उद्याची नवी भाषा दृकश्राव्य असेल का?

     ‘स्‍पंदन परिवारा’तर्फे ‘मराठी सिनेमा – काल, आज आणि उद्या’ या विषयावर झालेल्या परिसंवादात सुरूवातीलाच डॉ. मोहन आगाशे यांनी मांडलेले भाषेबद्दलचे मत विशेष वाटले….
mohan_agashe
      ‘स्‍पंदन परिवारा’तर्फे ‘मराठी सिनेमा – काल, आज आणि उद्या’ या विषयावर झालेल्या परिसंवादात सुरूवातीलाच डॉ. मोहन आगाशे यांनी मांडलेले भाषेबद्दलचे मत विशेष वाटले. ते म्‍हणाले, की आपल्‍यावर नेहमीच शब्दाक्षर भाषेचा डॉमिनन्‍स राहिलेला आहे. साक्षरता या शब्‍दाचा अर्थ नेहमीच लिखित भाषेशी जोडण्‍यात आला. वयाच्‍या पाच-सहा वर्षापर्यंत आपण शाळेत न जाताच बोलीभाषा आत्‍मसात करतो. मात्र तरीही ती भाषा पुढील दहा-बारा वर्षे शाळेत शिकवली जाते. त्‍याउलट जन्‍माला आल्‍यापासून ज्‍या दृकश्राव्‍य भाषेतून आपण ज्ञान आत्‍मसात करत असतो, ती भाषा शिकवलीच जात नाही!
 

     आगाशे यांचे वक्‍तव्‍य चित्रपटभाषेच्‍या संदर्भात होते, मात्र त्‍याचा संबंध आपल्‍या वास्‍तव जगाशी तेवढाच गहिरा वाटला. आपण भाषा शिकतो, त्‍यावेळी बुद्धीचा संबंध अक्षरं आणि शब्‍दांशीच जोडला जातो आणि दृकश्राव्‍य भाषेशी असलेला संबंध दुर्लक्षितच राहतो. आपला सभोवताल एवढ्या झरझर बदलतोय की, जगातल्‍या सगळ्याच भाषा संवाद साधण्‍याच्‍या पातळीवर हळुहळू कमकुवत ठरू लागल्या आहेत. त्याची काहीशी छटा पाहायला मिळते. अशा वेळी जगाला एका अशा भाषेची आवश्‍यकता भासू लागेल की, जी संवादाच्‍या पातळीवर सशक्‍त तर असेलच, मात्र त्‍याचबरोबरीने ती वैश्विकही असेल. कदाचित पुढे जाऊन हीच दृकश्राव्‍य भाषा जगाची नवी भाषा ठरू शकेल!

किरण क्षीरसागर
उपसंपादक, थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम

दिनांक – 25.05.2011

About Post Author

Previous article‘इंग्रजी माध्यमाचीच समाजाला गरज’ हे चित्र भ्रामक
Next articleमराठी शाळा टिकवायच्या कशा?
किरण क्षीरसागर यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता. ते 'बुकशेल्फ' नावाचे पुस्तकांचा परिचय करून देणारे युट्यूब चॅनेल त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चालवतात. लेखकाचा दूरध्वनी 9029557767