Home Search

%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF - search results

If you're not happy with the results, please do another search

नृत्यभूषण श्रीधर पारकर

महाराष्ट्रात नृत्यकलेला पन्नासच्या दशकात फारशी प्रतिष्ठा नव्हती. त्यावेळी पुरुष नृत्य कलाकाराला ‘नाच्या’ म्हणून हिणवण्यात येत असे. अशा काळात कुटुंब आणि समाजातील अपसमजांना डावलून वसईतील श्रीधर  पारकर यांनी केलेली वाटचाल महत्त्वपूर्ण ठरते. पारकर पति-पत्नीने ‘नृत्यकिरण’ या संस्थेच्या माध्यमातून जवळपास सात दशके नृत्यसेवा केली...

पुरोगामी विचारांचा वारसा – सासकल

फलटण तालुक्यातील सासकल हे एक छोटेसे गाव. त्या गावातील ग्रामस्थ ग्रामविकासाबाबत सजग आहेत. पारंपरिक धर्मभावनेला आधुनिक विचारांची जोड देणाऱ्या सासकल या गावाने त्याचा ठसा क्रीडा क्षेत्रातही आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला आहे...

गाडगेबाबा – जिणे गंगौघाचे पाणी ! (Saint Gadgebaba’s Life of Service and Sacrifice)

गाडगेबाबा जिथं जिथं न्यून जाणवलं, तिथं तिथं ते भरून काढण्यासाठी नेटानं प्रयत्न करत राहिले. अनेकांची आयुष्यं त्यांच्या सहवासाच्या लेपानं सुगंधित झाली. गाडगेबाबा सभोवती माणसांचा समुद्र पसरलेला असतानाही आतून नि:संग राहिले...

हार्मोनियम बनवण्याची चाळीस वर्षांची परंपरा

0
पांचाळ कुटुंबीयांचा पिढीजात व्यवसाय हा सुतारकामाचा. दत्ताराम पांचाळ यांनी त्यांचे भाऊ विश्वनाथ यांच्याकडून हार्मोनियम तयार करण्याचे कौशल्य संपादन केले. त्यांनी हरिभाऊ विश्वनाथ ह्या वाद्य निर्मिती कंपनीत नोकरीदरम्यान तंतुवाद्याच्या दुरुस्तीतील आठ वर्षांच्या अनुभवानंतर स्वत:चा हार्मोनियम बनवण्याचा व्यवसाय सुरू केला...

शास्त्रीय संगीतास हार्मोनियमची बाधा (Harmonium Mars Classical Indian Music)

मी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शुद्ध स्वरूपात ऐकून, त्याचा खरा आनंद मिळवायचा असेल तर हार्मोनियम हे वाद्य दूर सारावे लागेल. ते हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला अजिबात योग्य नाही; किंबहुना मारक आहे. ठाण्याचे डॉ. विद्याधर ओक यांच्या ‘बावीस श्रुती’ या पुस्तकामुळे हिंदुस्थानी संगीतातील मोठी त्रुटी लक्षात आली...