सीडी देशमुखांचा मराठी बाणा (Spontaneous Lyrical Response by Finance Minister C.D. Deshmukh)

2
129

भारताचे माजी अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख (सीडी) यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात वेगळे आणि अनन्य स्थान आहे. त्यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा देऊन जो खंबीरपणा दाखवला ते मराठी बाण्याचे खरे रूप होय असा रास्त समज झाला. पंडित नेहरू यांची लोकप्रियता विलक्षण होती. सीडी यांनी त्यांच्यासमोर तो ताठपणा दाखवला होता.

 

            सीडी हुशार आणि तल्लख बुद्धीचे होते. ते मॅट्रिकला पहिले आले. त्यांना जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाली. त्यावेळी कवी गोविंदाग्रजांनी त्यांच्यासाठी कवन लिहिले.

वंश जाति तव, समाजत्यापरि महाराष्ट्र भाषा | आजपासूनी सर्वांनाही तुझी फार आशा.

        सीडी मराठीइतकेच संस्कृतचे परमभक्त. ते आयसीएस होऊन इंग्लंडहून परत आले. केंब्रिजमध्ये अपूर्व यश व आयसीएस परीक्षेतही सर्वप्रथम असे त्यांचे उज्ज्वल यश होते. त्यांनी एकामागून एक उच्च पदे भूषवली. ते रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर 1940 च्या सुमारास झाले; तसेच, ते जेम्स टेलर यांच्या जागी पहिले हिंदुस्थानी गव्हर्नर म्हणून 1943 मध्ये नेमले गेले. त्यांना नेहरूंनी त्यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रीपद 1950 मध्ये दिले. ते खासदार म्हणून रायगड जिल्ह्यातून निवडून आले. देशमुख मूळ रोह्याचे.

          चिंतामणराव देशमुख यांच्या काळात आयुर्विम्याचे राष्ट्रीयीकरण झाले. अर्थमंत्री या नात्याने त्यांनी घेतलेला तो महत्त्वाचा निर्णय. त्यांनी रिझर्व्ह बँकेपासून स्टेट बँकेपर्यंत सुरळीतपणे चालताना दिसणाऱ्या बँक व्यवहाराचे संघटन केले. संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला. मराठी भाषिकांचे एकसंध राज्य मुंबईसह निर्माण व्हावे म्हणून तो लढा पेटला. अशावेळी सीडींनी त्यांच्या राजीनाम्याने चैतन्य आणले.

            सीडींनी 25 जुलै 1956 रोजी जे भाषण लोकसभेत केले ते माझा जीवनप्रवाहया त्यांच्या आत्मचरित्रात परिशिष्ट म्हणून छापलेले आहे. त्यात ते म्हणतात “ज्या प्रांतातील लोकांनी मला निवडून दिले, ज्या मतदारसंघातील लोकांनी मला निवडून दिले त्यांच्या भावनांची कदर करणे माझे कर्तव्य आहे, म्हणून मी मंत्रीपद सोडतो.

            मुंबईतील गोळीबारात एकशेपाच हुतात्मे झाले, त्याची चौकशी करण्यास मोरारजी देसाई यांनी नकार दिला. हे कारणही सीडींनी राजीनाम्यासाठी दिले आहे. त्यांनी म्हटले आहे, अरेरावी व बेसनदशीर पद्धतीने निर्णय घेतले जातात’… “सत्तारूढ पक्षाच्या मनात महाराष्ट्राविरुद्ध आकस आहे!संयुक्त महाराष्ट्राची चळवळ देशमुखांच्या राजीनाम्याने शिगेला पोचली.

संसदेतील – उत्स्फूर्त काव्यरचना

चिंतामणराव देशमुख (सी.डी.) भारताचे अर्थमंत्री असतानाची एक वेगळी घटना नमूद करावीशी वाटते. त्यांनी अर्थसंकल्प लोकसभेत 8 मार्च 1956 रोजी सादर केला. त्यावर चर्चा सुरू झाली. त्यामध्ये हिंदी कवी मैथिलीशरण गुप्ता यांनी खासदार या नात्याने भाष्य केले आणि त्यांनी ते करताना त्यांच्या भाषणाचा शेवट प्रतिक्रियात्मक रीतीने व्यक्त केला, तो उत्स्फूर्त अशा कवितेतून. ती कविता पुढीलप्रमाणे

कुशलपत्र दूँगा पाऊगा अबके | आशा थी ऐसी |

 

किन्तु अडी है डाक डाकिनी | अब भी जैसी की तैसी ||

 

सरस्वतीने सोचा अब फिर भारत मे | चल करू बिहार |

 

सहसा हंस पख्त बीच मे निर्जल | वातावरण विहार ||

 

बोला, माँ, एक ही डाक ही कर | सकती है मरूपथ पार |

 

पर भाडे के लिये इष्ट है माता लक्ष्मी की मनुहार ||

त्यावर चिंतामणराव देशमुख यांनीही उत्स्फूर्त कविता करून उत्तर दिले! त्यांचे ते कवितेतील उत्तर असे

भारत भू के काय कल्प का | आज सजा है पावन याग |

 

स्नेहभरे1 कर लगा कमर को |बाँध2 पटसले, कवि मत भाग ||

 

सकल3 निगम और शिशु नरनारी | स्व स्व4पदोचित करके त्याग |

 

चले जुडाकर कर मे कर को5 | दृढता करमे |नयनो जाग ||

 

यही पारणा यही धारणा | यही साधना | कवि मत भाग ||

 

नया तराणा, गूँज उठावो | नया6 देश का गावो राग ||

1.     Love, Oil reference to excise on oil

2.     Cloth excise

3.     Corporate taxes

4.     Personal Income tax

5.     Joining hand : also tax added to tax 

6.     Name of raga

          – (राम देशपांडे यांच्या संग्रहातून 8600145353)

———————————————————————————————————————————

About Post Author

2 COMMENTS

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here