कोरोना: रवांडा देश लहान कृती महान (Corona: Rwanda Govt. Acted Fast)

69
24

रवांडा हा मध्य आफ्रिकेतील हृदयात वसलेला छोटासा देश. जगाच्या नकाशात पाहिले तर छोटा बिंदू; पण, खरे तर, मूर्ती लहान कीर्ती महान! हे मी स्वतः अनुभवत आहे. मी मुंबईहू येथे वास्तव्यास 2015 साली आले. ‘लँड ऑफ थाउजंड हिल्सअशी त्या देशाची स्तुती मी ऐकून होते. शीप्रचिती येत आहे या देशाची. स्वच्छता आणि हिरवळ यांवर या देशाचे असलेले प्राधान्य वाखाण्याजोगे आहे. किगली ही रवांडाची राजधानी आहे. त्या शहराला तर आफ्रिका खंडातील क्लीन सिटीहा पुरस्कार 2008 साली मिळाला.

रवांडा रोबोट ट्रीटमेंट प्लॅन

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना संकटाची कल्पना रवांडाला वेळीच पूर्णपणे आली होती आणि त्यानुसार त्यावेळीच वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक विमानतळावर करण्यात आली. ते बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करत. मुंबईहून परतलेले भारतीय जोडपे कोरोनाबाधित असल्याचे 14 मार्चला जाहीर झाले.

पोर्टेबल वॉश बेसिन बस स्थानक

रवांडाने 21 मार्चला लॉकडाऊन जाहीर केला. आफ्रिकेतील मर्यादित वैद्यकीय सुविधा आणि अतिदक्षता विभागातील अपुऱ्या सेवा यांचे गांभीर्य रवांडाने वेळीच लक्षात घेतले. गर्दीची ठिकाणे बसस्थानके, दुकाने, भाजीमंडई – येथे हात धुणे, मास्क घालणे बंधनकारक केले गेले. सार्वजनिक ठिकाणी हाधुण्यास सोयीस्कर अशा पोर्टेबल वॉशबेसिनची सुविधा करण्यात आली. सोशल डिस्टन्ससाठी दुकानात गर्दी करणे रोखण्यात आले. रवांडासारख्या छोट्या देशात वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आणि कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी रोबो आणण्यात आले. त्यामुळे डॉक्टर्स, परिचारिका यांना कोरोनासंसर्ग कमी झाला. लॉकडाऊननंतर जीवनावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या. देशाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, सरकारने व्यापारी समुदाय आवश्यक सुविधांचे दर वाढवणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. त्यामुळे आम्हाला गोष्टींचा तुटवडा कधीच जाणवला नाही.

अचानक झालेल्या कोविद-19 लॉकडाऊनमुळे देशाच्या आर्थिक परिस्थितीला धक्का बसला. रवांडा सरकारच्या सोशल इकॉनॉमिक प्लॅन अनुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा एक महिन्याचा पगार रोखून गरीब कुटुंबांना उदरनिर्वाहाच्या गोष्टी पुरवण्यात आल्या. छोट्यामोठ्या उद्योगधंद्यांचे नुकसान झाले. रवांडा वित्त विभागाच्या माहितीनुसार उद्योजकांना प्रोत्साहन म्हणून सरकार आर्थिक साहाय्य करणार आहे. कामगार वर्ग फार मोठ्या प्रमाणात या परिस्थितीचा बळी ठरला आहे. अनेक खाजगी कंपन्याही मदत रकमेसह पुढे आल्या. भारतीय समुदायाची हिंदू मंदिर संघटनाही मदतीसाठी सरसावली आहे. सध्या रवांडा येथे साडेतीन ते चार हजार भारतीय राहत आहेत. महाराष्ट्राच्या विविध शहरांतील पंधरा-वीस कुटुंबे आहेत.

