मागोवा हेंद्रे आडनावाचा

डॉ. रतिकांत हेंद्रेमीना प्रभू यांच्या ‘कालनिर्णय’ दिवाळी अंकातील ‘पप्पा गेले’ या लेखात ‘घरातील एक मूल्यवान दागिना सापडत नव्हता. माझ्याच हेंद्रेपणाने तो खालवर गेला होता’ असे वाक्य आहे. माझे आडनाव ‘हेंद्रे’ आहे. ‘हेंद्रे’ या शब्दामुळे माझ्या मनात कुतूहल निर्माण झाले. त्यापूर्वी हेंद्रे हा शब्द कुठल्याही लिखाणात वाचण्यात आला नव्हता.

मी साठ वर्षांपूर्वी फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत होतो. त्या वेळीचे उपप्राचार्य प्रा. श्री. रा. पारसनीस मला म्हणाले, की हेंद्रे आडनाव अपरिचित आहे. या आडनावाचा अर्थ माहीत आहे का? आणि हा शब्द कुठून आला असावा? मला ते काहीच माहीत नसल्यामुळे मी गप्प बसलो.

ज्ञानेश्वरीचे वाचन करताना अध्याय ९, ओवी क्रमांक ३८० मध्ये एक संदर्भ सापडला.

तैसे लक्ष्मियेचे थोरपण न सरे |
जेथ शंभूचेही तप न पुरे|
तेथ येर प्राकृत हेंदरे |
केवि जाणो लाहे ||

‘सार्थ ज्ञानेश्वरी’ ग्रंथात मामासाहेब दांडेकरांनी हेंदरे या शब्दाचा अर्थ अजागळ असा दिला आहे. लिखित स्वरूपातील हेंदरे या शब्दाचा उल्लेख ज्ञानेश्वरीत आहे. त्याचा अर्थ हेंदरे हा शब्द ज्ञानेश्वरांच्या अगोदरच्या काळापासून प्रचलित असावा. काळाच्या ओघात हेंदरे या शब्दाचे हेंद्रे असे रूपांतर झाले असे म्हणता येईल.

भटक्या जमातीतील कुडमुडे जोशी (ज्योतिषी) या ज्ञातीमध्ये हेंद्रे आडनाव अल्प प्रमाणात आढळून येते. नामदेव शिंपी ज्ञातीमध्ये मात्र हेंद्रे आडनाव मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. सासवडपासून फलटणपर्यंतच्या परिसरात अनेक हेंद्रे कुटुंबांचे वास्तव्य आहे. इंग्लंडमधील खानेसुमारीनुसार त्या देशात नऊ कुटुंबांचे आडनाव हेंद्रे आहे.

काही वर्षांपूर्वी एका जाहिरातीमध्ये ‘हेंद्रेपाडा, पनवेल, जिल्हा रायगड’ हा पत्ता वाचल्याचे आठवते. आदिवासींमध्ये वस्ती, वाडी या अर्थाने पाडा हा शब्द वापरला जातो.

रोल्स रॉईस मोटार कंपनीचे संस्थापक चार्ल्स रोल्स यांचा ‘द हेंद्रे पॅलेस’गुगल साइटवर जाऊन हेंद्रे (HENDRE) या शब्दाचा शोध घेतला. युरोपखंडातील एका देशात हेंद्रे ट्रामवेज नावाची ट्राम कंपनी आहे. इंग्लंडमध्ये एका शहरातील रस्त्याला हेंद्रे स्ट्रीट असे नाव दिलेले आहे. आहे की नाही गंमत? इंग्लंडमध्ये आणि काही युरोपीयन देशांत हेंद्रे शब्दाला विशेष महत्त्व असावे असे वाटते. हेंद्रे या शब्दाचा एखाद्या ऐतिहासिक अगर पौराणिक कथेशी संबंध आहे का अशीही शंका मनात येते.

रोल्स रॉईस या जगप्रसिद्ध मोटार कंपनीचे संस्थापक चार्ल्स रोल्स यांनी राहण्यासाठी १६३९ ते १६४८ या कालावधीत आलिशान बंगला इंग्लंडमधील वेल्स प्रांतात बांधला. त्याचे नाव होते, ‘द हेंद्रे पॅलेस’. मी अजूनपर्यंत रोल्स रॉईस मोटार बघितलीसुद्धा नाही. तरीपण चार्ल्स रोल्सचे वास्तव्य होते त्या आलिशान बंगल्याचे नाव आणि माझे आडनाव यांतील साधर्म्यामुळे माझी छाती अभिमानाने भरून आली आहे.

(ललित मासिक, मार्च २०१४)

डॉ. रतिकांत हेंद्रे
मयुरेश अपार्टमेंट्स,
फ्लॅट नं. ६, २७६, रास्ता पेठ, पुणे ४११०११
०२० २६१२०४६२
reach.kaustubh@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. The Hendre (a farmer’s winter
    The Hendre (a farmer’s winter residence; literally meaning old home) is Monmouthshire’s only full-scale Victorian country house, constructed in the Victorian Gothic style. It is located in the parish of Llangattock-Vibon-Avel, some 4 miles (6.4 km) north-west of the town of Monmouth. Built in the eighteenth century as a shooting box, it was vastly expanded by the Rolls family in three stages throughout the nineteenth century and is most famous as the childhood home of Charles Stewart Rolls, co-founder of Rolls-Royce. The house is Grade II* Listed and is now the clubhouse of the Rolls of Monmouth Golf Club.

    The Welsh word hendre comes from the old Welsh custom of having two residences: one down in the valley, which was used in winter (hendre) and the other homestead was up in the mountains, where the family would live over the summer: hafod; haf being the Welsh word for “summer”. The custom of dividing the year between two locations.

Comments are closed.