सांगोला तालुक्यातील मंदिरांची वैशिष्ट्ये

0
24

सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यात तीन महत्त्वाची मंदिरे आहेत :

1. अंजनाळेचे महादेव मंदिर (हरि-हर मंदिर) – जुन्या काळात माण परगण्यात शैव व वैष्णव पंथीयांचा प्रभाव होता. त्यांनी हरि-हर नावाची मंदिरे निर्माण केली. त्यांतील महादेव मंदिर वैशिष्ट्यपूर्ण, वैविध्यपूर्ण आहे. मंदिर अकराव्या किंवा बाराव्या शतकातील असावे. तो काळ चालुक्यांचा होता. तेथे कलाकुसरीच्या मूर्ती एकूण अकरा आहेत. त्या म्हणजे द्वारपाल, महिषासूरमर्दिनी, सप्तमातृका, चामुंडा देवी, सूर्यमूर्ती, शंकरपार्वती, गणेश मंदिराचे पाच सभामंडप – नंदीमंडप, मुखमंडप, अंतराळ, सभामंडप, गर्भगृह.

2. चिणके – महादेव मंदिर (त्रिकूट मंदिर). त्रिकूट मंदिर म्हणजे ब्रम्हा, विष्णू, महेश यांचे मंदिर असावे. गजगौरीचे शिल्प आहे. मंदिरातील मूर्ती – महिषासूर मर्दिनी, शिवपार्वती, कोष्टकात (कोनाडे) शिल्पे ठेवलेली आहेत. गणेशशिल्प, चंद्रशिळा, दोन गर्भगृहे, महादेवाची वैशिष्ट्यपूर्ण पिंड.

3. जवळा – नारायण देव (हरि-हर) मंदिर – कोरडा नदीच्या उत्तर किना-यायावर तीस फूट उंचीच्या खडकावर चिरेबंदी मंदिर आहे. मंदिराजवळ भव्य उंच प्रवेशद्वार (वेस) उत्तराभिमुख आहे. मंदिरातील मुख्य मूर्ती विष्णूची (हरी) दगडी प्रभावळीत चार फूट उंचीची उभी आहे. ती मूर्ती चतुर्भूज आहे. पायाशी मानवी स्वरूपाचे दोन गरूड आहेत. ग्रेनाइटमधील उत्कृष्ट नक्षीदार मूर्ती आहे. मंदिर उत्तर चालुक्यकालीन असावे. वेळापूरच्या हरनारी मूर्तीशी साम्य आहे. जवळच दुसरे हर (शिव) मंदिर आहे. मंदिराचा काळ सहाव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंतचा असावा.

मंदिराची वैशिष्ट्ये : 1. कोनाकृती मंदिर व शिखरे, 2. विधान (तीन गर्भगृह असलेले – छत ) त्रिकोणाकृती शिळेवरील, 3. गर्भगृह – चौकोनी स्वरूपाचे, 4. द्वारशाखा – विशेष शिल्पाकृतीची, 5. अंतराळ – चांगल्या अवस्थेत, 6. मुखमंडप (प्रवेशद्वार), 7. खांबाचा पाया अष्टकोनी – उत्कृष्ट नक्षिकामासहित, 8. शिखर – कमी उंचीच्या लहान लहान शिखरांचे एक मोठे शिखर, 9. दर्शनी भाग – दहा ते तेरा फूट उंचीवर बांधलेले (जोत्यावर), 10. प्रवेशद्वारात गणपतीची मूर्ती, मारुतीची मानवाकृती मूर्ती

-भारत लोंढे

   

About Post Author