Home व्यक्ती

व्यक्ती

सर्वसामान्य माणसे त्यांच्या कर्तृत्वाने समाज घडवत असतात. परंतु अशा माणसांकडे दुर्लक्ष होते आणि लता मंगेशकरशरद पवारमाधुरी दीक्षितसचिन तेंडुलकर अशा सेलिब्रिटींची नावे समाजाचे कर्तृत्ववान प्रतिनिधी म्हणून घेतली जातात. सर्वसामान्यांमध्ये दडलेली असामान्य ऊर्जा व्यक्त व्हावी व ती सर्वदूर पोचावी असा ‘थिंक’चा उद्देश आहे. तालुक्या-तालुक्यात तशी माणसे आढळत आहेत.

मंगल मैत्री : एका आगळ्यावेगळ्या पुस्तकाच्या जन्माची गोष्ट

0
विख्यात गणितज्ज्ञ डॉ. मंगल जयंत नारळीकर यांचे 17 जुलै 2023 रोजी निधन झाले. त्यांच्याविषयीच्या माहितीची नोंद व्हावी या उद्देशाने डॉ. शुभा थत्ते यांच्यासह डॉ. मंगला नारळीकर यांच्या सहा मैत्रिणींनी त्यांच्या आठवणींचे एक पुस्तक प्रकाशित करायचे ठरवले. ‘मंगलमैत्री’ नावाचे हे पुस्तक डॉ. शुभा थत्ते यांनी संपादित केले आहे. त्या या लेखात पुस्तकाच्या जन्माविषयी सांगत आहेत. जेणेकरून वाचकांना डॉ. मंगला नारळीकर यांचा परिचय होईल आणि पुस्तक वाचावेसे वाटेल...

नाटककार-संपादक विद्याधर गोखले

1
विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीचे 2024 हे वर्ष आहे. 1960 ते 1980 ही दोन दशके मराठी संगीत नाटक म्हणजे विद्याधर गोखले असे जणू समीकरणच होते. मराठी संगीत नाटक ही मराठी संस्कृतीलाच नव्हे तर जागतिक रंगभूमीला असलेली देणगी आहे. गोखले यांनी पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर अध्यापन काही वर्षे केले. त्यानंतर त्यांनी ‘दैनिक लोकसत्ता’मध्ये नोकरी पत्करली. अनेक वर्षे ‘लोकसत्ता’मध्ये काम करून पत्रकारितेमधील कारकीर्द गाजवली. त्यांनी ‘लोकसत्ता’मध्ये संपादक म्हणूनही जवळजवळ पाच वर्षे काम केले...

गोविंद विनायक करंदीकर ऊर्फ विंदा करंदीकर (Vinda Karandikar)

0
मराठीतल्या मोजक्याच ज्ञानपीठ विजेत्यांपैकी असलेल्या विंदा करंदीकर यांचे साहित्यिक कर्तृत्व मोठे आहे. अमृतानुभवापासून ते नवकवितेपर्यंत त्यांची प्रतिभा आणि लेखणी लीलया फिरली आहे. त्यांनी कवितेच्या आशयामध्ये आणि रूपबंधांमध्ये अनेक प्रयोग केले. जबाबदारीच्या भावनेतून, मराठीच्या अभ्यासकांसाठी भाषांतरे केली. अशा या चतुरस्त्र साहित्यिकाची 14 मार्च रोजी पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने गीता जोशी यांनी विंदांच्या साहित्याचा धावता आढावा घेतला आहे...

एकनाथ आव्हाड – दापूर ते दिल्ली…

एकनाथ आव्हाड यांना ‘साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार’ घोषित झाला. त्यांचा समावेश आघाडीच्या बाल साहित्यकारांमध्ये होतोच. पुरस्काराने त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यांनी त्यांचा जीवनप्रवास नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील दापूर या छोट्या खेड्यातून सुरू केला. नरेंद्र पाठक यांनी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यावर त्यांच्याशी गप्पा मारण्याचे ठरवले. कायम शाळेत, पुस्तकात आणि मुलांमध्ये रमणारा हा सरस्वतीपुत्र; त्यांनी त्यांच्या बालपणापासूनची कथा सांगितली आहे...

माणूसपणाच्या वाटेवरील प्रवासी

कुमार शिराळकर हे डाव्या विचारांचे कार्यकर्ते होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या मुख्यत: सीटू या कामगार युनियनचे कार्यकर्ते यांनी मिळून ‘माणूसपणाच्या वाटेवरील प्रवासी’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ औरंगाबाद येथे 7 जानेवारी रोजी आयोजित केला होता. या पुस्तकात ‘मागोवा’च्या मित्रमंडळींना कुमार कसा दिसला याची मांडणी पाच लोकांनी केली आहे आणि बाकी दहा लेख हे आदिवासी कार्यकर्ते व युनियनमधील कार्यकर्ते यांनी लिहिलेले आहेत. प्रत्येक लेख हा कुमारबद्दलच्या कृतज्ञतेने गहिरून लिहिलेला आहे...

