सत्यनारायणाची पूजा बंद!

67
50
_Satyanarayanachi_Puja_1.jpg

सत्यनारायणाच्या पूजा श्रावण महिन्यात सगळीकडे आयोजल्या जातात. तशीच ती पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात झाली. त्यास विरोध झाला. त्यामुळे पूजा चर्चेत आली. कोणी घरगुती पूजा करत असतील तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही. मी तर प्रसाद घ्यायलासुद्धा सभ्यता म्हणून घरी जातो. पण विशेषत: सरकारी कार्यालयात व सार्वजनिक ठिकाणी पूजा सर्रास होत असतात, त्यांना माझा विरोध आहे आणि मी तो व्यक्त करतो. मी ‘महाराष्ट्र राज्य वीज मंडळा’त काम करतो. मी माझ्या तीन कार्यालयांतील पूजा बंद केल्या, त्या वेगळ्या प्रकारे, थोड्या युक्तीने.

पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधील सत्यनारायण पूजा मीडियात गाजली. काही विद्यार्थ्यांनी तिला विरोध केला. प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे गेल्या काही वर्षांची परंपरा असल्याचे सांगून फेटाळले. ही परंपरा नव्हे, रुढी आहे आणि काही परंपरादेखील चुकीच्या असतील तर त्या बंद करणे गरजेचे असते. समाजसुधारकांनी गेली दीडशे वर्षांत जे केले तेही पाण्यात गेले काय? सतीप्रथा, बालविवाह, अस्पृश्यता अशा मानवतेला काळिमा फासणाऱ्या कुप्रथा पुन्हा सुरू करण्यात कोणाचे हित आहे?

आंदोलक विद्यार्थ्यांनी पूजेला बकरी ईद साजरी करण्याचा पर्याय दिला असेल तर तोही चुकीचा आहे. सरकारी आवारात, कार्यालयात, सार्वजनिक ठिकाणी धर्म आणणे हाच माणसामाणसांत विभागणी करण्याचा प्रकार आहे. घरात काहीही करा, पूजा पाहिजे त्या वेळी …पाहिजे त्या दिवशी करा….कोणीही त्याला विरोध करणार नाही. सरकारी कार्यालयांत, विशेषत: गावाकडे देवदेवतांच्या तसबिरी लावल्या जातात, तेथे त्यांची पूजा वगैरे होते. मी देवदेवतांच्या सरकारी कचेर्‍यांत लावलेल्या फोटोंबाबत माहितीच्या अधिकाराखाली माहिती विचारली. मी सरकारी कोणतेही सर्क्युलर नसताना इतके फोटो ऑफिसांत कसे लावले जातात अशी विचारणा केली. मला उत्तर मिळाले, की तसे सर्क्युलर नाही. त्यामुळे तसबिरींचे उच्चाटन तर माझ्याशी संबंधीत कार्यालयांमधून झालेच, पण पूजाही बंद झाल्या. अजून त्या इतर अनेक कार्यालयांत होत आहेतच. शिवाय, कार्यालयीन वेळेत! हा भ्रष्टाचार नव्हे का?

