संगमनेरच्या नगरपालिकेने कामकाज 1860 मध्ये सुरू केले आणि सार्वजनिक सोयीसुविधांच्या बाबतीत एकेक प्रगती सुरू झाली. गाव अगदी छोटे असल्याने गावात आठ महत्त्वाच्या सार्वजनिक जागा निश्चित करून, तेथे लाकडी खांब 1860 साली रोवले गेले. त्या खांबांवर आठ कंदील लावण्यात आले. रोज संध्याकाळी अंधार पडण्याच्या वेळी नगरपालिकेचा एक कर्मचारी येऊन, त्या कंदिलाची काच पुसून तेलपाणी करी आणि कंदील पेटवून जात असे. लोकांना त्या गोष्टीचे मोठे अप्रूप वाटे...
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकशेअडतीस दशावतारी मंडळे आहेत. इतर लोककला काळाच्या उदरात गडप होत असताना, दशावतार मात्र अस्तित्व टिकवून आहे. अब्दुल नदाफ सारख्या नव्या नटांमुळे या कलाप्रकाराचे औत्सुक्य वाढत आहे...
भारताने बांगलादेशची निर्मिती पन्नास वर्षांपूर्वी पाकिस्तानला हरवून केली होती. त्यामुळे 2021-22 हे वर्ष त्याप्रीत्यर्थ सुवर्ण जयंती वर्ष म्हणून साजरे होत आहे. बांगलादेश स्वातंत्र्य संग्राम हा जगात युद्धशास्त्राच्या अभ्यासाचा विषय बनला आहे. अवघ्या तेरा दिवसांत युद्ध जिंकून एखाद्या देशाची निर्मिती व्हावी याचे ते एकमेव उदाहरण. त्या युद्धाचा कोड वर्ड होता ‘ऑपरेशन कॅक्टस लिली’ ! त्या युद्धात भाग घेतलेल्या तीन सैनिकांचे वास्तव्य देवरुख येथे आहे...
विष्णू आणि त्याचे राम व कृष्ण हे दोन मुख्य अवतार यांची आराधना करणारा तो वैष्णव संप्रदाय. नारायण-विष्णूमधील नारायण या देवाचा उल्लेख प्रथम ‘शतपथ ब्राह्यण’ ग्रंथात आढळतो. तो वैदिक देव नव्हे. विष्णू या देवाचा उल्लेख...
तिसरे साहित्य संमेलन सातारा येथे रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. ते दुसऱ्या संमेलनानंतर तब्बल वीस वर्षांनी भरले होते. रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या नावावर ग्रंथकार म्हणावे अशी ग्रंथसंपदा नव्हती. त्यांची फार मोठी साहित्यसेवाही नव्हती, तरीही ते तिसऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले...
भारतातील चालीरीती, व्रते, पूजा या परंपरेने, प्रांतानुरूप, जाती-समुदायनिहाय चालत आलेल्या आहेत. त्या बहुतेक सर्व निसर्गाच्या बदलांशी निगडित आहेत. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, फुले, फळे तसेच संबंधित विधींचे स्वरूप हे निसर्गाच्या त्यावेळी असलेल्या स्थितीला अनुरूप...
वाघनदीचे गोंदिया जिल्ह्याच्या लोकजीवनात महत्त्व अनन्यसाधारण आहे. वाघनदीचा उगम छत्तीसगढ राज्यात असून तिच्या उगमस्थानाजवळच्या गावाचे नावच बाघनदी आहे (हिंदीत वाघचा उच्चार बाघ असा केला जातो). बाघनदी हे गाव वेगाने शहरीकरणाकडे वाटचाल करत असले तरी वाघनदीचे ग्रामसौंदर्य मात्र त्या गावाने जपलेले आहे...
सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आधुनिक काळात फार यातायात करावी लागत नाही. ‘श्री सप्तशृंगीदेवी निवासिनी ट्रस्ट’चे प्रयत्न त्यास मुख्यत: कारणीभूत आहेत. गडावर वरपर्यंत वाहनांतून जाता येते; प्रत्येकी ऐंशी रुपयांचे तिकिट काढून रोपवेची सोय आहे. अगदी मंदिरापर्यंत...
‘हे नद्यांतील उत्तम, उत्तम माते आणि उत्तम देवी, आम्हा पामरांना ज्ञान आणि विवेक दे.’
भारतीय समाज आणि संस्कृती यांची पायाभरणी गंगा-यमुना-सिंधू या नद्यांच्या साक्षीने झाली. नदीच्या पात्रात होणारे बदल आणि प्रवाहाच्या सतत बदलत्या दिशा...
सिंधुरासुराचे मंदिर शेंदुरवादा या गावी (तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद) आहे. सिंधुरासुराचा वध व गणेशाचे स्वतःचे वाहन मूषक/उंदीर यास दिलेली मुक्ती या दोन प्रमुख पौराणिक घटनांचा संदर्भ शेंदूरवादा या गावाशी आहे. सिंधुरासुराच्या वधाची कथा गणेश...