वाचकांना वारीचे आवाहन (Appeal to Contributors)

पंढरपूरच्याआषाढी वारी निमित्ताने थिंक महाराष्ट्र डॉट कॉमवर दोन दिवसांत चार लेख प्रसिद्ध केले आहेत. पैकी प्रज्ञा गोखले या सुशिक्षित वारकरी. त्या संत साहित्याने भाववेड्या होऊन गेल्या आणि त्यांनी तत्संबंधात विविध माध्यमांतून अभ्यासपूर्ण व भावनापूर्ण अनुभवपर कथन चालू ठेवली आहेत. एका लेखात (प्रज्ञा गोखले वारीच्या लयीत दंग!) त्यांचा परिचय करून दिला आहे. दुसऱ्या लेखात त्यांचीच वारीसंबंधांतील निरीक्षणे (पंढरीची वारी- मराठी संस्कृतीची आत्मखूण!) नोंदली आहेत. तिसरा लेख (संत परंपरेचे विदेशी अभ्यासक) संत साहित्याच्या परदेशी अभ्यासकांची नोंद करतो तर चौथा लेख (वारीची परंपरा) वारीच्या परंपरेचा इतिहास व वर्तमान सांगण्याचा प्रयत्न करतो.
वारी ही इतकी अफाट आणि प्रदीर्घ परंपरेची गोष्ट आहे, की तीबाबत सहसा भाबडेपणाने, भावपूर्णतेने व म्हणून संदिग्धतेने लिहिले जाते. त्यामधून वारीचा वस्तुनिष्ठ इतिहास कळतच नाही. वारीबाबत लोकांकडे असलेली माहिती लोक जेव्हा भावनिरपेक्ष पद्धतीने मांडतील तेव्हाच वारकरी परंपरेसारख्या अद्भुत गोष्टींचे वस्तुनिष्ठ वर्णन शक्य होईल. ते शेकडो लोकांच्या सहभागातूनच घडू शकेल (क्राऊड सोर्सिंग). तेव्हा वाचकांना विनंती अशी, की त्यांनी त्यांच्याकडे वारी संबंधात सच्ची माहिती असेल तर ती त्यांनी थिंक महाराष्ट्र डॉट कॉमकडे पाठवावी.
व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन
थिंक महाराष्ट्र डॉट कॉम
22 मनुबर मॅन्शन, पहिला मजला
193 बाबासाहेब आंबेडकर रोड, चित्रा सिनेमासमोर,
दादर (पूर्व), मुंबई 400 014 
इमेल – info@thinkmaharashtra.com
फोन – 9892611767
———————————————————————————————-