माझी डोंबिवली, अंबरनाथ व कसारा ह्या तीन कार्यालयांत बदली झाली. तिन्ही ठिकाणी ऑफिसांत देवदेवतांच्या तसबिरी नाहीत आणि सत्यनारायणाची पूजा होत नाही. निदान मी तेथे असेपर्यंत तरी पूजा बंद होत्या, त्याऐवजी वेगवेगळे उपक्रम घडले. मला माझी बदली झाल्यानंतरची हकिगत माहीत नाही. पण त्या तिन्ही ठिकाणी मी बॉस होतो व मी नियमाप्रमाणे वागत होतो. मी सध्या वांद्रे येथे मुख्य कार्यालयात आहे. तेथे मला बॉस आहेत. त्यामुळे मी पूजेला विरोध करतो, वर्गणी देत नाही, इतर समपदस्थांना त्याबाबत समजावून सांगतो. त्यामुळे माझ्यासारख्या चार-पाच जणांनी यंदा पूजेची वर्गणी दिली नाही. पूजा-जेवण व त्यानंतरचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम, कशातच आम्ही काही जणांनी सहभाग घेतला नाही. नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनीदेखील महापालिका सर्व कार्यालयांतील पूजा बंद केल्या. मुंढे यांची बदली झाल्यावर त्या कदाचित सुरू होतीलही. पण त्यांना त्यांचे वर्तन सरकारी कार्यालयाच्या नियमानुसार आहे हा आनंद केवढा आहे! त्यामुळे त्यांना धाडसी निर्णय घेण्याचे बळ मिळत असावे. मुख्य सचिवांनाच केव्हा तरी ‘सरकारी कार्यालयांत पूजा बंद’ हा फतवा काढावा लागेल!
माझे सहकारी माझ्याशी प्रथम याबाबत वाद घालत. परंतु मी त्यांना सांगितले, की ‘देव-धर्म ही खाजगी बाब आहे. ती तुम्ही घरी करा. सरकारी कार्यालयांत नको.’ ते त्यांना पटले, मी सहकार्‍यांबद्दलच्या आस्थेने त्यांच्या घरी पूजापाठप्रसंगी जातो, देवाला नमस्कार करतो, परंतु मी स्वत: तशा भानगडीत पडत नाही. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी व विशेषत: सरकारी कर्मचार्‍यांनी या बाबतीत वर्तन काळजीपूर्वक केले पाहिजे असे माझे मत आहे. मी ते आग्रहाने मांडतो.

आमच्या वाशाळा उपकेंद्राला २०१६ सालचा ‘सर्वोत्तम कामगिरी’चा पुरस्कार मिळाला. मी त्या उपकेंद्रात उपकेंद्र प्रमुख अधिकारी होतो. आम्हा प्रत्येकाला बक्षीस म्हणून तीन हजार रुपये मिळाले. प्रत्येकाने त्यातील एक हजार रुपये बाजूला काढून एकत्र भोजन केले व उरलेल्या पैशांमधून कॅरम, बास्केटबॉल, बॅडमिंण्टन या खेळांचे साहित्य विकत घेतले. त्यामुळे सर्व सहकारी अधिक जवळ आले. सर्वांनाच आंनद झाला. मी दाखवून दिले, की सत्यनारायणाला पर्याय असतो! एरवी, देवाच्या पूजेत कर्मचार्‍यांचे कोणते कर्तृत्व असते? वेळेचा अपव्यय; शिवाय, पूजेनंतर रात्री जुगार फक्त असतो! पूजेच्या नावाखाली कामातून सुटका. मी माझ्यापुरता पूजेला पर्याय शोधला. ‘आमच्या कामात शंभर टक्के पूर्ण असण्याची शपथ घेऊ’ हाही माझा आग्रह असतो.
कार्यालयात होणाऱ्या सत्यनारायणाच्या पूजेला मी पर्यायी म्हणून वेगवेगळे प्रयोग केले. कर्मचाऱ्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना कार्यक्रमात सहभागी करणे, मुलांच्या कलागुणांचे कौतुक करणे इत्यादी. पण पूजेचा पगडा त्यांच्या मनावर इतका बसलेला असतो, की कर्मचारी या कार्यक्रमाला येतात आणि कोठे सत्यनारायणाची पूजा असली, की तेथेही जातात. जावोत बापडे. त्यांना अधिकार, आविष्कार स्वातंत्र्य आहे.

मी कल्याणच्या हौसिंग सोसायटीतील रहिवाशांची सहल घाटघर येथील जलविद्युत केंद्र, नंतर ‘एमएसइबी’चे उपकेंद्र दाखवण्यासाठी एका स्वातंत्र्यदिनी नेली होती. ‘बीपीसीएल’ कंपनीतर्फे पेट्रोल, डिझेल, केरोसीन मुंबई ते दिल्लीपर्यंत एकाच पाईपमधून कसे वाहून नेले जाते ते दाखवले. रस्त्यावरील ट्रकचा भार कमी होण्यातील मदत समजावली. त्या गोष्टीला सात वर्षें झाली, तरी ती सर्वाना आठवते. त्यांना नवीन काहीतरी पाहिल्याचे समाधान लाभले. लोकांनी एका एका डिपार्टमेंटची कामे समजावून घेतली तरी नागरिक साक्षरता वाढेल. आता त्या नागरिकांपैकी कोणी लाईट गेली तर ‘एमएसइबी’ला शिव्या देत नाही.

