धरण हा पाणी साठवण्याचा एकच पर्याय? (Alternatives to Dam Building)

0
28

पुण्याजवळचे पानशेत येथील रण 12 जुलै 1961 रोजी फुटले. ते मुठेची उपनदी अम्बी हिच्यावर त्यावेळी नुकते बांधले होते. ते खडकवासला साखळी योजनेतील धरण असल्याने, पानशेत धरण रिकामे होऊ लागल्यावर ते पाणी खडकवासला धरणात जमा झाले. त्याचा जोर येऊन काही तासांनी खडकवासला धरणही फुटले. पाणी पुरवठा ज्या दोन धरणांतून पुणे शहराला पुढील वर्षभर होणार ती दोन्ही धरणे त्या दिवशी केवळ काही तासांत रिकामी झाली!

  खडकवासला धरण त्यानंतर चार वर्षांनी, 1965 मध्ये दुरुस्त झाले. पानशेत धरण नव्याने बांधावे लागले, ते काम 1975 मध्ये पूर्ण झाले. पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे एकही धरण 1961 ते 1965 या दरम्यान नव्हते. पुणे शहर एकाही धरणाशिवाय त्या काळात कसे जगले असेल? कारण त्यावेळी पाण्याचे पर्यायी स्रोत उपलब्ध होते! पुण्यातील खासगी विहिरी सार्वजनिक करण्यात आल्या! पुण्यात पाण्याची कमतरता होती, परंतु पुणे शहर नदी, नाले, तलाव, पेशवेकालीन पाण्याची व्यवस्था इत्यादी पर्यायी स्रोतांमुळे तगले. (श्रीमंत नानासाहेब पेशवेयांच्या पुढाकाराने पुण्यात पाणीपुरवठा यंत्रणा 1749 मध्ये उभारण्यात आली होती. ती कात्रज ते शनिवारवाडा सुरू होती. ती यंत्रणा ‘चुना आणि विटा यांच्या साहाय्याने’ सहा फूट उंच, अडीच फूट रुंद आणि आठ किलोमीटर जमिनीखाली साकारण्यात आली होती.)

 

बऱ्याच वर्षांनंतरची गोष्ट. मान्सूनचा पाऊस 2015 साली अवघ्या महाराष्ट्रातच विशेष चांगला नव्हता. पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी चार धरणे केवळ अर्धी भरली होती. दरम्यान, लोकवस्ती भरपूर वाढली होती. शहराचा विस्तार झाला होता. त्यामुळे त्या वर्षी 1961 पेक्षा फार वेगळी परिस्थिती नव्हती आणि पाण्याच्या इतर स्रोतांची अवस्था बिकट झाली होती.

          पुण्यातील पाणी पुरवठ्याची सर्व पर्यायी व्यवस्था नागरिकांनी व त्यांच्या सरकारने नष्ट केल्या आहेत. पुण्याची सर्व मदार धरणांवर आहे. पाऊस नाही पडला तर धरणे भरणार कशी?

          माणसे मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक करतात. त्यात महत्त्वाचे तत्त्व असते – ते गुंतवणुकीच्या विविध पर्यायांचे (Diversification of portfolio). कोणी माणूस उपलब्ध पुंजी सगळी एका योजनेत कधीच गुंतवत नाही. माणूस थोडी रक्कम पब्लिक प्रॉव्हिडंट फंडांत, थोडी मुदतीच्या ठेवींत, थोडी सोन्यात, थोडी शेअर्समध्ये इत्यादी अशा तऱ्हेने साठवतो. कारण काय तर, एक योजना काही कारणाने अयशस्वी झाली तरी बाकी रक्कम सुरक्षित राहते!मग पाण्याचे नियोजन कसे करायला हवे? त्याच्याशिवाय तर माणूस जगूच शकत नाही. पुणेकर नागरिक इतर पर्याय नष्ट करून देऊन त्या बाबतीत किती मोठा जुगार खेळत आहेत?

          पुण्याची जी अवस्था आहे, तीच थोड्या फार फरकाने इतर शहरांची आहे. त्यावर उपाय काय?

अदिती देवधर 7350000385 aditideodhar2017@gmail.com  

पुण्याच्या अदिती देवधर या ‘जीवितनदी लिव्हिंग रिव्हर फाउंडेशन’ या संस्थेच्या संस्थापक संचालक आहेत. त्यांनी ब्राऊन लीफहे व्यासपीठ 2016 मध्ये सुरू केले. त्यात चार हजार लोक जोडले गेले आहेत. त्यांच्या या उपक्रमासाठी त्यांना लोकसत्ताचा नवदुर्गा पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे शिक्षण गणित विषयातील (एम एस्सी). त्यांनी सहा वर्षे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आणि नंतर तीन वर्षे एका सामाजिक संस्थेत त्याच विषयातील सल्लागार म्हणून काम केले. त्यांनी काही वर्षांपूर्वी त्यांच्या कामाचा फोकस पर्यावरणीय प्रकल्पांकडे वळवला. त्या त्यांच्या टेक्निकल ज्ञानाचा वापर त्या क्षेत्रात करत आहेत.

—————————————————————————————————————————————————

About Post Author

Previous articleलाला लजपतराय आणि निग्रो – एक अज्ञात पैलू (Lala Lajpat Rai on Racism in America)
Next articleपुण्याच्या मुळा-मुठा नदीची स्वच्छता (Cleaning of Mula-Mutha River in Pune)
पुण्याच्या अदिती देवधर या ‘जीवितनदी – लिव्हिंग रिव्हर फाउंडेशन’ या संस्थेच्या संस्थापक संचालक आहेत. त्यांनी ‘ब्राऊन लीफ’ हे व्यासपीठ 2016 मध्ये सुरू केले. त्यात चार हजार लोक जोडले गेले आहेत. त्यांच्या या उपक्रमासाठी त्यांना लोकसत्ताचा नवदुर्गा पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे शिक्षण गणित विषयातील (एम एस्सी). त्यांनी सहा वर्षे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आणि नंतर तीन वर्षे एका सामाजिक संस्थेत त्याच विषयातील सल्लागार म्हणून काम केले. त्यांनी काही वर्षांपूर्वी त्यांच्या कामाचा फोकस पर्यावरणीय प्रकल्पांकडे वळवला. त्या त्यांच्या टेक्निकल ज्ञानाचा वापर त्या क्षेत्रात करत आहेत. 7350000385

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here