श्रीमंतीने हरवून गेली आहेत...

अचलपूरची बावनएक्का व बावीशी नाट्यगृहे (Traditional theatres of Achalpur)

अचलपूरच्या नाट्यकलेला दीडशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. अचलपूरच्या बावनएक्का आणि बावीशी या दोन नाट्यगृहांतून नाट्यचळवळीतील विविध आयामांना बळ देण्याचे काम होत असे. मात्र, आता दोन्ही ठिकाणी वैभवाच्या शिखरावर असलेल्या नाट्यपरंपरा खंडित झाल्या आहेत…

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ – महाराष्ट्राचे समग्र चित्र

ग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते...