बीसीसीआयची बदमाशगिरी

0
22

     भारताने क्रिकेट संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरले, मात्र ख-या विश्‍वचष्‍काला स्‍पर्श करण्‍याचे त्‍यांचे स्‍वप्‍न अखेर स्‍वप्‍नच राहिले. भारतीय खेळाडूंना त्‍यावेळी देण्यात आलेला विश्वचषक खोटा असल्याचे निष्पन्न ….       भारताने क्रिकेट संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरले, मात्र ख-या विश्‍वचष्‍काला स्‍पर्श करण्‍याचे त्‍यांचे स्‍वप्‍न अखेर स्‍वप्‍नच राहिले. भारतीय खेळाडूंना त्‍यावेळी देण्यात आलेला विश्वचषक खोटा असल्याचे निष्पन्न झाले आणि बीसीसीआयचा खोटेपणा जगासमोर आला. तुम्ही विश्वचषक खरा देता का खोटा हा खरा प्रश्न नसून, तुम्ही सर्वांशी खोटे बोललात हा मुख्य मुद्दा आहे. तुम्ही खेळाडूंना फसवता. तुम्ही भारत सरकारला फसवता. तुम्ही खोटं बोलता. याचा अर्थ तुम्ही बदमाश आहात.

     लोकांशी खोटे बोलणार्‍या माणसांपेक्षा स्वत:शी बेइमान असलेली माणसे जास्त घातक असतात. ही बाब मॅच फिक्सिंगच्‍या गुन्‍ह्याएवढीच गंभीर आहे आणि यामागे असलेली माणसेही अपराधी आहे. विश्वचषक कस्टममध्ये अडकलेला असताना ती बाब सर्वांपासून लपवून ठेवून खेळाडूंच्या हाती खोटा विश्वचषक सोपवणे ही तर पराकोटीची फसवणूक झाली.

 

-शिरिष देशपांडे –

{jcomments on}

About Post Author

Previous articleसेलिब्रेश्नच्या नॉव्हेल आयडीया
Next article‘इप्रसारण’
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.