माझे म्हणणे असे, की पूजा सरकारी कार्यालयांत करणे चुकीचे आहे. पूजा १५ ऑगस्टला, २६ जानेवारीला अशा ठेवण्याचा प्रघात वाढत चालला आहे. देशाच्या घटनेच्या विरोधी कार्यक्रम करण्याचे जे हे चालले आहे त्याला थांबवण्याचे कार्य सुजाण नागरिकांचे, जबाबदार अधिकाऱ्यांचे, प्रशासनाचे आहे. पण ते न होता जबाबदार व्यक्तीच पूजेचे समर्थन करताना दिसतात, मग कोणी ईद, नाताळ साजरा करण्याचा आग्रह धरू शकतो. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी झेंडावंदन करताना ध्वजास फुले वाहणे, झेंड्यासमोर नारळ फोडणे असे प्रकारही दिसतात. मी काही ठिकाणी त्याला विरोध दर्शवला. घटनेत जसे आहे तसे वागणे हेच योग्य राहील. प्रत्येक देशवासी म्हणून भारतीय तिरंगा कोण्या एका धर्माचा करणे हेही चुकीचेच.

मला तरी या पूजेत विषय मुद्दाम भिरकटवत ठेवणे, कामावरील लक्ष दुसरीकडे वळवणे, स्वतःचा मतलब साधणे व्यतिरिक्त काही दिसून येत नाही.

कार्यालय-कार्यालयांत स्पर्धा, कर्मचाऱ्यांना चांगल्या कामाबद्दल प्रोत्साहन, ऑफिस घरासारखे वाटेल असे वातावरण तयार करणे असे अनेक उपक्रम राबवता येतील. ते तरुण मुले कल्पकतेने राबवू शकतात. जुन्यांनी नव्याला वाव देऊन तर बघावे.

– श्रीकांत पेटकर, shrikantpetkar@yahoo.com

Last Updated On – 19th Sep 2018

About Post Author

Previous articleओवळेकरांची फुलपाखरांची बाग !
Next articleगाढविणीचे दूध ..
श्रीकांत बापुराव पेटकर हे महापारेषण (MSEB) कंपनीत पडघे (तालुका भिवंडी) येथे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. पेटकर यांच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या वीज केंद्रास सलग तीन वर्षे उत्कृष्ट वीज केंद्राचा पुरस्कार मिळाला. त्यांना लेखनाची आवड असून त्यांची ‘आणि मी बौद्ध झालो‘ या अनुवादित पुस्तकासोबत कल्याण, शांबरीक खरोलिका, चांगुलपणा अवतीभोवती, बेहोशीतच जगणं असतं, गजल अशी आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पेटकर यांनी चित्रकलेचा छंद जोपासला असून त्यांच्या चित्रांची दोन प्रदर्शने भरली होती. त्यांना ‘कल्याण रत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

67 COMMENTS

  1. Very good article and I fully
    Very good article and I fully agree with you. pan aajahi kahi lok educated asunahi aslya dev-devatan madhe budalele aahe tyachi khant vatate.

    Thanks & regards,
    Smita

  2. kathin aahe ya bharatat .
    kathin aahe ya bharatat . jati nasta hon kathin. deo dharma jane kathinch

  3. india ha far motha desh aahe.
    india ha far motha desh aahe. vegvegale dharm,panth, sanstha khupach aahe. khari lokshahi ithech aahe. vait gosti lavakarach atmasat hotat. khup kathin aahe. deo dhrm budvane.

  4. lokana sudhrvanya peksha
    lokana sudhrvanya peksha swatala sudhrane kadhhi uttamch. petkarani ti suruwat keli. good.

