संसदीय पद्धतीत बदल हवा

0
25

विनय सहस्‍त्रबुद्धे


    संसद आणि देशभरातील अन्‍य राज्‍यांच्‍या विधिमंडळामधून चालणा-या कामाबद्दल, त्‍या कामात येणा-या व्‍यत्‍ययाबद्दल नेहमीच चर्चा घडून येते. यामध्‍ये गेल्‍या अनेक वर्षांपासून काही प्रवृत्‍ती स्‍पष्‍टपणे पुढे येत आहेत. त्‍यातील एक प्रवृत्‍ती अशी, की काहीतरी सनसनाटी आणि खळबळजनक केल्‍याशिवाय विधिमंडळाच्‍या कामाला प्रसिद्धी मिळत नाही. हे प्रकार घडवणा-यांची मानसिकता अशी असते, की हे प्रकार केले नाहीत तर आम्‍ही जो विषय विधिमंडळात मांडू पाहत आहोत, त्‍याला माध्‍यमांमध्‍ये प्रसिद्धी मिळणार नाही. या पार्श्‍वभूमीवर संसदीय कामकाजाच्‍या उपयुक्‍तेबद्दल जनतेच्‍या मनातील विश्‍वास कायम रहावा, याकरीता या कामकाजाच्‍या पद्धतीचा नव्‍याने विचार करण्‍याची गरज असल्‍याचे मत रामभाऊ म्‍हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक विनय सहस्‍त्रबुद्धे यांनी मांडले आहे…


विनय सहस्‍त्रबुद्धे

     साधारणतः पावसाळी हंगामामध्‍ये संसद आणि देशभरातील अन्‍य राज्‍यांच्‍या विधिमंडळांची पावसाळी अधिवेशने देशभरात घडून येतात. अशा वेळी विधिमंडळामधून चालणा-या कामाबद्दल, त्‍या कामात येणा-या व्‍यत्‍ययाबद्दल चर्चा घडून येते. यामध्‍ये गेल्‍या अनेक वर्षांपासून काही प्रवृत्‍ती स्‍पष्‍टपणे पुढे येत आहेत. त्‍यातील एक प्रवृत्‍ती अशी, की काहीतरी सनसनाटी आणि खळबळजनक केल्‍याशिवाय विधिमंडळाच्‍या कामाला प्रसिद्धी मिळत नाही. जांबुवंतराव धोट्यांनी एकदा पेपरटवेट फेकून मारला आणि आठ कॉलम बातमी प्रसिद्ध झाली. आता पेपरवेट नसले तरी कागदाचे बोळे किंवा सदनाच्‍या कामकाजाची कागदपत्रे टरकावणे, बॅनर फडकावणे, प्रसंगी राजदंड पळवणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. हे प्रकार घडवणा-यांची मानसिकता अशी असते, की हे प्रकार केले नाहीत तर आम्‍ही जो विषय विधिमंडळात मांडू पाहत आहोत, त्‍याला माध्‍यमांमध्‍ये प्रसिद्धी मिळणार नाही. याचे पुढचे पाऊल सभागृहामध्‍ये गोंधळ घालणे आणि कामकाज बंद पाडणे हे आहे. सभागृहाचे कामकाज बंद पाडणे हादेखील भावना व्‍यक्‍त करण्‍याचा एक मार्ग असू शकतो. हे मान्‍य करूनसुद्धा एकूण ज्‍या पद्धतीने विधिमंडळे आणि संसदेची सभागृहे चालतात, त्‍याबद्दल मुळातूनच विचार करण्‍याची गरज आहे. सभागृहाच्‍या कामकाजांच्‍या माध्‍यमातून लोकप्रश्‍नांना ऐरणीवर आणणे शक्‍य होत नसेल तर प्रश्‍नोत्‍तरे, लक्षवेधी सूचना, खाजगी विधेयक, इत्‍यादी आयुधांचा नव्‍याने विचार करण्‍याची गरज आहे. संसदीय लोकशाही आल्‍यापासून गेल्‍या अनेक वर्षांत असा विचार तपशिलातून झालेला आढळत नाही. या कामाला आणखी विलंब लागला तर संसदीय कामकाजाच्‍या उपयुक्‍ततेवरून लोकांचा विश्‍वास उडायला वेळ लागणार नाही.

– विनय सहस्‍त्रबुद्धे,
  महासंचालक, रामभाऊ म्‍हाळगी प्रबोधिनी
, मोबाईल – 9821066281, Vinays57@gmail.com

About Post Author

Previous articleफक्त रड म्हण!
Next articleमरणोत्तर निःशुल्क सेवा!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.