Home संस्था

संस्था

गांधीजी महाराष्ट्राची ताकद कार्यकर्त्यांत आहे असे म्हणत. महाराष्ट्रभर स्वयंसेवी संस्थांचे जाळे असून व्यक्तिगत व संस्थात्मक रीत्या बरेच मोठे सामाजिक कार्य होत असते. बदलत्या काळात व्यक्ती खासगी रीत्या अनेकानेक उपक्रम उभे करतात. त्या संस्था समाजालाच पुढे नेत असतात. अशा सरकारी, निमसरकारी, खासगी उपक्रमशील संस्थांचा परिचय.

रिलेशानी (Beautiful Relationship)

मोहन देस यांच्या ‘आरोग्यभान’ या प्रकल्पातून जन्माला आलेला ‘रिलेशानी’ हा प्रकल्प म्हणजे छान नातेसंबंध. वाढीच्या वयात, तरुणपणी मनात अनेक प्रश्न धुमाकूळ घालत असतात. त्यांचे निरसन करण्यासाठी विश्वासू व्यक्ती आयुष्यात नसेल तर नात्यात दरी पडते आणि ती वाढत जाते. लैंगिकतेकडे बघण्याचा सकस दृष्टिकोन, प्रेम-भावनेचे अनेक पदर, नात्यातून निर्माण होणारा विश्वास अशा अनेक विषयांवर मनमोकळा संवाद ‘रिलेशानी’ शिबिरात होतो. म्हणून त्याला संवाद शिबिर असेही म्हटले आहे...

आरोग्य भानची गोष्ट (The Story of Awareness of Health)

6
आरोग्य म्हणजे शरीर तर आहेच; पण अन्न, पाणी, मानवी मन, भवताल, भावभावना, नातेसंबंध या विशाल परीघामध्ये येणाऱ्या असंख्य गोष्टी या आरोग्य राखण्यासाठी असतात. या परिस्थितीबाबत काय करता येईल याविषयी संवाद घडवणे आणि त्यातून माणसांनी सक्षम होणे शक्य आहे असा विचार करून निर्माण केलेली संस्था म्हणजे ‘आभा’- आरोग्य भान ! लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आयुष्यात बदल घडवण्याची क्षमता डॉ. मोहन देस यांच्या संस्थेच्या कामात आहे...

सामाजिक दायित्व जपणारी दापोली अर्बन बँक (Dapoli Bank – An institute that belongs to...

दापोली अर्बन सहकारी बँकेची स्थापना 29 फेबुवारी 1960 रोजी झाली. बँक स्थापनेमागे उद्देश दापोली शहराच्या व्यापाराची व सर्वसामान्य माणसाची आर्थिक गरज भागवावी आणि शहराचा विकास साधावा हा होता. दापोली तालुक्याेत कोकण कृषी विद्यापीठ, मेडिकल कॉलेज, सायन्स-आर्टस्‌ कॉलेज अशा विविध शैक्षणिक सुविधा बनत गेल्या. मात्र तरी दापोलीच्या तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींना पुणे-मुंबई यांसारख्या शहरांकडे जावे लागे. ती उणीव बँकेने हेरली व सदतीस लाख रुपये एवढी देणगी देऊन दापोली अर्बन सिनिअर सायन्स कॉलेजची स्थापना केली !

मुरूड : वंदनीय विद्यार्थ्यांचे विद्यालय

शाळेतील शिक्षक वंदनीय असतात; पण एखाद्या शाळेतील विद्यार्थीही वंदनीय असतात हे वाचून कोणालाही अचंबा वाटेल. अशी शाळा आहे दापोली तालुक्यातील ‘मुरूड’ या गावातील.शाळा 10 ऑगस्ट 1834 रोजी स्थापन झाली. शाळेत 1842 पासूनचे बरेचसे रेकॉर्ड उपलब्ध आहे. त्यानुसार शाळेचा पहिला विद्यार्थी ‘विनू दातार’ हा आहे. त्यावेळी वडिलांचे नाव लिहीत नसावेत. एवढेच नव्हे, तर नोंद घरगुती नावानेच होत असे. 1844 पासून संपूर्ण नाव, तर 1879 पासून जन्मतारखाही नोंद करू लागले...

दिलासा – रुग्णांच्या चेहऱ्यावरील हसू (Smiles on the faces of patients at Dilasa)

व्याधिग्रस्त वृद्ध लोकांना सांभाळणे, त्यांचे औषधपाणी करणे, त्यांना त्यांचा शारीरिक त्रास, वेदना कमी होण्यासाठी मदत करणे, विकलांग, मतिमंद मुलांना आयुष्य चांगले जगण्याकरता मदत करणे अशी कामे करणारी ‘दिलासा’ ही नाशिकमधील अठरा वर्षे जुनी संस्था आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले सतीश जगताप आणि राज्यसेवेच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उज्ज्वला जगताप या दाम्पत्याने नेहमीच्या वाटा बदलून स्वतःची स्वतंत्र वाट निर्माण केली...

