सद्भावनेचे व्यासपीठ

  एकूण जीवनाला आलेला बकालपणा, ढासळती मूल्यव्यवस्था, वाढता विद्वेष आणि त्यातून सध्या होत असलेली हिंसा, दुरावत चाललेली नाती, हरवत चाललेला माणुसकीचा गहिवर… प्रत्येक संवेदनशील मन अस्वस्थ आहे. संशय, अविश्वास यांमुळे मानवी संबंध तुटक, त्रयस्थ होऊन गेले आहेत. सारा सभोवताल नकारात्मक वातावरणाने भरून गेला आहे आणि त्यात मीडिया पिसाट आनंद लुटत आहे. भौतिक समृद्धी आहे. परंतु निर्भेळ, निर्मळ, निरामय असे काही जाणवतच नाही. खरेच, सगळे जग अप्पलपोटे, स्वार्थी बनले आहे का?

  नाही. थोडे समाजात, समुदायात मिसळलात तर माणसे माणसांशी चांगुलपणाने वागताना दिसतील; छोटी माणसे मोठी कामे उभी करत असल्याचे पाहण्यास मिळेल. खरे असे आहे, की आजही माणसे इतरांच्या भल्यासाठी धडपडत आहेत. समाजातील भलेपणा जपू पाहत आहेत. अशा व्यक्ती समाजात दहा टक्केच असतात, परंतु त्यांचा प्रभाव एकूण समाजावर भासतो तेव्हा एकूण समाजाच्या सद्भावनेची शक्ती जाणवते, त्याच समाजशक्तीचा प्रत्यय घेण्यासाठी ‘सद्भावनेचे व्यासपीठ’ आहे. येथे जे जे चांगले आहे ते ते नोंदले जाईल.

  तुमच्या आढळात निःस्वार्थी भावनेतून राबवल्या जाणाऱ्या व्यक्तिगत वा संस्थात्मक उपक्रमांची माहिती असेल तर ती शब्दबद्ध करून अथवा फोटो-ऑडिओ-व्हिडिओ करून सर्व संपर्कांसहित ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलच्या इमेल आयडीवर पाठवावी. अर्थात, चांगुलपणाच्या कृतीमागे तितकाच समर्थ चांगला विचार व चांगली भावना असते. असे विचार व भाव यांनाही ‘सद्भावनेच्या व्यासपीठ’वर स्थान असेल.

  उपक्रम सूत्रधार: अपर्णा महाजन
  ईमेल आयडी : info@thinkmaharashtra.com, 9892611767

  ——————————————————————————————————————————

  About Post Author

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here