सचिन तेंडूलकरला भारतरत्न‍

     सचिन तेंडूलकरला भारतरत्‍न देण्‍़यामध्‍़ये काही अडचणी येत आहेत. ज्‍या क्षेत्रांमध्‍ये काम केलेल्‍या व्‍यक्‍तींना भारतरत्‍न देण्‍यात, त्‍यामध्‍़ये क्रीडा क्षेत्राचा समावेश नाही. क्रीडा क्षेत्रात कार्यरत राहून देशाचे नाव आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर उंचावणा-या खेळाडूंनाही भारतरत्न पुरस्‍काराने सन्‍मानित करणे गरजेचे आहे, हा विचार आजपर्यंत सरकारला कधीच आला नाही. मात्र आता उशीरा का होईना, ही तरतूद करून केवळ सचिनच नव्‍हे तर इतर खेळाडूंचाही भारतरत्‍नासाठी विचार व्‍हावा.

     अण्‍णा हजारे यांच्‍या आंदोलनामुळे सरकारने लोकपाल विधेयकासाठीच्‍या मागण्‍या तूर्तास मान्‍य केल्‍या असल्‍या तरी संसदेत हे विधेयक संमत होईल असे वाटत नाही. लोकपाल विधेयकामुळे राजकारण्‍यांवर अनेक बंधने येणार हे निश्चित. भ्रष्‍टाचाराच्‍या बाबतीत त्‍यांच्‍यावर अंकुशही लागेल. विचारात घेण्‍याजोगा मुद्दा असा, की निवडणुका किंवा तत्‍सम कार्यक्रमांमध्‍ये मोठ्या पैशांची आवश्‍यकता असते. हे सगळे कार्यक्रम घोटाळे आणि भ्रष्‍टाचार केल्‍याशिवाय पार पडणे अशक्‍यच वाटते. अशा वेळी लोकपाल विधेयकाद्वारे स्‍वतःवर अंकुश लादण्‍यास कोणताच राजकारणी सहमत नसेल. त्‍यामुळे ऑगस्‍ट महिन्‍यातही या विधेयकावर संमतीची मोहर लागणे, ही अशक्‍य गोष्‍ट भासते.

– राजेश पाटील
अकाउंटन्‍ट, अलख अॅडव्‍हर्टायझींग अॅण्‍ड पब्लिसिटी

दिनांक –  ११.०४.२०११

{jcomments on}