  5. मला अजिबात पटला नाही हा लेख..
    मला अजिबात पटला नाही हा लेख…

    सत्यनारायण निमित्त असते. त्यामुळे एक आनंदी उत्साही वातावरण निर्माण होते. कचेरीतील सगळी मंडळी एकत्र जमतात. हास्यविनोद होतो. लोकांची एकमेकांशी जवळीक निर्माण होते.
    तुमचा आक्षेप केवळ सत्यनारायण हिंदू धर्मातील एक प्रथा म्हणून तुम्हाला ती शासकीय कार्यालयात नको आहे. का? कारण त्यामुळे तुम्हाला लोक धार्मिक म्हणतील…तुम्ही तथाकथित पुरोगामी विचाराचे समजले जाणार नाहीत..
    कमालच आहे…हिंदू बहुसंख्य असलेल्या देशात एक हिंदूच अधिकारी सत्यनारायणाच्या पूजेला बंदी घालतो…आणि वर फुशारकी मारतो..
    ती माणसे काय तुमच्या खिशातून पैसे मागत होते? तुम्ही त्यांचा आनंद हिरावून घेतलात…यात अजिबात कौतुक तर नाही, उलट तुमच्या विचारांची कींव करावीशी वाटते.

  6. 1. PUJA KARYALAYIN VELET
    1. PUJA KARYALAYIN VELET THEWALI JATE. SUTTICHYA DIWASI THEWALI TAR KA LOK YET NAHI?KUTHE JATE TEVHA DEVAVARIL SHRADDHA.? karyalayin velet puja thevun kamat talatal.
    2. ETAR DHARMACHYA KA PUJA THEVU NAYE?
    3.15 august & 26 Jan ka mothya pramanat sajare karu naye offisat?
    4.Circular pramane SHWAJI MAHARAJ, MAHATMA Fule, Savitribai Fule, Dr Ambedkar , sHAHU MAHARAJ yACHENCH PHOTO OFFISAT LAVALE JATAT.EKHADE CIRCUILAR PASS KELE JAVE SATYANARAYANCHE NAVANE

  7. SRIKANT PETKAR KAHI NA KAHI
    SRIKANT PETKAR KAHI NA KAHI UPKRAM KARAT ASATAT. MUKHYATO SAMOJOPYOGI. TYANNA SHUBHECHCHA. MARATHIT LIHITA ALA ASAT TAR UTTAM ZAL ASAT.

  8. Petkar saheb , Abhinandan
    Petkar saheb , Abhinandan changla upkram kelam . khar tar aaplya deshachya ghatnenusar sarvajanik pooja karne bandi aahe . tari pan pooja thevtat . Amchya office madhye tar office time madhye pooja the tat aani tya velvet sarv employee kam karat nahi . tumhala get together karayche tar mahapurshanchi jayanti kara .

  9. Petkar saheb , Abhinandan .
    Petkar saheb , Abhinandan . khar tar sarkari karyalayat satyanarayan pooja ka kartat hach Mora prashna aahe . koni mhante karmachryachya sukhi samadhanasathi , get together sathi . satyanarayan pooja karun jar kharach lokanna sukh milale aste tar ya deshat konihi garib rahile naste. Rahila prashna get together cha , tar tumhi mahapurshanchya jayanti nimitta ekatra yeyu shakat mahi . Fakt aaplya deshat mahapurshanchya karya peksha dev devtanna jast mahatva detat . excellent work Petkar ji .

  10. AATA MANUS HACH DEO AAN
    AATA MANUS HACH DEO AAN MANUSHYA HACH SARVAKAHI MNHUN JIVAN JAGAYALA PAHIJE

  11. YESTERDAY WE SAW THE PICTURE
    YESTERDAY WE SAW THE PICTURE ” DEOOL”. PEPOLE MUST THINK NOW HOW WE ARE CHETED? BY OTHERS THAN CHETED BY OURSELF.

