नाशिक जिल्हा संस्‍कृतिवेध

0
21

सप्रेम नमस्‍कार,

‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’तर्फे फेब्रुवारी २०१६मध्‍ये नाशिक जिल्‍ह्यातील विविध तालुक्‍यांमध्‍ये आगळ्यावेगळ्या सांस्‍कृतिक समारोहाचा आरंभ करण्‍यात येत आहे. त्‍याचे नाव आहे – ‘नाशिक जिल्‍हा संस्‍कृतिवेध!’

‘थिंक महाराष्‍ट्र’ने डिसेंबर २०१४ मध्‍ये ‘सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध’ ही माहितीसंकलनाची मोहीम यशस्‍वी रीत्या राबवली. त्या मोहिमेतून सोलापूरातील अनेकविध व्‍यक्‍ती, संस्‍था आणि गावागावांतील सांस्‍कृतिक वैशिष्‍ट्ये यांची माहिती गवसली. ती माहिती ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’वर प्रसिद्ध करण्‍यात आली आहे. त्याच धर्तीवर नाशिक जिल्‍ह्याचे माहितीसंकलनातून सांस्‍कृतिक चित्र साकार करण्‍याच्‍या हेतूने ‘नाशिक जिल्‍हा संस्‍कृतिवेध’ मोहिमेची आखणी करण्‍यात येत आहे. त्‍यावेळी नाशिकच्‍या गावागावांमधून स्‍थानिक संस्‍कृतिबाबतच्‍या माहितीचे संकलन आणि संस्‍कृतिविषयक विविध प्रश्‍नांचा उहापोह असे दुपदरी कार्यक्रम व्‍हावेत अशी आखणी करत आहोत.

आम्‍ही फेब्रुवारीतील मोहिमेची प्राथमिक तयारी करण्‍याच्‍या दृष्‍टीने येत्‍या शनिवारी नाशिक शहराला भेट देत आहोत. त्‍यासंदर्भात ‘हॉटेल सूर्या’, मुंबई नाका, नाशिक येथे शनिवार, २८ नोव्‍हेंबर २०१५ रोजी सायंकाळी ५.०० ते ७.०० या वेळात बैठक आयोजित केली आहे. त्‍यावेळी ‘व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशन’चे संचालक प्रवीण शिंदे, मुख्‍य कार्यकारी अधिकारी किरण क्षीरसागर, ‘‍थिंक महाराष्‍ट्र’चे कार्यकर्ते-लेखक श्रीकांत पेटकर आणि सिन्‍नर-निफाड तालुक्‍याचे समन्‍वयक प्रा. शंकर बो-हाडे या मोहिमेचा उद्देश जिल्‍ह्यातील विचारी आणि संवेदनशील/कृतिशील व्‍यक्‍तींना स्‍पष्‍ट करतील. या बैठकीसाठीची जागा श्री. रमेश मेहेर यांच्‍या सौजन्‍याने उपलब्ध झाली आहे.

‘व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशन’ या ‘ना नफा’ तत्‍वावर स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या कंपनीकडून ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवले जाते. वेबपोर्टलच्‍या माध्‍यमातून महाराष्‍ट्रीय समाजातील प्रज्ञा, प्रतिभा आणि चांगुलपणा यांना व्‍यासपीठ मिळवून देण्‍याचा प्रयत्न केला जातो. ‘थिंक महाराष्‍ट्र’वर महाराष्‍ट्राच्‍या विविध जिल्‍ह्या-तालुक्‍यांतील कर्तृत्‍ववान व्‍यक्‍ती, सामाजिक संस्‍था आणि गावोगावच्‍या संस्‍कृतीच्‍या पाऊलखुणा; उदाहरणार्थ – यात्रा-जत्रा, प्रथा-परंपरा, ग्रामदेवता, गडकिल्‍ले, लेणी, स्‍थानिक इतिहास, वैशिष्‍ट्यपूर्ण बाजार इत्‍यादी स्‍वरूपाची माहिती वाचायला मिळते. तुम्‍ही www.thinkmaharashtra.com वेबपोर्टलला जरूर भेट द्यावी.

‘नाशिक जिल्‍हा संस्‍कृतिवेध’ची आखणी करताना तुमच्‍या सूचना जाणून घेणे आम्‍हाला महत्त्वाचे वाटते. या मोहिमेत तालुक्‍यातालुक्‍यांत घेण्‍यात येणा-या कार्यक्रमाच्‍या आखणीत तुमचा कृतिशील सहभाग असावा अशी इच्‍छा आहे. कृपया बैठकीस उपस्थित राहवे.

धन्‍यवाद.

संपर्क –

किरण क्षीरसागर
मुख्‍य कार्यकारी अधिकारी, ‘व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशन’
९०२९५५७७६७

About Post Author

Previous articleआघाडा – औषधी वनस्पती
Next articleवाडातरचे निसर्गरम्य हनुमान मंदिर
किरण क्षीरसागर यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता. ते 'बुकशेल्फ' नावाचे पुस्तकांचा परिचय करून देणारे युट्यूब चॅनेल त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चालवतात. लेखकाचा दूरध्वनी 9029557767