लेखक समीक्षकांच्या वेबसाईट्स थिंक महाराष्ट्रचा नवा उपक्रम (Marathi Writers Critic on Web!)

 

रघुवीर सामंतांच्या संकेतस्थळाचे उद्घाटन
जुन्याजाणत्या मराठी लेखक-समीक्षकांच्या वेबसाइट्स बनवण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास चालना ‘थिंक महाराष्ट्र‘ या वेबपोर्टलतर्फे देण्यात येत आहे. महाराष्ट्र भाषा-संस्कृती यांचे जतन व संवर्धन आणि त्याकरता राज्याच्या तालुक्या तालुक्यातून माहिती संकलन असे काम ‘थिंक महाराष्ट्र‘तर्फे गेली काही वर्षे चालू आहे. त्यातील एक विशेष दालन लेखक-समीक्षक यांच्या वेबसाइट्सनी विनटणार आहे.
            हरवलेल्या पिढीतील दुर्लक्षित लेखक-प्रकाशक रघुवीर सामंत यांच्या वेबसाईटचे उद्घाटन शुक्रवारी, 21 ऑगस्टला सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध साहित्य समीक्षक व संशोधक अनंत देशमुख यांच्या हस्ते होत आहे. रघुवीर सामंत यांनी कविता-गीते, कथा, व्यक्तिचित्रे असे विविध साहित्य लिहिले. ते नाणावलेले शिक्षक होते. त्यामुळे त्यांचे निबंध विचारही प्रसिद्ध आहेत. ती वेबसाईट रघुवीर यांचे चिरंजीव दीपक सामंत यांनी मोठ्या प्रयत्नांनी, विविध ठिकाणचे साहित्य जमा करून साकारली आहे. साहित्याची जुळवाजुळव, त्यावरील टीकाटिप्पणी आणि संदर्भसंशोधन हा अशा वेबसाईट्सवरील माहितीचा गाभा असणार आहे; आणि त्यामुळे संबंधित साहित्यिक वाचकांच्या नजरेसमोर (अॅक्सेसीबल) सतत राहू शकेल. ‘थिंक महाराष्ट्र’ने यापूर्वी ‘सानेगुरुजी डॉट नेट‘ नावाची वेबसाईट उभी करून, तीवर गुरुजींचे सर्व साहित्य युनिकोडमध्ये उपलब्ध करून दिले आहे. रघुवीर सामंत यांची ही वेबसाईट त्या मालिकेतील दुसरी ठरेल.
            रघुवीर सामंत यांच्या वेबसाईट उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी लिहिलेल्या कविता, चित्रपट-गीते, कथा, व्यक्तीचित्रे यांवर आधारित कार्यक्रम; तसेच, त्यांच्या कुटुंबीयांची मनोगते व त्यांच्या साहित्याचे अभिवाचन असा तासाभराचा कार्यक्रम होणार आहे. त्यात  विवेक पाटकर, सुषमा पौडवाल, सीमा चंद्रगुप्त आणि छाया देव सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा दामले करणार आहेत.
            ‘थिंक महाराष्ट्र’साठी वेबसाईट उभारणीचा हा प्रकल्प प्रकाशक-संपादक रामनाथ आंबेरकर राबवणार आहेत. दिनकर गांगल, प्रवीण शिंदे व सुदेश हिंगलासपूरकर त्या प्रकल्पाच्या कोअर कमिटीत आहेत. त्याखेरीज महाराष्ट्रभरचे ज्येष्ठ लेखक-समीक्षक यांचा प्रकल्पात सहभाग मिळवण्याचा प्रयत्न आहे.
कार्यक्रमाची लिंक – https://www.youtube.com/channel/UChxUVgFZWTeHJFknU5p5yQg
टीम थिंक महाराष्ट्र 9892611767
info@thinkmaharashtra.com
——————————————————————————————————–

11 COMMENTS

  1. “थिंक महाराष्ट्र”चे उपक्रम अभिनव,दर्जेदार आणि महाराष्ट्राच्या नावलौकिकामध्ये भरघालणारे असतात..प्रस्तुत उपक्रमही तसाच आणि स्तुत्य आहे..

  2. अजून एक अभिनव उपक्रम.खुप आहेत करण्यासााारखे..एक केलं..की दुसरं सुचत रााहणाार.खुप खुप शुभेच्छा.

  3. अजून एक अभिनव उपक्रम.खुप आहेत करण्यासााारखे..एक केलं..की दुसरं सुचत रााहणाार.खुप खुप शुभेच्छा.

  4. अतिशय उत्तम उपक्रम आहे. पहिल्यांदा थिंक महाराष्ट्र ने सुरुवात केली आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा डॉ.किशोर सानप नागपूर