परतवाडा येथील श्री शारदा महिला मंडळ

श्री शारदा मंडळाला पंच्याऐंशी वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. मंडळ माई करकरे आणि त्यांच्या खास जिवलग व जिद्दीने काम करणाऱ्या मैत्रिणी मामी गोरे, बाई नवरे, काकू पराडकर, नमू अभ्यंकर व प्रमिला मुजुमदार- यांच्या प्रयत्नाने व एकीमुळे पुढे आले. त्यांनी शारदेची स्थापना करून कार्यक्रम केले. अचलपूरमध्ये खाजगी मराठी प्राथमिक शाळा नव्हती, म्हणून बालक मंदिर ही शाळा सुरू केली. ती अजूनही चालू आहे...

आबासाहेब काकडे : क्रांतिकार्यातून विधायकतेकडे (Abasaheb Kakade : Work to educational activity)

स्वातंत्र्यानंतर पहिला प्रश्न उभा राहिला तो आम जनांना शिक्षणाचा. बहुजन समाजातील मुले-मुली शिक्षणापासून वंचित होती. ती उच्चभ्रू सुशिक्षित समाजाकडून नाडली जात होती. आबासाहेबांच्या मनात कार्य करण्याची सामाजिक जाण होती. त्यांनी ‘दि फ्रेंड्स ऑफ दि डिप्रेस्ड लिग, शेवगाव’ या संस्थेची स्थापना केली ! त्यांनी स्वतःच्या वाड्यात शेवगावच्या जैन गल्लीत मुलांचे पहिले वसतिगृह 1954 मध्ये सुरू केले. त्यांनी त्या वसतिगृहास ‘श्री संत गाडगे महाराज’ यांचे नाव दिले...

अचलपूरचे एकशेतीस वर्षांचे वाचनालय (One hundred and thirty year old library of Achalpur)

बाबासाहेब देशमुख यांनी अचलपूर शहरात गेल्या शतकारंभी अनेक संस्था स्थापन केल्या, त्यांतील पहिली ‘सार्वजनिक वाचनालय’ ही होय. त्या संस्थेचा स्थापना दिनांक उपलब्ध नाही. मात्र वाचनालयाच्या सध्याच्या इमारतीची जागा स्थानिक नगरपालिकेने 1893 साली वाचनालयास दिल्याचा उल्लेख आहे. वाचनालयास शहराच्या मध्यभागात प्रशस्त जागा मिळाली, परंतु साजेशी इमारत नव्हती. त्याकरता बाबासाहेब देशमुख यांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्वतः बरीच वर्षे वाचनालयाचे काम पाहिले...

तपस : आई-बाबांचे दुसरे घर (Tapas : My Parents’ Second Home)

आई-वडील वृद्ध झाले आणि ती दोघेच राहत असतील तर त्यांच्या काळजीने मुलींचा जीव व्याकूळ होणारच ! पण त्यांना त्यांचा संसार असतो, संसारातील चढउतार पार करताना, आई-बाबांकडे जसे लक्ष देण्यास हवे तसे लक्ष मुलगा-मुलगी देऊ शकत नसल्याने त्यांच्याही मनाची उलघाल होत असते. त्यांना घर सोडून दुसरीकडे ठेवावे का? या अनुच्चारित प्रश्नामुळेदेखील मन अपराधाने खात राहते. अशा प्रसंगी निर्णय काय घ्यावा? कसा घ्यावा? याबाबत ममता महाजन यांनी लिहिलेला त्यांचा हा अनुभव द्विधा मनस्थितीत असलेल्या अनेकांना विचार करण्यास मदत करेल...

एक यशोगाथा! (Yasho’s Story)

यशोदा वाकणकर ही स्वतःला असलेल्या व्याधीचे दुष्परिणाम सोसल्यावर एपिलेप्सी रुग्णांच्या बाबतीत मोलाचे, विधायक काम करते आहे. तिने अपस्माराच्या आजारातून बरी झाल्यावर 2004 मध्ये पुण्यात ‘संवेदना फाउंडेशन’ हा एपिलेप्सी सपोर्ट ग्रूप सुरु केला. आनंदी राहण्यासाठी कितीतरी लहान मोठी कारणे असतात. पण कारणाशिवाय आनंदी राहण्याचा एक मोठा धडा स्वानुभवाने ती सोपा करून सांगते. तिचे काम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचले आहे...