नीलेश बागवे – सुंदर हस्ताक्षर अर्थात सुंदर जगणं!

4
80
carasole

सुंदर अक्षर म्‍हणजे आनंदी मन… आनंदी मन म्‍हणजे सकारात्‍मक विचार

सकारात्‍मक विचार म्‍हणजे आकर्षक व्‍यक्तिमत्‍त्‍व… आकर्षक व्‍यक्तिमत्‍त्‍व म्‍हणजे सुसंस्‍कृत वर्तन

सुसंस्‍कृत वर्तन म्‍हणजे आदर्श नागरिक… आदर्श नागरिक म्‍हणजे प्रगत समाज

प्रगत समाज म्‍हणजे सर्वोत्‍तम देश… सर्वोत्‍तम देश म्‍हणजे सुंदर जग

आणि सुंदर जग म्‍हणजे सुंदर जगणे

…हा विचार डोळ्यांसमोर ठेवून चित्रकार नीलेश बागवे तेरा वर्षांपासून सुंदर हस्ताक्षर सराव वर्ग तसेच सुलेखन कार्यशाळा चालवत आहेत. त्यांनी एप्रिल 2003मध्ये प्रयोग म्हणून ‘सुंदर हस्ताक्षर वर्गा’ची सुरुवात केली; त्यांनी डोंबिवलीच्या रॉयल ज्युनियर कॉलेजमधील पाचशे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे आव्हान स्वीकारले व ते यशस्वी करून दाखवले. त्या आत्मविश्वासातून नीलेश व उल्का बागवे यांनी सप्टेंबर 2003 मध्ये ‘अक्षरगंध’ ची स्थापना केली. बघता बघता, रोपट्याचे वृक्षात रूपांतर झाले!

नीलेश बागवे यांनी 1994 मध्‍ये मुंबईतील जे.जे.इन्स्टिट्यूट मधून अप्‍लाईड आर्टसची पदवी प्राप्‍त केली. टायपोग्राफी-कॅलिग्राफी या विषयांत त्‍यांनी विशेष प्राविण्‍य मिळवले. गोदरेज, हिंदुस्‍तान लिव्‍हर, एशियन पेंटस्, सेंटॉर हॉटेल, बजाज, सीपला, इत्‍यादी कंपन्‍यांच्‍या जाहिरातींवर त्‍यांनी कलाकाम केले आहे. त्‍यांनी  स्वत:ची ‘उगम क्रिएटिव्‍ह’ ही अॅड एजन्‍सी 2001साली सुरू केली. त्‍यामार्फत ते लहानमोठ्या संस्‍था आणि कंपन्‍यांसाठी सिम्‍बॉल-लोगो व कॉर्पोरेट ब्रॅडिंगची कामे करतात. त्‍यांनी अनेक नामवंत इंग्रजी-मराठी प्रकाशकांसाठी पाचशेहून अधिक पुस्‍तकांची मुखपृष्‍ठ सजावट केली आहे. कॅलिग्राफीचा वापर करून त्‍यांनी तयार केलेली ‘गांधीगिरी’ या विषयावरील टी-शर्टस् प्रसिद्ध झाले होते. त्‍याचसोबत कॅलिग्राफीचा वापर करून त्‍यांनी मराठी शुभेच्‍छापत्रे बाजारात आणली होती. त्यामध्‍ये नामवंत कवींच्‍या कवितांचा समावेश करण्‍यात आला होता. कॅलिग्राफी-टायपोग्राफी या क्षेत्रांत ते अनुक्रमे अच्‍युत पालव आणि कमल शेडगे याना आपले गुरू मानतात.

मधल्या काळात त्यांनी माटुंग्याचे रुइया कॉलेज, घाटकोपरची विद्याभवन शाळा, भाडूंपचे रत्नम कॉलेज येथपासून चिन्मय मिशन, राष्ट्र सेवा दल, पाटकर ट्रस्ट अशा अनेक ठिकाणी प्रशिक्षण वर्ग घेतले. त्या वर्गांचा सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. कोणीही शिक्षित व्यक्ती आपले हस्ताक्षर नियमित सरावाने व प्रयत्नाने सुंदर आणि वळवदार करू शकते. परंतु तिला शास्त्रशुद्ध मार्गदर्शन, योग्य दिशा आणि नियम कळल्यामुळे तिची भूमिका पक्की होते. तिला अक्षर कसे तयार होते, मूळ आकार म्हणजे काय, हस्‍ताक्षरावर परिणाम करणा-या लहानसहान चुका कोणत्‍या, लेखनाची योग्य पद्धत व सराव यांबाबत उत्तरांची अपेक्षा मनी तयार होते व त्यामधून ती विचार करू लागते. सुलेखन हे कौशल्य आहे. त्यामागचे वैचारिक अधिष्ठान नीलेश बागवे वर्गात पुरवतात.

परीक्षेत एकेका मार्कासाठी आटापिटा करणारे पालक आणि विद्यार्थी ‘हस्‍ताक्षर’ या महत्‍त्‍वाच्‍या गोष्‍टीकडे दुर्लक्ष करतात. असे बागवे यांचे म्‍हणणे आहे. अक्षरांवरील प्रेम आणि वाचनाची आवड यामुळे आपण या क्षेत्राकडे वळलो असल्‍याचे सांगताना नीलेश बागवे म्‍हणतात. त्यांचे लहानपणी हस्‍ताक्षर सुंदर व वळणदार होते. त्यांना शालेय जीवनात अनेक बक्षिसे मिळाली.

