सोलापूरची दधिमती माता

दधिमती माता ही सोलापूरातील दाधीच समाजाचे कुलदैवत म्‍हणून ओळखली जाते. सोलापूर शहरातील चाटीगल्‍ली परिसरात दाधीच समाजाचे मंदिर आहे. तेथे दधिमती मातेची मूर्ती आढळते. नवरात्रात या देवीसमोर मोठा उत्‍सव साजरा केला जातो. दधिमती माता ही राजस्‍थानातील प्रमुख राजवंशांच्‍या कुलदैवतांपैकी एक आहे.

– संकलित