धरमपुरी

0
50

ईश्वरी तत्त्वाचे वाटाडे, संत हेची रोकडे |

अमोघ ज्ञानाचे गाडे भरले असती प्रत्यक्ष || – दासगणू महाराज

धरमपुरी अहमदनगर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. ते ठिकाण निंबळक गावाच्या हद्दीत येते. त्या भूमीत प्रभू रामचंद्रांनी वनवासात असताना निंब वृक्षाच्या छायेत काही काळ विसावा घेतला. तेथे शिवलिंग स्थापन केले अशा कथा आहेत. धरमपुरीची स्थापना १९९९ मध्ये झाली. त्या वेळी जनसामान्य, संतसज्जन, संन्यासी इत्यादी भक्तांनी लोटलेला महापूर ‘धरमपुरी’ नाव सार्थक करून गेला. श्री गजानन महाराज यांच्या ज्या भाविकांना शेगाव येथे जाता येत नाही, अशा अहमदनगर पंचक्रोशीतील गजानन भक्तांना ‘धरमपुरी’ येथे येऊन शेगावची यात्रा केल्याचे समाधान मिळते. शेवगावप्रमाणेच श्री गजानन महाराजांची मूर्ती, पुढे मारुतीराया असे मंगल, प्रसन्न वातावरण आहे. माध्यान्ह आरतीनंतर चुलीवरील गरमागरम महाप्रसाद असतो. प्रसादातील ‘कढी’ हा प्रकार भाविकांचा आवडता आहे. त्यासाठीच ‘पंढरीची वाखरी तशी आळंदीची धरमपुरी’ होय.

कोतकर नावाचे गजानन महाराजांचे भक्त आहेत. त्यांची मूळ शेती. त्यांनी बांधकाम व्यवसाय सुरू केला. त्यात त्यांच्यावर वाईट वेळ आली, तेव्हा त्यांनी शेगावला जाऊन आराधना केली. त्यांना त्यांचा साक्षात्कार तेथे घडून आला. त्यांनी शेतीमध्येच लक्ष घातले. त्यांची परिस्थिती सुधारली. तेव्हा त्यांनी गजानन महाराजांच्या भक्तांना शेगावला, इतक्या दूर जावे लागू नये म्हणून स्वखर्चाने धरमपुरी येथे मंदिर बांधले. तेच भाविकांसाठी तीर्थस्थान बनून गेले आहे.

माहिती स्रोत – प्रदीप गावडे ९४२२२२८६२८, अण्णा कोतकर ९३२६८६०२७२

(‘आदिमाता’, जून २०१७ वरून थोड्या अधिक माहितीसह उद्धृत)

About Post Author