  12. SHIRDI,PANDHARPUR, sarkhya
    SHIRDI,PANDHARPUR, sarkhya dharmik sthali bhavik jana samuday pai chalt jato .Ya sarvansathi mi namrata purvak vinanti ahe ki tumacha bhaktiferi cha vel, pai calnyachi shakti, etc. jar tumhi samajik unnatikarak karya sathi vaparlit tar khup sundar kame tumchya hatun par padtil
    purvi wahne uplabdha naslya mule bhavikani pai jaun devache darshan ghenyachi pratha padli hoti parantu ata wahane uplabdha ahet.Tasech kontyahi devane, sadhu santane aplya bhaktala ase sagitalele nahi ki tu tuza vel,shakti, vaya ghlawon mazi bhakti kar. tasech swatala shararik tras dewun mazi bhakti kar. tyach pramne apan group ne pai caltana wahan chalkana je problem yetat te apalyatil baryacha jannana mahit asatilach.

  13. पेटकर साहेबांचे 2 पुस्तकं
    पेटकर साहेबांचे 2 पुस्तकं नुकतेच प्रसिध्त झालेत.काही ना काही ते वैशिष्टपुर्ण करत असतात.

  14. लेख चे
    लः
    लेख आवडला.

    लेख आवडला.

  15. काम मे राम है

    काम मे राम है
    आराम हराम है
    हेच यातून सिध्द होते.

  16. Petkar is the bahurangi
    Petkar is the bahurangi personality. He is also bandkhor. we also thinking to follow him.

  17. छान आहे. सर्वांनी वाचायला व
    छान आहे. सर्वांनी हे वाचायला हवे आणि तसेच वागायला हवे.
    अनिल जांभुळकर, कल्‍याण

  18. we wordhip computer,modern
    we worship computer, modern machinery by coconut & har puja etc. which is very opposite to science. give credit to man & man’s creativity. Not for imaginary god.

  19. हे जे देवदेवता किंवा कर्मकांड
    हे जे देवदेवता किंवा कर्मकांड केले जाते .ते सर्व अज्ञानातून केले जाते. त्याचबरोबर परंपरागत धार्मिक संस्कार या माध्‍यमातून या सर्व गोष्टी केल्‍या जात असतात.

  20. its amazing….we live in
    its amazing….we live in “purogami maharastra …irrespective of caste religion you giving value to work….its great to know….keep it up buddy…we proud on u…and everyone should follow the trend which u laid

  21. काळ P K बघितला. आधीही ” O MY
    काळ P K बघितला. आधीही ” OH MY GOD” नावाचा चित्रपट आला होता. चित्रपट दोन्हीही चांगले आहेत. पण चित्रपट काढणारे घाबरत असल्‍यासारखे वाटतात. त्यांचे विचार पक्के असतानाही ते चित्रपटाचा शेवट देवावरच सोडतात,. जौ नी सारा जहा बनाया , उक तोहार रक्सा कि जरुरत नाही, वो अपनी रक्सा खुदई कर सकता ही.
    असे संवाद टाकून पळवत काढली जाते.
    PK मधील नायक परग्रहावरील न दाखवता न दाखवता एखाद्या जंगलातील आदीवासी दाखवला तरी चालला असता. परग्रहावर अजून तरी मानव असल्याचे पुरावे नाहीत. भारतात अजून काही जंगलात मानव वास्‍तव्‍य करून आहेत, ज्यांना अजून कपडे, प्रस्‍थापित समाजातील देव धर्म वगैरे माहिती नाहीत. काहीही असो, PK हा सिनेमा मनोरंजनाच्या दोन पावलं पुढ सरकतो. असे प्रयत्न व्हायला हवेतच.

    • Good .

      Good .
      असे सिनेमे मोठ्या प्रमाणात यायला हवेत. त्याची चर्चा रोज व्हायला हवी. तसे वातावरण तयार झाले तर थोडी फार शक्यता आहे.

  22. खरच आहे देवदेवता धर्म ही
    खरं आहे. देवदेवता धर्म ही खाजगी बाब आहे .

  23. I believe that there is no
    I believe that there is no god for such activities like satyanarayan pooja etc. I believe that the human being with their fair character and sacrifice for society become God. What we need to do is keep our character fair and work for betterment of human life instead of doing such pooja. Petkar have done good job and we need more Petkar in society.