माझे पती रोशन हे आफ्रिकन इथिओपियन एरलाईन्समध्ये कार्यरत आहेत. विमानतळ बंद आहेत, त्यामुळे त्यांच्या कामावर कोविद-19चा फार मोठा परिणाम झाला आहे. तरीही दरम्यानच्या काळात रवांडाने काही खाजगी विमाने युरोपी/अमेरिकन नागरिकांसाठी पाठवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्याच प्रमाणे रवांडाने लॉकडाऊनच्या काळात युरोपमध्ये अडकलेले विदयार्थी मायदेशी आणण्यासाठी खास विमानेही पाठवली. त्यातून आलेल्या साऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. रवांडामधील जनताही सरकारी नियमांचे कटाक्षाने पालन करते. त्याचे पॉझिटिव्ह परिणाम दिसून आले.रवांडामध्ये कोविद-19चा सामुदायिक फारसा झाला नाही, जवळ जवळ एक महिन्याच्या लॉकडाऊननंतर 4 मे रोजी सर्व कामकाज हळूहळू पूर्ववत करण्याचे सरकारने जाहीर केले. कोरोनाचे रवांडामध्ये एकूण सहाशेसेहेचाळीस रुग्ण आढळले आहेत, त्यांपैकी साडेतीनशे रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. देशात कोरोनाचे दोन मृत्यू झाले आहेत. अत्यावश्यक सेवेतील कोणीही आजारी वा मृत नाही. वेळेत घेतलेले सरकारी निर्णय आणि लोकांची शिस्त यांमुळे रवांडा लवकरच कोरोनावर मात करू शकेल ही आशा आहे. जगभरची या डोळ्यांना न दिसणाऱ्या शत्रूच्या विळख्यातून सुटका होवो अशी प्रार्थना करते.

आरती सुपे आणि पती रोशन सुपे

मी मुंबईतील साठ्ये महाविद्यालयातून मायक्रोबायोलॉजी विषयातील पदवी घेतली आहे. मी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये रेस्पिरेटरी टेक्निशियन म्हणून अतिदक्षता विभागात काम करत होते. तेथे डॉक्टर, नर्स आणि आपत्कालीन विभागातील कर्मचारी या सर्वांकडून बरेच काही शिकले. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या कोविदवरील उपचारात त्या सर्वांवर येणारा ताण मी समजू शकते. पुढे, मी हॉस्पिटल मॅनेजमेण्टचे शिक्षण पूर्ण केले व व्यवस्थापन विभागात काम करू लागले. मी मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये इंटरनॅशनल पेशंट के या विभागात आफ्रिकेतील विविध देशांतूनआलेल्या लोकांना मदत करत होते. त्यात रवांडाचे नागरिकही असत. रवांडामध्ये आल्यावर, मी काही वर्षे येथील क्लिनिक्समध्ये व्यवस्थापन विभागात काम केले. पुढे, मुलगी झाल्यावर थोडा ब्रेक घेतला आहे.

किगली कन्व्हेन्शन सेंटर समोरील भ्रष्टाचार विरोधी शिल्पकृती
रवांडा येथील क्लिनिक आणि आरती यांचे सहकारी

रवांडा हा छोटासा पण वैशिष्ट्यपूर्ण देश आहे. रवांडाची लोकसंख्या फक्त एक कोटी तीस लाख आहे. तो देश भारतातील केरळपेक्षाही क्षेत्रफळाच्या दृष्टीने छोटा आहे. रवांडामध्ये 1994 साली दोन वेगळ्या जातींमधील अंतर्गत वादाने युद्ध पेटले. त्याने अतिशय गंभीर रूप घेतले. म्हणून त्याला जेनोसाइड असेच म्हणतात. तो वंशसंहार शंभर दिवस चालला. त्या दहा लाख लोक मृत्युमुखी पडले. रवांडा पॅट्रिऑटिक फ्रंट (RPF) या समुदायाने सैनिकांच्या मदतीने ते युद्ध थांबवले. त्यानंतर रवांडामध्ये एकच जात उरली ती म्हणजे रवांडन. ते  भाषाही एकच वापरतात ती म्हणजे किन्या रवांडा. त्या युद्धाने देशाची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळली. मात्र रवांडाने कठोर परिश्रमाने देशाच्या आर्थिक संकटाला तोंड दिले. तो देश शेतीप्रधान आहे. नव्या आर्थिक धोरणांनुसार,त्यांनी चहाकॉफीच्या निर्यातीवर विशेष लक्ष दिले. रवांडाने गोरिल्ला माउंटन हे पर्यटनासाठी मोठे आकर्षण तयार केले. त्यामुळे गोरिल्ला पाहण्यासाठी लोक जगभरातून रवांडाकडे येऊ लागले. रवांडा येथे विदेशी लोक मुख्यत उद्योगधंदे, संयुक्त राष्ट्र संघ, युनिसेफ आणि  एनजीओ  सारख्या माध्यमातून येत असतात. आफ्रिकेतील इतर देशांपेक्षा रवांडामध्ये भ्रष्टाचार कमी आहे. आणि तेथे सुरक्षितताही अधिक आहे. त्यामुळेजगभरातून अनेक उद्योज रवांडाकडे येत गेले. रवांडाने मागील वीस वर्षात विलक्षण प्रगती केली आहेलिंग समानतेला प्राधान्य देणारा रवांडा हा जगातील पहिला देश आहे. तेथे पार्लमेंटमध्ये एकसष्ट टक्के जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. रवांडाचे राष्ट्राध्यक्ष पॉल कगामे हे आहेत.