कुमार शिराळकर – महाराष्ट्राचे चे गव्हेरा

कुमार शिराळकर या डाव्या विचारांच्या तरुण तडफदार कार्यकर्त्याबाबत दोन लेख आहेत. पहिला शहादा – धुळे येथील श्रीनिवास नांदेडकर व वसंतराव पाटील या कार्यकर्त्याचा व दुसरा मुंबईतील विदुषी छाया दातार यांचा. कॉम्रेड कुमार शिराळकर हे सांगली जिल्ह्यातील मिरजेचे. त्यांचा जन्म 10 जानेवारी 1942 रोजी मिरज येथे झाला...

मी पाहिलेले दैनिकांचे संपादक

रवींद्र पिंगे यांचा दैनिकांच्या संपादकांबद्दलचा जुना लेख. त्यात ते म्हणतात, दैनिकांची वाट पाहणाऱ्यांपैकी मी नव्हेच नव्हे. दैनिके चार दिवस दिसली नाहीत तर माझे मन बिलकुल अस्वस्थ होणार नाही. अनेकदा, वर्तमानपत्र घरात येऊनही मी इतर व्यापांमुळे त्यांच्याकडे पाहतसुद्धा नाही. गेल्या अर्धशतकात मी जी काही वर्तमानपत्रे वाचली, त्यात तीन संपादकांची शैली मला अप्रतिम वाटली: फ्रँक मोराईस, रावसाहेब पटवर्धन आणि ग. प्र. प्रधान. त्यांच्यात अभिजात असा खानदानीपणा आहे. भाषाप्रभुत्व असामान्य आहे. विचारांना नैतिक अधिष्ठान आहे. आविष्कार सौम्य आहे. आवाहन आहे. आव्हान नाहीच आणि आग्रहाचे नावच नाही. तसे घरंदाज लेखन मला भुरळ घालते...

बहनो और भाइयो… (Ameen Sayani)

अमीन सायानी यांचे 21 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. पन्नास वर्षांहून अधिक काळ ज्या आवाजाची जादू या देशातल्याच नाही तर जगभरातल्या भारतीय चित्रपट संगीतप्रेमींच्या हृदयावर चालली ज्या आवाजाने चार पिढ्यांच्या कानांचीच नाही तर मनांचीही मशागत केली आहे. भारतीय चित्रपट संगीत हे मनामनांना जोडणारा अद्भुत धागा आहे.एक्याण्णव वर्षांचे समृद्ध आयुष्य जगून अमीन सायानी गेले. रफी-लता-किशोर या जादुई आवाजांइतकाच त्यांचा जादूई आवाज श्रोत्यांच्या कानात गुंजत राहील...

नारायण मेघाजी लोखंडे – भारतीय कामगार चळवळीचे जनक (Father of the Indian Labour Movement...

नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक असे सार्थपणे म्हटले जाते. ते महात्मा जोतीराव फुले यांचे सहकारी होते, रावबहादूर होते. त्यांची भूमिका धर्म, जाती यांवरून कष्टकऱ्यांमध्ये, समाजात फूट पडू नये अशी होती. ते मराठा ऐक्येच्छू सभा, मराठा रुग्णालय यांचे संस्थापक होते. त्यांनी ‘पंचदर्पण’ या पुस्तिकेचे लेखन, ‘सत्यशोधक निबंधमाला’ अथवा ‘हिंदू धर्माचे खरे ज्ञान’ या पुस्तिकांचे लेखन; तसेच, ‘दीनबंधू’तून समाजाभिमुख परंतु परखड लेखन सातत्याने केले...

मधु दंडवते – उत्स्फूर्त, विनोदी, तिरकस…

2
दिल्ली येथील संसद भवनात ठसा उमटवणाऱ्या महत्त्वाच्या काही मराठी व्यक्तींमध्ये प्रोफेसर मधू दंडवते यांचे नाव घ्यावे लागेल. मधू दंडवते लोकसभेवर 1971 ते 1990 या दोन दशकांत सातत्याने निवडून आले. सत्ताधारी पक्षात असोत अथवा विरोधी बाकांवर बसलेले असोत, दंडवते यांनी त्यांच्या अभ्यासू वृत्तीने आणि कुशल वक्तृत्व कलागुणांनी संसद गाजवली. मधू दंडवते यांनी त्यांच्या उत्स्फूर्त आणि विनोदी परंतु मार्मिक भाषणांनी राजकीय वर्तुळात ठसा उमटवला...