  24. उत्तम कार्य . आपल्यासारखे
    उत्तम कार्य. तमच्‍यासारखे नागरीकच या देशातील धर्मनिरपेक्षता टिकवून ठेवतील. आणखी एक गोष्ट तुम्‍हाला सुचवावीशी वाटते. आपल्या देशात २६ जानेवारी आणि १५अॉगष्ट तसेच महाराष्ट्रात साजरा होणारा कामगार दिन हे दिवस पगारी सुट्टीत साजरे केले जातात. खरंतर हे दिवस विनावेतन काम करून देशाच्या स्वातंत्र्यवीरांना मानवंदना देण्याचे दिवस म्हणून साजरे व्हायला हवेत. शक्य झालेच तर तुम्‍ही हाही एक उपक्रम सुरू कराल हा विश्वास वाटतो.

  25. Nice work. Look jagrut hone
    Nice work. Look jagrut hone garjeche aahe. Thanks Petkar sir! pooja band chi mashal petavli tumhi. Aata mashali petiil.

  26. Congrats, which khari
    Congrats, Hich khari purogami tatva Maharashtrala ani deshala pudhe nevu shaktat.I fully support such movement.

  27. काही विशेष नाही
    काही विशेष नाही.

  28. देव देवतात विशेष काहीही नसते

    देव देवतात विशेष काहीही नसते. तरीही इतकं अवडंबर का? का इतका वेळेचा दुरुपयाग? का?

  29. स्वार्थासाठी देव धर्म सर्वच
    स्वार्थासाठी देव धर्म सर्वच जण वापरताना दिसतात. रस्त्या रस्त्यावर देवळे उभारून जागा आडवणे. हा देशद्रोह असताना लोकही देवाच्यापायी काही बोलत नाही व असे जागा अडवणा-याचे फावते. देवांना चार सहा हात असताना, हातात शस्त्र असताना स्वतःचे संरक्षण करता येत नाही. ते काय लोकांच संरक्षण करणार?

  30. IN OUR DOMBIVALI DIVISION ,WE
    IN OUR DOMBIVALI DIVISION ,WE STARTED A NEW WHATS APP GROUP NAMED ” GOOD THOUGHTS.GOOD WORKS”. iN THIS GROUP ONLY ADDITIONAL WORK WHICH IS AREALLY ADDITIONAL FROM OUR REGULAR WORK OR DUTY , BUT IT WILL HELP TO OUR COMPANY.

    This may be only one whats group, on which thoughts and then action on it .Not another satar phatar goshti.

  31. तूमचे विचार अफलातून भारी आहेत
    तूमचे विचार अफलातून भारी आहेत. Nice good one मला आजपयंत कुठल्याही ब्राम्हणाच्या घरी पूजैचै आमंत्रण आले नाही़

  32. sarkari office madhe namaj
    sarkari office madhe namaj pan padtat tya badal aapla mat kai ahe ? tumhi tyana hi jal ka samja vai la ki ha tumcha dharma gharich theva office madhe nako.