आरती सुपे aarti.c.chavan@gmail.com
————————————————————————————————————

रवांडामधील किगली शहर

——————————————————————————

 

About Post Author

69 COMMENTS

  1. आफ्रीका खंडातला एवढा छोटा देश .ह्याची बरीच माहिती या लेखाद्वारे मिळाली .आपला देश सोडून अशा अपरिचित देशात जाऊन स्थिरस्थावर होणे खरोखरच कौतुकास्पद वाटते .लेख छान माहितीपूर्ण. सौ.अंजली आपटे .

  2. खूप सुंदर लेख…जगाच्या नकाशावरील एक छोटासा देश..पण या लेखामुळे त्या देशाची छान ओळख झाली.

  3. लेख वाचून रवांडा विषयी माहिती तर मिळालीच,पण एक ओढ निर्माण झाली.

  4. नमस्कार, आरती व रोशन सुपे मी अशोक शिंदे. किगालीला माझी मुलगी 'नेहा ' व जावई 'पंकज 'हे स्थायीक आहेत. पाच वर्षांपूर्वी आम्ही तेथे आलो होतो. तेथील सौंदर्य, शिस्तबद्धता, स्वछता, माणुसकी, वातावरण हे वाखाणण्याजोगे आहे. आणि हो आरती मॅडम, आपला लेख खुपच छान आहे. या निमित्ताने आपल्या महाराष्ट्रातील जनतेला खुप चांगली माहिती मिळाली. धन्यवाद. ������

  5. Blog is very Informative. Mindset of our Indians about African counties are not well. This blog will help people to understand the real facts. NICE BLOG. KEEP IT UP AARTI

  6. धन्यवाद !!! नमस्कार काका 🙏 इतका छान अभिप्राय दिल्या बद्दल.. आम्ही तुम्हा सर्वांची किगाली ट्रिप पुन्हा केव्हा प्लॅन होते आहे त्याची वाट पाहतो आहे ..भेटू लवकरच !! काळजी घ्या !!

  7. फार सुंदर लेख. एका छोट्या पण छान देशाची माहिती कळली.सौ.अनुराधा म्हात्रे. पुणे

  8. छान लिखाण केले आरती . रवांडाचा इतिहास तसेच तेथील administration,कामातिल तत्परता तसेच तेथील शिस्तबद्धता विषयी भारतीयांना नक्कीच जाणीव होईल व आफ्रिकन लोकांविषयीचा गैरसमजही दूर होईल . आरती तुझे मनापासून अभिनंदन.

  9. रवांडा म्हणजे जेनोसाईड इतकेच माहित होते. नवी माहिती मिळाली. धन्यवाद.

  10. दोन देशांमधला व्यवस्थापनतील फरक हा तेथील वास्तव्याने कळतो आणि त्या देशाच्या सूज्ञ नागरिक म्हणून महत्वाची भुमिका बजावतो…उत्तम नियोजन.सुंदर लेख…राकेश चव्हाण

  11. Good article. Lot of misconceptions about Africa could be cleared.अनघा गोडसे. ऑस्ट्रेलिया..माझ्या what's ap आली ती पुढे फॉरवर्ड करत आहे.संध्या जोशी

  12. आज जर सावकाशपणे हा सुंदर लेख परत वाचला. खरंच आरती तुझं मनापासून कौतुक. रवांडा देश म्हणजे एक दुर्मिळ उदाहरण आहे. फिनिक्स आहे आणि कोरोना असो किंवा दुसरे कुठले संकट , हा देश मेहनत आणि शिस्तप्रियतेच्या बळावर प्रगती पथावर अग्रेसर आहे. आरती पुन्हा एकदा अभिनंदन आणि लेखन करीत रहा. You definitely have it within you. All the best.

  13. खूपच सुंदर आरतीतिकडे राहून तू मराठी विसरली नाही हे महत्वाचेतू एवढं छान आणि सोप्या भाषेत लिहिलंस की एखाद्या लहान मुलाला ही सहज कळे आपण जिथे राहतो त्या देशाचा आदर आपण केला पाहिजे हे तू दाखवून दिलेकाळजी घ्या धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here