बागवे यांनी जाहिरातक्षेत्रात जम बसल्यावर सुंदर हस्ताक्षर जागृती अभियान आरंभले. समर्पित वृत्तीच्या हस्ताक्षर प्रशिक्षक आणि कार्यकर्त्यांचा संच तयार करून ‘अक्षरगंध’चे रूपातंर चळवळीत करणे, सुंदर हस्ताक्षर आणि कॅलिग्राफीचे दर्जेदार प्रशिक्षण देऊन विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये त्याविषयी जागरुकता व विश्वास निर्माण करणे हे ‘अक्षरगंध’चे ‘मिशन’ आहे. येत्या शैक्षणिक वर्षात एक लाख विद्यार्थी व पालकांपर्यत पोचण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यांनी ह्या कार्याकरता प्रशिक्षक व प्रचारक यांची फळी उभी केली आहे. त्यांचा प्रयत्न मार्च 2012 पर्यंत तीनशे प्रशिक्षक तयार करण्याचा आहे. या अभियानांतर्गत ‘गंध अक्षरांचा’ हा हस्ताक्षर, व्यक्तिमत्त्व विकास आणि यशप्राप्ती या विषयावर सुसंवाद आणि कॅलिग्राफीचे प्रात्याक्षिक असा दोन तासांचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

अक्षरांच्या कलात्मक, आकर्षक व सुंदर रचनांमधून आपले विचार व भावना मांडण्याला सुलेखन (‘कॅलिग्राफी’) म्हणतात. ‘कॅलिग्राफी’ म्हणजे अक्षरांना सौदंर्य बहाल करण्याची कला. अक्षरांशी खेळत संवाद साधणे आणि अक्षरांना जिवंत करणे…!

गणेश उत्सवाच्या निमित्ताने 2011च्‍या सप्टेंबर महिन्यात डोंबिवली बालभवनच्या कलादालनात गणेशचित्रांचे प्रदर्शन भरवले गेले. बागवे यांचे हे पहिले चित्रप्रदर्शन.त्यावेळी सादर करण्‍यात आलेल्‍या चित्रांतगणपतीचे श्लोक, आरती, मुळाक्षरे आणि संख्या (आकडे) या माध्यमातून गणपतीला विविध आकारांत साकारले होते. गणपतीचे विविध आकार इतके लुभावणारे व आकर्षक वाटत होते. विविध संस्था व व्यक्तींनी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांना पुरस्कारित केले. खरे म्हणजे गणपतीचे हत्तीचे तोंड, मोठ्या पोटाचा माणसाचा देह असे विचित्र रूप! तरी ते प्रत्येक कलाकाराला भावते! बागवे प्रदर्शन बघायला येणार्‍या मुलांना व पालकांना ते Live गणेशरूपे फटाफट काढून दाखवत होते. कोणतीही जिवंत कला- मग ते गायन असो, नृत्य असो की चित्र असो, समोर घडताना बघितले की माणसाचे मन मोहरून जाते. तसेच घडले. लोक बागवे यांच्यावर खूष झाले. अनेकांना अच्‍युत पालव आठवले.

त्यांनी गणेशचित्र प्रदर्शनाचा पुढचा भाग म्हणजे डोंबिवलीतील शालेय मुलांची गणेशचित्र स्पर्धा आयोजित केली. साडेसहाशे विद्यार्थ्यांनी आपल्या भन्नाट कल्पनेतून चित्रे साकार केली. त्यांतल्या निवडक दीडशे चित्रांचे प्रदर्शन आंबेडकर हॉलमध्ये भरवले होते. त्यांना वयोगट करून भरघोस बक्षिसे दिली. मुलांच्या कल्पनेतून साकारलेली चित्रे व उत्साही वातावरण बघून अंबरनाथ स्टेट बँकेने बागवे यांना आर्थिक मदत केली. ‘प्रहार’ दैनिकाने प्रसिद्धीची जबाबदारी स्वीकारली. मुलांची चित्रे बघून प्रमुख पाहुणे प्रसिद्ध चित्रकार सुधाकर नाईक उर्त्स्फूतपणे म्हणाले, की मलाही गणेशचित्रे काढण्याची प्रेरणा मिळाली!

हस्‍ताक्षर-चित्रकला-जाहिरात-व्‍यक्तिमत्‍त्‍वविकास अशा अनेक क्षेत्रांत कार्यरत असलेले बागवे सामाजिक संस्‍थांशीही संलग्‍न आहेत. विधायक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवण्‍याच्‍या हेतून बागवे यांनी काही समविचारी मंडळींना एकत्र आणून ‘बी पॉझिटिव्ह सोशल एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशन’ या संस्‍थेची स्‍थापना केली आहे.

नीलेश बागवे,
अ/3, जय महालक्ष्‍मी अपार्टमेन्‍ट, जोंधळे शाळेजवळ, जुना डोंबिवली मार्ग,
डोंबिवली, पश्चिम,
8879230443, 9224453677,
nileshbpositive@gmail.com, www.akshargandh.com

प्रभाकर भिडे, 9892543154

Last Updated On 6th September 2017

 

 

About Post Author

4 COMMENTS

  1. blog wachala sir, khup chhan
    blog wachala sir, khup chhan watle. malahi sulekhan shikaychi aawad aahe. mi DTP Operator aahe. sadhya vayane 50+ aahe. khuup kahi shikawese watate. mi punyat asate.

  2. Lekh Chan lihilela aahe…
    Lekh Chan lihilela aahe….Kamal Shedage sir hyancha kelela ullekh wachun khup aanand zala….Kamal sir he mazya pidhiche Typography & Calligraphy che Guru aahet. ?

  3. मयूर आडकर…धन्यवाद…!मयूर आडकर…धन्यवाद…!

  4. अप्रतिम लेख mesmerizing work…
    अप्रतिम लेख mesmerizing work done by great human being Mr Nilesh B+ I m proud of you.

Comments are closed.