  33. HOY , TYNANAHI TASECH SANGANE
    HOY , TYNANAHI TASECH SANGANE ASEL MAZE.
    KAYADYAPUDHE SARE SARAKHECH.

  34. पीर आणि पीर संप्रदायाची ही
    पीर आणि पीर संप्रदायाची ही लोकप्रियता हे तत्कालीन ब्राह्मणी पुरोहितशाहीसमोरील एक आव्हानही होते आणि संधीही. त्यावर त्यांनी आपल्या पारंपरिक रीतीनुसार उत्तर शोधले. ते म्हणजे सत्यपीराचे सम्मिलीकरण करण्याचे. रॉय म्हणतात, सत्यपीराच्या परंपरेवर लिहिणारांत मुसलमानांहून अधिक हिंदू आहेत यात म्हणूनच काहीही आश्चर्य नाही. तर यातीलच कोणा चलाख गृहस्थाने सत्यनारायणाच्या या कथेला प्राचीनतेची आभा चढावी म्हणून ती स्कंदपुराणाच्या रेवाखंडात घुसडून दिली. बहुसंख्य हिंदू धार्मिक बाबतीत अडाणीच असतात. त्यामुळे त्याचे व त्याच्यासारख्या अनेकांचे व्यवस्थित फावले इतकेच.
    सत्यपीरातून उत्क्रांत झालेली सत्यनारायणाची ही कथा अठराव्या शतकापासून महाराष्ट्रात गायली जाऊ लागली होती. तशा व्रतकथा महाराष्ट्रात काही कमी झाल्या नाहीत. एक चित्रपट येतो आणि आपल्याकडे संतोषीमातेच्या पूजेची लाट येते. एखादा ध्वनिफितींचा बडा व्यावसायिक येतो आणि शनिपूजेला मानाचे स्थान देऊन जातो. पण अशा पूजा शतकानुशतके टिकत नसतात. सत्यनारायणाची टिकली याचा अर्थ त्यात सर्वसामान्यांना आकर्षित करून घेणारी मूलद्रव्ये ठासून भरलेली आहेत. या कथेत नेहमी पुराणकथांमध्ये आढळणारा दरिद्री ब्राह्मण आहे. मोळीविक्या म्हणजेच शूद्र आहे. उल्कामुख नावाचा राजा आहे. तो अर्थातच क्षत्रिय आणि साधू नावाचा वाणी म्हणजे वैश्य आहे. एकंदर सत्यनारायण ही देवता चारही वर्णाचे भले करणारी आहे. केवळ कधी तरी पूजा करणे, त्याचा गोड प्रसाद सेवन करणे यायोगे बुडालेली जहाजेही वर आणून देणारी अशी ही देवता आहे. हे तिच्या लोकप्रियतेचे गमक आहे. एका इस्लामी मिथकापासून तयार झालेली ही कथा आज हिंदूंची महत्त्वाची धार्मिक खूण बनली आहे. एकंदर सत्यनारायणाच्या कथेइतकीच तिच्या मागची ही कथा मोठीच रंजक आहे.

    Ani hi pratha band padnyat molache kaam kelyabaddal Shri. Shrikant Petkar yanche hardik abhinandan.

  35. चांगला उपक्रम आहे. आम्ही
    चांगला उपक्रम आहे. आम्ही आमच्या नागपुरच्या ऑफिस मधे सत्यनारायनचनाची पुजा न करता जमलेल्या पैश्या मधून वृद्धाश्रमाला ब्लंकेटस दान दिली. पण कुठेतरी त्या निमित्य होणारी ऑफिसची साफसफाई झाली नाही याची खंत जरूर आहे.

  36. BAMANACHE GHARI GANPATI EK
    BAMANACHE GHARI GANPATI EK DIDH DIVAS AASATO
    BAHUJANACHE GHARI DAHA DAHA DIVAS AASTO.
    BAMAN PRASAD MHANUN SAKHAR POHE DETATA
    BAHUJAN ROJ GOD DHOD PAKVANNNA KARATAA …KARJABAJARI HOTATA.. WHEN? WHEN?
    KADHI KALHANAR BAHUJANANANA

  37. WASHALA SS IS THE ONLY ONE SS
    WASHALA SS IS THE ONLY ONE SS WHICH IS TAKING PART IN ENERGY SAVING CONSERVATION, TREE PLANTATION , GOOD SS & MANY MORE GOOD THINGS . I AM PROUD THAT I AM EMPLOYEE OF WASHALA.

  38. ho kharach office madhe
    ho kharach office madhe honari satyanarayan chi puja hi band wayala pahije. karmchara kadun collection karun puja kartat. collection sathi office letter kadatat. aani jya karmacharala paise dyayache nasel tari tyala dyave lagte. ter office madhe puja karne he band vayala pahije.

  39. सरकारी कार्यालयात कुठल्याही…
    सरकारी कार्यालयात कुठल्याही धर्माचे अवडंबर नको। मी पेटकर सरांशी सहमत आहे। पण सध्या जो फक्त हिंदू धर्मातील परंपरांना विरोध आहे व इतर धर्मातील परंपरांकडे डोळेझाक करणे ह्याला विरोध आहे।

  40. Very Nice but….get…
    Very Nice but….get together is must so their should be another alternative also Saheb…

Comments are closed.