-
प्रत्येक मराठी माणसाने त्याच्या/तिच्या परिसराची सत्य माहिती द्यावी –
- कर्तबगार व्यक्ती - उपक्रमशील संस्था
- संस्कृतीचे वैभव – यात्रा, जत्रा, बाजार, किल्ले, लेणी... अगदी स्थानिक खाद्यपदार्थसुद्धा.
हे लिहून द्यावे, टिपावे, फोटोग्राफ, व्हिडिओत बद्ध करावे, ऑडिओ आधारे श्रवणपरंपरा जपावी... क्राऊड सोअर्सिंग हा लोकशाही यशाचा मंत्र आहे. (लिहिण्याकरता – लिंक) प्रत्येक जाणत्या, समंजस, संवेदनशील, विचारी माणसाने त्यचा भवताल याप्रमाणे टिपला तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा केवढा तपशीलवार व सूक्ष्म ‘डेटा’ संग्रहित होईल ! त्याची संगती शोधणे, अर्थ लावणे हे विद्वानांना मोठे काम होईल !
प्रत्येक मराठी माणसाने त्याचे किमान फक्त एक हजार रुपये या प्रकल्पास सहाय्य करावे. तर प्रकल्प पाच वर्षांत साकार होईल आणि तेव्हा संगणकाच्या/मोबाईलच्या पडद्यावर जणू महाराष्ट्राचे म्युझियम साकारलेले असेल. एका क्लिकवर महाराष्ट्राबाबत हवी ती माहिती उपलब्ध होईल. पक्षीय राजकारण व गुंडगिरी वगळून. तुमच्या सहकार्याविना ते स्वप्न अधुरे राहील.
कृती - ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर दोन नवीन माहितीपर लेख रोज प्रसिद्ध करावे अशी मनीषा आहे. ते मुख्यत: व्यक्ती - संस्था - संस्कृतिवैभव या तीन प्रकारांत व तालुका हे माहितीसंकलन केंद्र समजून संकलित केलेले असतील. -
मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्र साकार करू पाहणारा ध्येयनिष्ठ प्रकल्प.
नवे लेख
नृत्यभूषण श्रीधर पारकर
महाराष्ट्रात नृत्यकलेला पन्नासच्या दशकात फारशी प्रतिष्ठा नव्हती. त्यावेळी पुरुष नृत्य कलाकाराला ‘नाच्या’ म्हणून हिणवण्यात येत असे. अशा काळात कुटुंब आणि समाजातील अपसमजांना डावलून वसईतील श्रीधर पारकर यांनी केलेली वाटचाल महत्त्वपूर्ण ठरते. पारकर पति-पत्नीने ‘नृत्यकिरण’ या संस्थेच्या माध्यमातून जवळपास सात दशके नृत्यसेवा केली...
तिफण फाउंडेशनचा समाज माध्यमातून ‘कृषी विस्तार’
समाज माध्यमांच्या वापरातून कृषी विस्तार अधिक व्यापकपणे व्हावा या उद्देशाने तिफण फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. शेतकऱ्यांपर्यंत नवनव्या शेती पद्धतींची माहिती, आधुनिक शेतकीचे ज्ञान व कौशल्ये पोचावी याकरता सहाय्यक कृषी अधिकारी हे फेसबुक पेज व द फार्म बुक या युट्यूब चॅनलचा वापर केला जातो...
देविका घोरपडे फलटणची सुवर्णकन्या (Phaltan’s Boxer Devika Ghorpade)
देविका घोरपडे बॉक्सिंग स्पर्धेत अकरा सुवर्णपदकांची मानकरी ठरली आहे. देविका इतिहासप्रसिद्ध संताजी घोरपडे यांची वंशज. वारसाहक्काने मिळालेले धाडस व मेहनती वृत्ती हे या सुवर्णकन्येच्या यशाचे गमक आहे...
आवाहन
शिक्षकांचे व्यासपीठ
लोकप्रिय लेख
नरहर मालुकवी – दुर्गे दुर्गटभारीचा कर्ता (Narhar Malukavi- Marathi and Telugu...
‘दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी’ ही आरती चुकीच्या पद्धतीने अनेकदा म्हटली जाते, कारण त्या रचनेचा अर्थ माहीत नसतो, त्यामागील संकल्पना माहिती नसते. त्या आरतीमध्ये कवीने मांडलेला विचार मुळातून समजून घेण्यासारखा आहे. महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय अशी ती आरती आहे. तेलंगणातील नरहर मालुकवी यांची ती रचना आहे...
राजकारण आणि गुंडगिरी यांपासून दूर महाराष्ट्रातील विधायक घडामोडींचे दर्शन !
व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प