Home संमेलनाध्यक्षांची ओळख
संमेलनाध्यक्षांची ओळख
पंचेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-fifth Marathi Literary Meet 1964)
पंचेचाळिसावे मराठी साहित्य संमेलन गोव्यात मडगाव येथे 1964 साली आयोजित करण्यात आले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित कविश्रेष्ठ कुसुमाग्रज होते. त्यांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची लहान बहीण होती. कुसुम ही एकुलती एक बहीण असल्याने शिरवाडकर यांनी कुसुमचे अग्रज अर्थात कुसुमाग्रज हे टोपणनाव धारण केले.
त्रेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-third Marathi Literary Meet 1961)
कुसुमावती देशपांडे यांची कवयित्री, कथाकार व समीक्षक अशी मराठी साहित्यसृष्टीत ओळख आहे. त्यांचा इंग्रजी व मराठी वाङ्मयाचा व्यासंग विलक्षण होता. त्यांनी त्या काळी कुटुंबियांचा विरोध डावलून कवी अनिल यांच्याशी केलेला प्रेमविवाह चर्चेचा विषय बनला. त्या दोघांचा त्या काळातील पत्रव्यवहार ‘कुसुमानिल’ या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे…
बेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-Second Marathi Literary Meet 1960)
रा.श्री. जोग यांची ओळख मर्मज्ञ समीक्षक अशी साहित्य विचारक्षेत्रात आहे. जोग यांच्या ‘अभिनव काव्यप्रकाश’ या ग्रंथाने मराठी साहित्य विचाराचा पाया घातला गेला. त्यांनी त्या ग्रंथात पाश्चिमात्य साहित्य, इंग्रजी साहित्यशास्त्र व मानसशास्त्र यांची जोड देऊन जुन्या संस्कृत-साहित्यशास्त्राचे संस्करण केले. जोग यांनी अर्वाचीन वाङ्मयनिर्मितीच्या रसग्रहणाला आणि मूल्यमापनाला समर्थ ठरेल अशी अभिनवता साहित्य विचाराला प्रदान केली...
एकेचाळीसावे साहित्य संमेलन (Forty-first Marathi Literary Meet 1959)
श्री.के. क्षीरसागर म्हणजेच श्रीकेक्षी हे निर्भय आणि नि:स्पृह वृत्तीचे समीक्षक होते. ते सावरकर आणि पटवर्धन यांच्या भाषाशुद्धीविषयक विचारांवर ‘सह्याद्री’ मासिकातून परखड टीका केल्याने प्रकाशात आले. त्यांनी भाई डांगे यांच्या मार्क्सवादी भूमिकेवर व साने गुरुजी यांच्या उपदेशप्रधान वाङ्मयीन भूमिकेवरही टीका केली...
पस्तिसावे मराठी साहित्य संमेलन (Thirty fifth Marathi Literary Meet 1952)
पस्तिसावे साहित्य संमेलन अंमळनेर येथे 1952 साली झाले. त्या संमेलनाचे अध्यक्ष भाषाशास्त्रज्ञ आणि व्याकरणकार कृष्णाजी पांडुरंग (कृ.पां.) कुलकर्णी हे होते. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील ओंड हे होय. ते भाषेच्या व्युत्पत्तिशास्त्राचे प्रकांडपंडित मानले जातात...
चौतिसावे मराठी साहित्य संमेलन (Thirty fourth Marathi Literary Meet – 1951)
चौतिसावे मराठी साहित्य संमेलन कर्नाटकात कारवार येथे 1951 साली झाले. त्या संमेलनाचे अध्यक्ष अनंत काकबा प्रियोळकर हे होते. त्यांची ख्याती चिकित्सक संशोधक, प्राचीन वाङ्मयाचे विचक्षण अभ्यासक, दुर्मीळ ग्रंथांचे साक्षेपी संपादक अशी होती. ते भाषाशास्त्रज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होते. पाठचिकित्सा शास्त्रातील सखोल संशोधन हा त्यांचा विशेष प्रांत...
तेहतिसावे मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष यशवंत (Thirty-third Marathi Literary Meet – 1950)
तेहतिसावे मराठी साहित्य संमेलन मुंबई येथे 1950 साली झाले. त्याचे अध्यक्ष यशवंत दिनकर पेंढारकर ऊर्फ राजकवी यशवंत हे होते. कवी यशवंत यांचा हातभार आधुनिक कवितेला उज्ज्वल आणि कीर्तिवंत करण्यात फार मोठा आहे. त्यांनी कवी केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज यांच्यानंतर मराठी कविता अधिक समृद्ध केली...
बत्तिसावे साहित्य संमेलन (Thirty-Second Marathi Literary Meet – 1949)
बत्तिसावे साहित्य संमेलन पुणे येथे 1949 साली झाले. त्याचे अध्यक्ष ‘आधुनिक भारत’कार आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर हे होते. ते 1920 च्या महात्मा गांधी यांच्या असहकार चळवळीत एम ए चा अभ्यास अर्धवट टाकून पडले. त्या वेळी भारतीय राजकारणात टिळकयुग संपून गांधीयुग सुरू झाले होते. जावडेकर यांनी स्वतःला महात्मा गांधी यांच्या विचारप्रणालीत झोकून दिले होते. ते गांधीवादाचे भाष्यकार म्हणूनच ओळखले जात...
एकतिसावे साहित्य संमेलन (Thirty-first Marathi Literary Meet -1947)
एकतिसावे साहित्य संमेलन हैदराबाद येथे 1947 साली झाले. नरहर रघुनाथ फाटक हे तेथे अध्यक्ष होते. फाटक यांच्या आयुष्याची सुरुवात वृत्तपत्र लेखनाने आणि संपादन सहकार्याने झाली. पुढे, ते नाथीभाई ठाकरसी विद्यापीठ व रुईया कॉलेजात मराठीचे अध्यापक झाले...
तिसावे साहित्य संमेलन (Thirtieth Marathi Literary Meet – 1946)
गजानन त्र्यंबक माडखोलकर हे बेळगाव येथे 1946 साली झालेल्या तिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ते कादंबरीकार, निबंधकार, पत्रकार आणि संपादक म्हणून प्रसिद्ध होते. राजकीय कादंबरी ही त्यांची खासीयत.