नासिकचा प्राणवायू विश्वाला! (Nasik Area Has Exclusive Vegetation)

नासिक शहरात इतिहास विपुल प्रमाणात असण्याचे कारण आहे तेथील भौगोलिक परिस्थिती, जैवविविधता अन् भरपूर आयुर्वैदिक वनस्पती, दुर्मीळ फुले, शुद्ध हवा…यांमुळे रूग्णांना नासिकला राहण्याचे सूचित केले जाते.

‘नासा’ने चांद्रमोहिमेदरम्यान 1980 मध्ये लँडस्केप डिझायनर्सच्या मदतीने हवा शुद्ध करणाऱ्या इनडोर वनस्पतींच्या गुणधर्मांचा व्यापक आढावा घेतला होता. त्याची सुरूवात 1969 च्या चांद्रमोहिमेच्या वेळीच झाली होती. मोहिमेतील अंतराळवीरांना अशुद्ध हवेमुळे आजारपणाला बराच काळ सामोरे जावे लागल्याने मोहिमेच्या अभ्यासात व्यत्यय आला; एकाग्रता कमी झाली, थकवा अधिक आला. त्यातून यानात हवा शुद्ध ठेवू शकणाऱ्या वनस्पती कोणत्या आहेत त्यांचा शोध सुरू झाला. अन् मग अशा वनस्पती आहेत का, येथपासून त्या कोणत्या, कशा अन् का व कोठे या प्रश्नांनी वेग घेतला. चांद्रमोहिमेचा तोही महत्त्वाचा टप्पा ठरला. त्यातूनच ‘नासा’ने वातावरणातील कार्बनिक यौगिकांचे म्हणजेच ‘व्हीओसी’ (Volatile Organic Compounds – म्हणजे घन किंवा द्रवपदार्थ ज्यामधून वायू उत्सर्जित होतो. व्हीओसींमध्ये विविध प्रकारची रसायने समाविष्ट असतात, ज्यांचा आरोग्यावर अल्प किंवा दीर्घकाळ प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.) शोषून घेणाऱ्या काही इनडोर (अंतर्गत) वनस्पती अस्तित्वात आहेत त्यांचा शोध घेतला व तशा पन्नास वनस्पतींची नोंद करून ती यादी जगाला उपलब्ध करून दिली.

अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ने व्हीओसी म्हणजे हवेतील कार्बनिक यौगिक शोषून घेणाऱ्या म्हणजेच हवा शुद्ध करणाऱ्या पन्नास ‘इनडोर’ वनस्पतींपैकी तीसाहून अधिक वनस्पती भारतात, नासिकमध्ये आढळल्याचे सांगितले आहे!

जैवविविधतेचाहा खजिना नासिककरांच्या परसात, घरात, बगीच्यात, अंगणात पाहिलेला असूनही ते त्याची शास्त्रीय गुणवत्ता, दर्जा, उपलब्धता, उपयोग, निगा, संवर्धन यांपासून दूर अंतरावर आहेत! त्यांतील काही वनस्पती (उदाहरणार्थ कोरफड) त्यांच्या घरादारात आहेत. त्याचा वापरही त्वचा, केस वगैरेंसाठी सौंदर्यप्रसाधन म्हणून ते करतात; पण त्याला मर्यादा आहेत.

सर्वांनाच शुद्ध हवा देणाऱ्या वनस्पतींची नावे माहीत झाली तर जागरूक समाज त्याच्या परिसरात उपलब्ध होणाऱ्या त्यांतील वनस्पतींना त्याच्या घरकुलात सन्मानाने स्थान देईल. त्यातून त्या वनस्पतींचे संवर्धन होऊन उगाचच त्या वनस्पती उपटून टाकण्याचे धारिष्ट्य होणार नाही. अन् या दुर्मीळ वनस्पतींना रानटी न संबोधता स्वतःच्या आरोग्यासाठी दुर्मीळ पण उपयुक्त आहेत हे ज्ञान सर्वांनाच आनंद देईल. दुर्मीळ आरोग्यास पूरक अशा या वनस्पतींची नावे आहेत-

ड्रेसेना जैनेट क्रेग

1. लेडी पाम, 2. बांबू पाम, 3. रबर प्लांट, 4. ड्रेसेना जैनेट क्रेग, 5. इंग्लिश आयव्हीपाय, 6. बोस्टन फर्न, 7. किम्बर्ले क्वीन, 8. ड्रेसेना वॉर्नकेकेट, 9. ग्रेबेरा डेसी, 10. डंब कॅन, 11. इस्लएक्स वेगोनिया (दुर्मीळ), 12.हार्ट-लोफ, 13. फिलेन्ड्रान, 14. स्नेफप्लॉट, 15. किंग ऑफ हार्ट, 16. प्रे प्लँट, 17. फिलॉन्ड्रेह, 18.लली टर्फ, 19.स्पिडर प्लाँट, 20.चिनी इरित, 21.कॉटन पॉईन्सेटिया, 22.रिक्सस्तमस इस्टर कॅक्टस, 23.ट्युलिप, 24.युरेन प्लाँट, 25.सायक्लेमेन, 26.मध्यम ऑक्रीड, 27.डेन्ड्रोबीम ऑक्रीड, 28.कोरफड.

या वनस्पती नासिकला सापडतात. त्या घराच्या आत वाढतात. त्यांच्यायोगे हवा, परिसर शुद्ध होतो, कार्बनचे प्रमाण कमी होते अन् शुद्ध हवेतील श्वास पर्यायाने प्राणवायू सहज उपलब्ध होतो.

पुढील काही वनस्पती नासिकच्या हवामानात रुजू शकतात-

1. पार्लर पाम, 2. एरिका पाम, 3. दिडवार्फ डेट पाम,4.अँथुरियम.

या वनस्पती हवा स्वच्छ करण्यास मदत करणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांचे अस्तित्व, संवर्धन, जतन आवश्यक आहे. त्या फार खर्चिक उपकरणांचा वापर टाळून भावी पिढीसाठी वनस्पती सहज घरकुलात छोट्याशा जागेत, लावता येतील. तो सुंदरसा हिरवाईचा नखरा डोळ्यांना सुखावणारा अन् ‘इंटिरिअर’ म्हणून सर्वांना आकर्षित करील असाच आहे.

(‘दर्याचा राजा’ त्रैमासिक 2019 वरून उद्धृत, संपादित-संस्कारीत)

समता रविराज गंधे 9820715039 samatagandhe@gmail.com

समता गंधे (बी. कॉम) या पंचवीस वर्षांपासून कथा, कविता, ललित लेखन, स्तंभ व सदरलेखन अशा प्रकारांत लेखन करत आहेत. त्यांचे लेखन गृहशोभिका, लोकप्रभा, ललना इत्यादी मासिके आणि कुमार, हसती दुनिया, टॉनिक ही लहान मुलांची मासिके येथे प्रसिद्ध झाले आहे. त्यांचा सर्फिंग हा कथासंग्रह डिंपल प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. त्यांच्या चिंधी या लघुकथेला तन्वीशता हर्बल्स कथास्पर्धेत प्रथम पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्या गोरेगावला (मुंबई) राहतात.

————————————————————————————————-——

बांबू पाम

 

रबर प्लांट
लेडी पाम

———————————————————————————————————————————–

About Post Author

3 COMMENTS

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here