गणेश देवी व्यासंगी प्रतिभावंत

_Ganesh_Devy_2.jpg

गणेश देवी हे सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजचे विद्यार्थी. त्यांनी त्यांचे शिक्षण शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) आणि लीड्स विद्यापीठ (इंग्लंड) येथून पूर्ण केले. त्यांनी कोल्हापूर, सुरत, वडोदरा, गांधीनगर येथे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. अभ्यासक, संशोधक, व्यासंगी प्रतिभावंत अशा देवी यांचे लेखन प्रामुख्याने इंग्रजी आणि गुजराती या भाषांतून झाले असले तरी त्यांनी मराठी सारस्वताचीही सेवा केली आहे. त्यांच्या नावावर साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ‘आफ्टर अॅम्नेसिया’ या ग्रंथासह ‘ऑफ मेनी हिरोज’, ‘इन अनदर टंग’, ‘पेटेंड वर्ड्स’, ‘इडियन लिटररी क्रिटिसीझम’, ‘ट्रॅडिशन अँड मॉडर्निटी’, ‘अ नोमॅड कॉल्ड थिफ’ असे ग्रंथलेखन इंग्रजीतून आहे. त्यांची ‘आदिवासी जाणे छे’ हा गुजराती आणि ‘वानप्रस्थ’ हा अनेक पुरस्कारप्राप्त मराठी अशी अन्य ग्रंथसंपदा आहे. त्यांचे सेवाकार्य ‘आदिवासी अकादमी’, ‘भाषा संशोधन-प्रकाशन केंद्र’, ‘हिमलोक इन्स्टिट्यूट’, ‘ग्रामविकास’ अशा संस्थांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यातूनच त्यांना भारतीय बोली व प्रादेशिक भाषा यांचा आवाका आला. त्यातून त्यांना भाषांच्या सामंजस्यपूर्ण लोकजीवन वर्तन-प्रचलनाची जाण आली. तिचा उपयोग भाषाप्रकल्पाचा व्याप सर्वसमावेशक करण्यासाठी त्यांना झाला. ‘महाराष्ट्र’ खंडातही त्याचा प्रत्यय येतो.

– अनिल सहस्रबुद्धे

shripad.kulkarni68@gmail.com

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.